Join us

मॉर्निंग वॉकला जाता? या ८ चुकांमुळे हृदयावर येतो ताण, भल्या सकाळी जीव धोक्यात कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2025 13:04 IST

Common Mistakes During Morning Walks: Heart Health Tips for Morning Walkers: Morning Walk Mistakes to Avoid for Blood Pressure Patients: How Morning Walks Affect Heart Health: Blood Pressure Management with Morning Walks: Walking Mistakes That Can Stress Your Heart: चालताना या ८ चुका करणे टाळायला हवे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर

रोज किमान अर्धा तास चालायला हवे असे आपल्याला सांगितले जाते. चालल्याने वजनच नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारते.(Common Mistakes During Morning Walks) तसेच मानसिक आरोग्य आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. चालणे ही नैसर्गिक क्रिया आहे.(Heart Health Tips for Morning Walkers) यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे देखील मोजावे लागत नाही. चालणे हा अतिशय सोपा आरोग्यदायी व्यायाम आहे. यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. (Morning Walk Mistakes to Avoid for Blood Pressure Patients)परंतु, चालताना काही चुका झाल्या तर फायद्याऐवजी आपल्या आरोग्याला नुकसान होऊ शकते.(How Morning Walks Affect Heart Health) चुकीच्या पद्धतीने चालल्याने हृदयावर ताण येतो. त्यामुळे चालताना या ८ चुका करणे टाळायला हवे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर ( Blood Pressure Management with Morning Walks)

डायबिटीस असेल तर आंबा खावा की नको? शुगर वाढते का? हा डॉक्टरांचा सल्ला आधी वाचा..

1. खूप वेगाने किंवा हळू चालणे

अनेकदा वजन कमी करण्यासाठी आपण खूप वेगाने चालतो किंवा अधिकतर वेळी आपण हळू चालतो. ज्यामुळे आपले वजन कमी होत नाही. अचानक वेगाने चालल्याने आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. चालण्यासाठी वेग ही योग्य असायला हवा. ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. 

2. वॉर्म-अप आणि कूल-डाऊन न करणे

अचानक वॉर्म अप न करता जलद चालणे सुरु केल्याने स्नायूंवर ताण येऊ शकतो. हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात. अचानक चालताना थांबल्याने रक्तदाब कमी होतो. त्यामुळे चालण्यापूर्वी आणि नंतर ५ ते १० मिनिटांनी स्ट्रेचिंग किंवा हळू चालावे. 

3. चुकीच्या पद्धतीने चालणे

वाकून किंवा चुकीच्या पद्धतीने चालल्याने श्वसनावर परिणाम होतो. ज्यामुळे हृदयापर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यासाठी सरळ उभे राहून खांदे सैल ठेवून आणि हात हलवून चालत जा. 

अनुष्का शर्मासारखी परफेक्ट 'फिगर' हवी? ती करते ‘तसा’ व्यायाम करा, बाळांतपणानंतर वाढलेलं वजनही झरझर उतरेल

4. योग्य प्रमाणात पाणी न पिणे

डिहायड्रेशनमुळे रक्ताचा थर जाड होतो. ज्यामुळे हृदय अधिक वेगाने काम करते. उन्हाळ्यात वॉर्किंगला जाण्यापूर्वी किंवा नंतर पाणी प्या. 

5. जड नाश्ता केल्यानंतर 

चालायला जाण्यापूर्वी जड किंवा तळलेले अन्न पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो. त्यामुळे हृदयाला जास्त प्रमाणात काम करावे लागते. चालायला जाण्यापूर्वी हलका नाश्ता करा. फळे किंवा सुका मेवा सारखे पदार्थ खा. 

6. प्रदूषण 

धुळीने भरलेल्या किंवा जास्त प्रमाणात रहदारी असणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रदूषणांमुळे आपल्या फुफ्फुसांवर आणि हृदयावर वाईट परिणाम होतो. चालायला जाण्यासाठी गार्डनर किंवा हिरवागार ठिकाण शोधा. 

रोज थंड पाण्याने आंघोळ केली तर...? शरीराला मिळतात ६ जबरदस्त फायदे

7. अधिक श्रम करणे जर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल, चक्कर येत असेल किंवा छातीत दुखत असेल तर अशावेळी लगेच थांबा. जास्त चालण्यामुळे हृदयासाठी धोकादायक ठरु शकते. उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग असलेल्यांनी काळजी घ्यावी. 

8. नियमितता न राखणे 

अधूनमधून लांब चालत जाण्याऐवजी दररोज ३० ते ४० मिनिटे नियमितपणे चाला. अनियमित चालण्यामुळे हृदयाच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.   

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्य