Lokmat Sakhi >Fitness > पन्नाशीतल्या ऐश्वर्या नारकर एवढ्या फिट- सुंदर कशा? ५ गोष्टी नेमाने करतात- तुम्हालाही सहज जमतील 

पन्नाशीतल्या ऐश्वर्या नारकर एवढ्या फिट- सुंदर कशा? ५ गोष्टी नेमाने करतात- तुम्हालाही सहज जमतील 

Fitness Tips By Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य आणि फिटनेस खरोखरच खूप कमालीचा आहे. वयाच्या पन्नाशीतही त्यांनी हे सगळं कसं मेंटेन केलं असेल तर हे वाचाच...(5 important things for your mental and physical health)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2025 17:05 IST2025-07-16T16:48:08+5:302025-07-16T17:05:57+5:30

Fitness Tips By Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य आणि फिटनेस खरोखरच खूप कमालीचा आहे. वयाच्या पन्नाशीतही त्यांनी हे सगळं कसं मेंटेन केलं असेल तर हे वाचाच...(5 important things for your mental and physical health)

fitness tips by Aishwarya narkar, Aishwarya narkar shared her beauty secret, 5 important things for your mental and physical health  | पन्नाशीतल्या ऐश्वर्या नारकर एवढ्या फिट- सुंदर कशा? ५ गोष्टी नेमाने करतात- तुम्हालाही सहज जमतील 

पन्नाशीतल्या ऐश्वर्या नारकर एवढ्या फिट- सुंदर कशा? ५ गोष्टी नेमाने करतात- तुम्हालाही सहज जमतील 

Highlightsमानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहावं म्हणून कोणत्या गोष्टी करणं महत्त्वाचं वाटतं, याविषयीचं ऐश्वर्या नारकर यांचं मत...

ऐश्वर्या नारकर... हे नाव जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा नकळतपणे सगळ्यात आधी लक्षात येतो तो त्यांचा जबरदस्त फिटनेस आणि सौंदर्य.. त्यांच्याकडे पाहून कित्येकांना त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. त्यामुळेच तर सौंदर्य आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी त्यांनी कशा मेंटेन ठेवल्या असतील, त्यासाठी त्या काय करत असतील असा प्रश्न कित्येकांना पडतोच.. त्याचं पहिलं उत्तर म्हणजे त्या नियमितपणे व्यायाम करतात. त्याचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओही त्या सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोजच्या रोज त्या अशा काही गोष्टी करतात ज्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत (Fitness Tips By Aishwarya Narkar). त्या गोष्टी नेमक्या कोणत्या याविषयी माहिती सांगणारा त्यांचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (5 important things for your mental and physical health)

 

ऐश्वर्या नारकर यांचं फिटनेस सिक्रेट

मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहावं म्हणून कोणत्या गोष्टी करणं महत्त्वाचं वाटतं, याविषयीचं ऐश्वर्या नारकर यांचं मत wowwithsonali या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या सर्वसामान्य महिलांनाही अगदी सहज करता येतील. 

फक्त एका बटाट्याची कमाल! रोपं होतील हिरवीगार- फुलंही येतील भरपूर, बघा कसा वापरायचा.. 

१. त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे झोपेच्या वेळा पाळा. रात्रीची जागरणं टाळा. रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. आपल्या शरीराला पुरेसा आराम मिळाला तर ते दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने तुमची साथ देतं.

 

२. आहाराकडे लक्ष द्या. जे पारंपरिक पदार्थ तुम्ही आजवर खात आला आहात तेच खाण्यावर भर द्या. आपण खात आहोत तो पदार्थ आपल्या आरोग्यासाठी खरंच चांगला आहे का हे प्रत्येकवेळी स्वत:ला विचारा.

३. स्वत:साठी थोडा वेळ काढणं खूप गरजेचं आहे. तेच नेमकं अनेकींना जमत नाही. पण स्वत:ला जर वेळ दिला तर तुम्ही मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या फ्रेश होता.

श्रावण स्पेशल: मंगळागौर- राखीपौर्णिमेला ठसकेबाज मराठी लूक हवा? मग मोत्यांचे 'हे' दागिने तुमच्याकडे हवेतच..

४. सतत काहीतरी नविन शिकत राहा. यामुळे तुमचं मन तरुण, उत्साही राहण्यास मदत होते.

५. तुमच्या भावना आतल्या आत दाबू नका. बोलून मोकळं व्हा. कारण सतत भावना दाबत राहिलात तर त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या शरीरावर होत जातो. 


 

Web Title: fitness tips by Aishwarya narkar, Aishwarya narkar shared her beauty secret, 5 important things for your mental and physical health 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.