Join us  

काम करकरून मान-पाठ एक होतेय? 'असे' करा स्ट्रेचिंग, सांधे मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 5:58 PM

Workout: खूप वेळ एका जागीच बसून काम केल्याने अक्षरश: मान- पाठ एक होऊन जाते. खूप त्रास व्हायला लागतो. म्हणूनच तर पाठ (relaxation of lower back)मोकळी होण्यासाठी हा व्यायाम करा...

ठळक मुद्दे असे व्यायाम केल्यामुळे पाठीच्या मणक्याला आराम मिळेल आणि मानेचे, पाठीचे दुखणे कमी होईल. 

ऑफिसमध्ये दिवसभर एका जागी बसून स्क्रिनसमोर (work) काम करताना पाठ, कंबर चांगलीच आखडून जाते. हळूहळू हा त्रास रोजच व्हायला लागतो. त्यामुळे मग थोडे दिवस आपण बसण्याची जागा बदलून पाहतो, पाठीला आराम मिळावा म्हणून उशीचा वापर करतो.. पण त्यामुळे तात्पुरता आराम मिळतो आणि पुन्हा दुखणे सुरू होते. म्हणूनच आराम मिळावा आणि पाठ, मानेचे दुखणे कमी व्हावे म्हणून नियमितपणे स्ट्रेचिंग करायला हवं. स्ट्रेचिंग केल्याने निश्चितच मानेचे, पाठीचे दुखणे कमी होऊ शकते. बैठ्या कामामुळे पाठीचं, मानेचं दुखणं खूपच वाढलं असेल तर हे तीन प्रकारचे स्ट्रेचिंग करून बघा.

 

आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar)यांनी एक व्हिडियो नुकताच इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला आहे. यामध्ये मान आणि पाठीचे दुखणे कमी कसे करावे, याविषयी त्यांनी माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी जे काही व्यायाम करून दाखविले आहेत, ते काेणीही अगदी सहजपणे घरातल्या घरात करू शकतात. त्यामुळे हे साध्या सोप्या पद्धतीने स्ट्रेचिंग करा आणि मणक्याचा व्यायाम करून मानेचे, पाठीचे दुखणे कमी करा...

 

ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेले व्यायामExercise given by Rujuta Divekarव्यायाम १हा व्यायाम करण्यासाठी दोन खुर्च्या लागतील. एका खुर्चीवर तुम्ही ताठ बसा आणि दुसरी खुर्ची तुमच्या पुढे ठेवा. आता तुमच्या दोन्ही पायात ठराविक अंतर ठेवा. यानंतर तुमच्या समोरची जी खुर्ची आहे त्या खुर्चीच्या हातावर तुमचे हात ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि हळूहळू समोरच्या खुर्चीच्या हातावरून तुमचे हात मागे सरकवत कंबरेतून खाली वाका. असं करताना पाठीचा कणा ताठ असावा.

व्यायाम २हा व्यायाम करण्यासाठी हात नसलेल्या खुर्चीवर एका बाजूने पाय करून बसा. तुमच्या दोन्ही हातांनी खुर्चीची मागची बाजू पकडा. आता तुमचे पाय ज्या दिशेने असतील, त्याच्या विरूद्ध दिशेने तुमचे शरीर शक्य होईल तितके वळवण्याचा प्रयत्न करा.

 

व्यायाम ३हा व्यायाम करताना दोन्ही हातांचे तळवे आणि दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा. असे करताना बाळाची रांगण्याची जशी अवस्था असते, तशी तुमच्या शरीराची अवस्था होईल. आता उजवा हात सरळ वर उचला आणि समोरच्या दिशेला पसरवा. त्यासोबचत डावा पाय उचला आणि मागच्या बाजूला सरळ पसरवा. अशी अवस्था ३० सेकंदासाठी टेकवून ठेवा. आता असाच व्यायाम डाव्या हाताने आणि उजव्या पायाने करा. असे व्यायाम केल्यामुळे पाठीच्या मणक्याला आराम मिळेल आणि मानेचे, पाठीचे दुखणे कमी होईल. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामहेल्थ टिप्सइन्स्टाग्राम