Join us  

दंड ओघळले आहेत, स्लिव्ह्जलेस कपडे घालताना संकोच वाटतो? रोज ४ व्यायाम,  दंड दिसतील छान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 7:09 PM

How to reduce fats on arms: हाताच्या दंडावरची चरबी वाढू लागली की हात अतिशय बेढब दिसू लागतात. म्हणूनच हे काही व्यायाम (exercise)नियमितपणे करा.. हात दिसू लागतील आकर्षक...

ठळक मुद्दे काही सोपे व्यायाम करा आणि दंडांवरची चरबी कमी करा.. दंड (arms)होतील सुडौल आणि दिसू लागतील एकदम आखीव- रेखीव..

पोटावरची, कंबरेवरची, मांड्यांवरची चरबी (fats)कमी करण्यासाठी आपण अनेकदा प्रयत्न करतो. पण या सगळ्या नादात आपल्या दंडाचेही तसेच हाल झाले आहेत आणि दंडावरची चरबीही चक्क वयस्कर महिलांप्रमाणे लोंबकळू लागली आहे, हे आपण विसरून जातो. दंड बेढब दिसू लागले की मग स्लिव्हलेस, मेगास्लिव्ह किंवा कमी बाह्या असणारे कोणतेही ड्रेस घालताना, साडी नेसताना आपलं आपल्यालाच कसंतरी वाटू लागतं. अनेक जणी तर मग चारचौघात असे ड्रेस घालणंच बंद करतात... मैत्रिणींनो वाढलेल्या दंडामुळे आपल्या कपड्यांवर बंधन लादण्याची मुळीच गरज नाही. यापेक्षा काही सोपे व्यायाम करा आणि दंडांवरची चरबी कमी करा.. दंड (arms)होतील सुडौल आणि दिसू लागतील एकदम आखीव- रेखीव..

 

हातावरची चरबी कमी करण्यासाठी हे व्यायाम करा....१. बटरफ्लाय एक्सरसाईज(butterfly exercise)हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा.. यानंतर दोन्ही हात दोन्ही बाजूंना पसरवा. आता दोन्ही हात १० वेळेस ॲण्टी क्लॉकवाईज आणि १० वेळेस क्लोकवाईज अशा पद्धतीने सोबतच फिरवा..या व्यायामाच्या दुसऱ्या प्रकारात दोन्ही हात वर करा. यानंतर एक सोबतच दोन्ही हात पुढून खाली घेत माग घ्या आणि पुन्हा वर करा. अशी क्रिया ५ वेळेस करा. त्यानंतर आता याच्या विरुद्ध करा. म्हणजेच वर असलेले हात आधी मागच्या बाजूला न्या, खाली घ्या आणि मग पुढून वर आणा. 

२. प्लांक आर्म एक्सरसाईज (Plank Arm Exercises)हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी पोटावर झोपा. त्यानंतर दोन्ही हाताचे कोपरे आणि दोन्ही पायाचे पंजे जमीनीवर टेकवून ठेवा आणि त्या जोरावर सगळे शरीर वर उचला. ही अवस्था २० ते २५ सेकंद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. 

 

३. पुशअप्स(pushups)हातावरील चरबी कमी करण्यासाठी हा एक चांगला व्यायाम आहे. हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर गुडघे टेकवून उभे रहा. यानंतर हाताचे तळवे जमिनीवर टेकवा आणि पाय मागे घ्या. आता तळहात आणि पाय जमिनीवर टेकवून १० ते १५ पुशअप्स मारा. यामुळे हात तर आकर्षक होतातच पण दंडाचे स्नायूही मजबूत होतात. 

 

४. हाताची उघडझापहा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा. यानंतर दोन्ही हात दोन्ही बाजूंना पसरवा. त्यानंतर कोपऱ्यात वाकवा. आता दोन्ही हातांच्या मुठी घाला. एकाच वेळी दोन्ही हात कोपऱ्यात वाकवलेले असतानाच डोळ्यांसमोर आणा. हात डोळ्यांसमोर आणल्यावर हाताच्या मुठी डोळ्यांकडे असायला पाहिजेत. त्यानंतर दोन्ही हात पुन्हा दोन्ही बाजूंना आधी जसे होते तसे न्या. अशी क्रिया १० ते १५ वेळा करा. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सव्यायाम