lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > चेहेऱ्यावर ग्लो हवा, मग सायकल चालवा! बायकांनी सायकल चालवण्याचे हे 10 फायदे !

चेहेऱ्यावर ग्लो हवा, मग सायकल चालवा! बायकांनी सायकल चालवण्याचे हे 10 फायदे !

सायकलिंग हा पुरुषांचा व्यायाम समजला जातो . जो खरंतर काही विशिष्ट फायद्यांसाठी महिलांनी करणं अतिशय आवश्यक समजलं जातं. महिलांनी सायकलिंग करण्याचे अनेक फायदे आहेत. चांगलं दिसणं हा महिलांचा मुख्य उद्देश असतो. सायकलिंग महिलांना केवळ चांगलं दिसण्यासाठीच मदत करत नाही तर चांगलं वाटण्यासही मदत करते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 02:47 PM2021-06-03T14:47:39+5:302021-06-03T15:22:27+5:30

सायकलिंग हा पुरुषांचा व्यायाम समजला जातो . जो खरंतर काही विशिष्ट फायद्यांसाठी महिलांनी करणं अतिशय आवश्यक समजलं जातं. महिलांनी सायकलिंग करण्याचे अनेक फायदे आहेत. चांगलं दिसणं हा महिलांचा मुख्य उद्देश असतो. सायकलिंग महिलांना केवळ चांगलं दिसण्यासाठीच मदत करत नाही तर चांगलं वाटण्यासही मदत करते.

Glow on the face, ride a bicycle! Here are 10 benefits of cycling for women! | चेहेऱ्यावर ग्लो हवा, मग सायकल चालवा! बायकांनी सायकल चालवण्याचे हे 10 फायदे !

चेहेऱ्यावर ग्लो हवा, मग सायकल चालवा! बायकांनी सायकल चालवण्याचे हे 10 फायदे !

Highlightsमेनोपॉजनंतर मात्र महिलांनी हदयाची काळजी विशेष स्तरावर घेणं आवश्यक आहे. ही गरज सायकलिंग केल्यानं भागते.मेनोपॉजनंतर सायकलिंगसारखा शरीरालास सक्रीय करणारा व्यायाम नियमित केल्यास स्तनांच्या कर्करोगाचा धोका टळतो. मोकळ्या हवेत सकाळच्या वेळेस सायकलिंग केल्यास आपल्या शरीरात ड जीवनसत्त्वं मुरायला मदत होते.

महिलांनी सायकलिंग करण्याचे अनेक फायदे आहेत. चांगलं दिसणं हा महिलांचा मुख्य उद्देश असतो. सायकलिंग महिलांना केवळ चांगलं दिसण्यासाठीच मदत करत नाही तर चांगलं वाटण्यासही मदत करते.
व्यायाम हा सर्वांसाठी समान असतो. अमूक व्यायाम पुरुषांनी करावा आणि अमूक व्यायाम स्त्रियांनी करावा असं नसतं. पण तरीही अशी विभागणी केली जाते. या विभागणीमुळे निरनिराळे व्यायाम प्रकार करुन पाहून त्याचे फायदे मिळवण्यापासून अनेकदा महिला वंचित राहातात. सायकलिंग हा देखील असाच पुरुषांचा व्यायाम समजला जातो . जो खरंतर काही विशिष्ट फायद्यांसाठी महिलांनी करणं अतिशय आवश्यक समजलं जातं.
महिलांनी सायकलिंग करण्याचे अनेक फायदे आहेत. चांगलं दिसणं हा महिलांचा मुख्य उद्देश असतो. सायकलिंग महिलांना केवळ चांगलं दिसण्यासाठीच मदत करत नाही तर चांगलं वाटण्यासही मदत करते. व्यायाम हा शरीर आणि मन या दोन्हींच्या फायद्यासाठी करायचा असतो. सायकल चालवण्यानं शरीर आणि मन दोन्ही निरोगी आणि उत्साही राहातं. काही विशिष्ट कारणांसाठी महिलांनी सायकलिंग हे आवर्जून करावं असं तज्ज्ञ म्हणतात.

महिलांनी सायकलिंग का करावं?

  1.  आपल्या हदयाचं आरोग्य सांभाळणं हे खूप महत्त्वाचं असतं. स्त्रिया तर हदयाच्या आरोग्याला जणू काही गृहितच धरतात. पण मेनोपॉजनंतर मात्र महिलांनी हदयाची काळजी विशेष स्तरावर घेणं आवश्यक आहे. ही गरज सायकलिंग केल्यानं भागते. सायकल चालवल्याने हदयरोगाचा धोका कमी होतो. सायकल चालवताना शरीराला एक लय येते. तीच लय हदयाच्या ठोक्यांनाही येते. आणि श्वासांवरही नियंत्रण करायला जमतं. सायकलिंग करताना संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवण्यास सायकलिंगमुळे मदत होते.
  2. महिलांना सर्वात जास्त धोका स्तनांच्या कर्करोगाचा असतो. हा धोका जेव्हा शरीराची हालचाल पुरेशी होत नाही तेव्हा जास्त असतो. पण सायकलिंगमुळे संपूर्ण शरीर सक्रीय होतं. एका अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो की मेनोपॉजनंतर सायकलिंगसारखा शरीरास सक्रीय करणारा व्यायाम नियमित केल्यास स्तनांच्या कर्करोगाचा धोका टळतो.
  3.  पुरुषांच्या तुलनेत महिलांचं जास्त वेळ घरात असण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याचा परिणाम म्हणजे अनेक स्त्रिया सूर्यप्रकाशाच्या फायद्यांना मुकतात. सूर्यप्रकाश हा ड जीवनसत्त्वाचा मुख्य स्त्रोत आहे. सूर्याच्या कोवळ्या उन्हांपासून ड जीवनसत्त्वं मिळतं. मोकळ्या हवेत सकाळच्या वेळेस सायकलिंग केल्यास आपल्या शरीरात ड जीवनसत्त्वं मुरायला मदत होते. ड जीवनसत्त्वं मिळाल्यानं निराश उदास मनही प्रफुल्लित होतं. शरीरास पुरेसं ड जीवनसत्त्वं मिळाल्यास वेगवेगळ्या आजारांविरुध्द शरीराची लढण्याची , त्याला प्रतिकार करण्याची शक्ती वाढते. सायकलिंगमुळे शारीरिक व्यायाम आणि ड जीवनसत्त्वाचा लाभ असा दुहेरी फायदा होतो.
  4.  शरीराचा भरपूर व्यायाम झाला की शरीरातील प्रतिजैविकं आणि पांढऱ्या पेशी यांच्यात सकारात्म्क बदल होतात. सायकलिंग केल्यानं शरीराचं तापमान वाढतं. त्याचा परिणाम म्हणजे घातक जिवाणूंना आत येण्यास शरीर रोखतं. रोज १५ ते २० मिनिटं सायकल चालवली की शरीर वेगवेगळ्या संसर्गाशी ताकदीनं लढतं. तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते अन रोगप्रतिकार शक्ती उत्तम असेल तर शरीराची ताकदही वाढते.
  5.  सायकलिंगमुळे हात-पायाचे स्नायू मजबूत होतात. सायकलचे पेडल मारताना पोटऱ्यांचे स्नायू बळकट होतात. सायकलिंग महिलांना चांगलं दिसण्यास फायदेशीर ठरते. शरीराला सुडौलपणा आणण्याचं काम सायकलिंगमुळे होतं. जितका वेळ आपण सायकलचे पेडल मारतो तितका वेळ शरीराचा टोन सुधारण्यावर काम होतं. सायकलिंगमुळे नितंबं आणि मांड्याचा चांगला व्यायाम होतो. तिथे साचलेली चरबी नियमित सायकलिंगने निघून जाते. सायकलिंग करताना पायांची हालचाल होते असं दिसत असलं तरी हात हॅण्डलबारवर असतात. ते ताठ असल्याने हाताच्या, खांद्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. तसेच सायकलिंगमुळे पोट, खांदे, पाठ आणि हदय या विविध अवयवांच्या स्नायुंचा व्यायाम होतो त्याचा परिणाम शरीराला एक टोन आणि ताकद प्राप्त होते.
  6.  सायकल हा एक व्यायाम आहे हे खरं. कारण केवळ व्यायामाच्या वेळेस चालवलेल्या सायकलचाच शरीराला फायदा होतो असं नाही तर आरामशीर हळुहळु चालवलेली सायकलही शरीराची क्षमता वाढवते. हदयाचा फिटनेस राखते. हदय मजबूत करते. शिवाय रमत गमत चालवालेल्या सायकलमूळे फुप्फुसांचं कार्य सुधारतं. त्यांची क्षमता वाढते.

 

7.सायकलिंगमुळे शरीराला सुडौलपणा प्राप्त होतो तसाच त्वचेलाही फायदा होतो. नियमित सायकल चालवल्याने चेहेरा चमकदार होतो.

8. सायकलिंगमुळे शरीर थकतं. त्याचा परिणाम म्हणजे रात्री नीट झोप लागते. रात्री लवकर, शांत आणि पूरेशी झोप लागण्यासाठी शरीर थकलेलं असणं गरजेचं असतं. शरीराची थकण्याची गरज सायकल चालवल्यानं भागते. नियमित सायकलिंग केल्यानं शांत झोपेचा वेळही वाढते. झोप नीट झाली की सकाळी ताजतवानं वाटतं. यासाठी सायकलिंग हा व्यायाम आवश्यक आहे.

9. सायकल चालवल्याने पचनक्रियेचा वेग वाढतो. सायकल चालवताना श्वास आणि हदयाचे ठोके वाढलेले असतात. त्याचा परिणाम आतड्यांवर होतो. आतडे आकसत नाही. आणि परिणामी पोटदुखी होत नाही.

10. सायकलिंग हा एक विरंगूळा आहे, मजा आहे. मनाला उत्तेजित आणि उत्साहित करणाऱ्या या व्यायामनं अ‍ॅड्रेनालिन आणि एंड्रोफिन्स हे संप्रेरकं चांगली स्त्रवतात. त्याचा परिणाम म्हणजे मूड सूधारतो. आनंदी वाटतं. त्यामुळे अजूनही सायकलिंग टाळत असाल तर उठा आणि उद्यापासून सायकल चालवायला लागा!

Web Title: Glow on the face, ride a bicycle! Here are 10 benefits of cycling for women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.