lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > हाय हिल्स घातल्याने- खूप चालल्यामुळे तळपाय ठणकतात? अभिनेत्री भाग्यश्री सांगते ५ मिनिटांचा सोपा व्यायाम

हाय हिल्स घातल्याने- खूप चालल्यामुळे तळपाय ठणकतात? अभिनेत्री भाग्यश्री सांगते ५ मिनिटांचा सोपा व्यायाम

How To Get Relief From Foot Pain: कधी कधी तळपाय खूप दुखतात. तळपायांचं दुखणं कमी करायचं असेल तर त्यांना रिलॅक्स करण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला हा सोपा व्यायाम करून पाहा... (exercises for reducing foot pain)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2024 09:10 AM2024-03-15T09:10:58+5:302024-03-15T09:15:01+5:30

How To Get Relief From Foot Pain: कधी कधी तळपाय खूप दुखतात. तळपायांचं दुखणं कमी करायचं असेल तर त्यांना रिलॅक्स करण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला हा सोपा व्यायाम करून पाहा... (exercises for reducing foot pain)

Fitness tips by actress Bhagyashree, How to get relief from foot pain due to high heels, exercises for reducing foot pain  | हाय हिल्स घातल्याने- खूप चालल्यामुळे तळपाय ठणकतात? अभिनेत्री भाग्यश्री सांगते ५ मिनिटांचा सोपा व्यायाम

हाय हिल्स घातल्याने- खूप चालल्यामुळे तळपाय ठणकतात? अभिनेत्री भाग्यश्री सांगते ५ मिनिटांचा सोपा व्यायाम

Highlightsतळपायांच्या वेदना कमी करण्यासाठी ५ मिनिटांचे काही सोपे व्यायाम करून पाहा.

आपल्या संपूर्ण शरीराला जशी आरामाची, कधी कधी मसाज करण्याची गरज असते, तशीच गरज आपल्या तळपायांना, पायांच्या बोटांनाही असते. पण आपण मात्र त्यांच्याकडे पार दुर्लक्ष करतो. बऱ्याचदा हाय हिल्स घातल्याने किंवा कधी कधी खूपच धावपळ, चालणं झाल्यामुळे तळपाय दुखतात. कधी कधी आपण नव्या चपला, बूट ट्राय करतो, तेव्हाही ते पायाला सहन झाले नाही तर तळपाय दुखतात (Fitness tips by actress Bhagyashree). अशावेळी तळपायांच्या वेदना कमी करण्यासाठी ५ मिनिटांचे काही सोपे व्यायाम करून पाहा (How to get relief from foot pain due to high heels). यामुळे नक्कीच आराम मिळेल, असं अभिनेत्री भाग्यश्री सांगते आहे. (exercises for reducing foot pain )

तळपाय रिलॅक्स करण्यासाठी व्यायाम 

 

१. दुखऱ्या तळपायांना आराम मिळण्यासाठी सगळ्यात आधी तर तळपायांच्या बोटांना थोडी मालिश करा. यानंतर प्रत्येक बाेट ओढून दोन बोटांमधलं अंतर थोडं वाढवा. यानंतर प्रत्येक बोट पुढे- मागे अशा पद्धतीनेही हलवा. यामुळे तळपायांचे स्नायू ताणले जातील आणि त्यांच्यावरचा ताण कमी होण्यास मदत होईल.

उन्हाळ्यात टोमॅटो लवकर खराब होतात? बघा १ सोपा उपाय- महिनाभर टोमॅटो राहतील फ्रेश

२. हा दुसऱ्या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी उभे राहा. यानंतर उभे राहून अंगठा आणि पायाची इतर बोटं यांच्यातलं अंतर वाढविण्याचा प्रयत्न करा. असं साधारण ५ ते ७ वेळा करावं.

 

३. यानंतर तळपायाची जी करंगळीकडची बाजू आहे, त्या बाजुवर भार देऊन उभे राहण्याचा प्रयत्न करावा.

फक्त १५ मिनिटांत मिळेल ब्रायडल ग्लो- पार्लरला जायला वेळ नसेल तर झटपट करा 'हे' फेशियल

असं करताना अंगठा आणि अंगठ्याकडची बाजू जमिनीपासून उचललेली असावी. हे ३ व्यायाम करून पाहिले, तर काही वेळातच रिलॅक्स वाटेल आणि तळपायांचं दुखणं कमी होईल. 

 

Web Title: Fitness tips by actress Bhagyashree, How to get relief from foot pain due to high heels, exercises for reducing foot pain 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.