Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > मांड्यांची त्वचा सैल पडून लटकते ? बेडवरच बसून करा ५ व्यायाम - स्किन टाइटनिंग होऊन दिसतील टोन्ड थाईज...

मांड्यांची त्वचा सैल पडून लटकते ? बेडवरच बसून करा ५ व्यायाम - स्किन टाइटनिंग होऊन दिसतील टोन्ड थाईज...

exercises to reduce loose thigh skin : best bed exercises to tone thighs at home : थाईज फॅट आणि स्किन सॅगिंगवर सोपे घरगुती उपाय, मांड्यांची सैल झालेली त्वचा पुन्हा होईल टाईट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2026 17:59 IST2026-03-07T11:51:55+5:302026-03-07T17:59:20+5:30

exercises to reduce loose thigh skin : best bed exercises to tone thighs at home : थाईज फॅट आणि स्किन सॅगिंगवर सोपे घरगुती उपाय, मांड्यांची सैल झालेली त्वचा पुन्हा होईल टाईट...

exercises to reduce loose thigh skin best bed exercises to tone thighs at home | मांड्यांची त्वचा सैल पडून लटकते ? बेडवरच बसून करा ५ व्यायाम - स्किन टाइटनिंग होऊन दिसतील टोन्ड थाईज...

मांड्यांची त्वचा सैल पडून लटकते ? बेडवरच बसून करा ५ व्यायाम - स्किन टाइटनिंग होऊन दिसतील टोन्ड थाईज...

वय वाढत जातं तसतसे शरीरात अनेक नैसर्गिक बदल घडू लागतात. त्यापैकी एक म्हणजे मांड्यांच्या भागातील त्वचा हळूहळू सैल होणे किंवा ढिली पडणे. वय वाढल्यावर चेहऱ्यावरील सुरकुत्यांकडे आपलं लक्ष जातं, पण शरीराच्या इतर भागांकडे आपण दुर्लक्ष करतो. विशेषतः मांड्यांच्या भागातील त्वचा हळूहळू आपला लवचिकपणा गमावू लागते आणि सैल पडू लागते. याला 'लॅक्सिटी' असं म्हणतात. कोलेजनचे प्रमाण कमी होणे आणि स्नायूंचा टोन कमी होणे हे यामागचं मुख्य कारण असतं. फिट राहणं म्हणजे केवळ वजन कमी करणं नव्हे, तर शरीराचा 'शेप' आणि त्वचेचा पोत आहे तसाच टिकवून ठेवणं देखील गरजेच असतं. वयानुसार मांड्यांच्या भागातील त्वचा ढिली पडणं ही एक फारच कॉमन समस्या आहे, ज्यामुळे अनेक स्त्रिया शॉर्ट्स किंवा फिटिंगचे कपडे घालणं टाळतात. विशेष करुन चालताना किंवा बसताना त्या भागातील त्वचेचा सैलपणा जाणवतो(exercises to reduce loose thigh skin).

वाढत्या वयानुसार मांड्यांच्या भागांतील त्वचा सैल पडू न देता, त्वचा टाईट आणि टोन्ड दिसावी अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. या समस्येवर उपाय म्हणून  महागड्या क्रिम्सपेक्षा घरच्याघरीच केलेले एक्सरसाइज आणि त्वचेची विशेष निगा जास्त फायदेशीर ठरते. वय वाढलं तरी मांड्यांची त्वचा लूज न पडता, घट्ट राहू शकते. केवळ डाएटवर अवलंबून न राहता, काही विशिष्ट स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज करुन आपण हा बदल घडवून आणू शकतो. योग्य व्यायाम, संतुलित आहार आणि त्वचेची काळजी घेतल्यास हा भाग अधिक टोन्ड आणि फिट दिसू शकतो. मांड्यांची त्वचा ढिली पडू नये यासाठी कोणते उपाय आणि (best bed exercises to tone thighs at home) कोणते एक्सरसाइज प्रकार फायदेशीर ठरू शकतात ते पाहूयात... 

मांड्यांची त्वचा लूज पडली असेल तर नेमकं काय करावं ?

मांड्यांची त्वचा लूज पडली असेल तर यासाठी केले जाणारे एक्सरसाइजचे काही खास प्रकार आपण अगदी बेडवर झोपून किंवा बसून देखील करु शकतो. यासाठी तुम्हाला दिवसभरातील वेगळा विशेष वेळ काढण्याची देखील गरजच नाही. सकाळी उठल्यावर अंथरुणातून बाहेर येण्याऐवजी आपण किमान ५ ते १० मिनिटे वेळ काढून जरी हे एक्सरसाइज केले तरी त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. खरंतर, बेडवर झोपून एक्सरसाइज केल्याने तुम्हाला मांड्यांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते आणि स्नायूंचा सहभाग पूर्णपणे होतो. 

१. साईड थाईज रेसेज (Side Thigh Raises) :- बेडवर एका बाजूला (कुशीवर) झोपा आणि वरचा पाय गुडघ्यातून मोडून पोटाच्या समोर ठेवा आणि दुसरा पाय वर उचलण्याचा प्रयत्न करा. पुढे ठेवलेल्या पायामुळे दुसरा पाय उचलणे थोडे कठीण जाईल आणि तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे गुंतून (Engaged) हा व्यायाम पुन्हा करावा लागेल. यामुळे 'लेग कंट्रोल' सुधारतो आणि शरीराच्या खालच्या भागाला (Lower body) आधार मिळतो.

तूप खाऊन रुप येईल आणि वजनही होईल कमी, तज्ज्ञांचा सल्ला ‘असं’ खा तूप आणि बदलेल फिटनेस खूप...

२. पिलो स्क्विज (Pillow Squeeze) :- पिलो स्क्विज व्यायाम मांड्यांच्या आतील स्नायूंमध्ये तणाव निर्माण करेल, ज्यामुळे हा भाग जास्त मजबूत होईल. सोबतच हा व्यायाम हिप स्टेबिलिटी आणि लेग कंट्रोलमध्येही मदत करेल. पेल्विक फ्लोअर मजबूत करण्यासाठी देखील हा व्यायाम करणे फायदेशीर ठरते. हा व्यायाम करण्यासाठी बेडवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यातून मोडा. आता दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये उशी (Pillow) अडकवा आणि वेगाने गुडघ्यांच्या मदतीने ती दाबा. असे केल्याने मांड्यांचे स्नायू जास्त गुंतले जातात आणि टोन्ड होतात.

तुम्ही तेल नाही पॉयझन खाताय, तुमचं तेल करतेय हृदयावर ‘विष प्रयोग!’पाहा कोणतं तेल जास्त चांगलं कोणतं घातक...

३. ग्लूट ब्रिज एक्सरसाइज विथ थाईज स्क्विज (Glute Bridge Exercise with Thigh Squeeze) :- दोन्ही पायांच्या मध्ये उशी अडकवून कंबरेपासून हिप्सपर्यंतचा भाग वर उचला. या दरम्यान दोन्ही हात कंबरेजवळ जमिनीवर स्थिर ठेवा. १५ ते २० वेळा याची पुनरावृत्ती करा. हा व्यायाम लोअर बॉडीमधील समन्वय (Coordination) वाढवतो. पेल्विक फ्लोअर स्नायूंना मजबूत बनवण्यासोबतच मांड्यांच्या आतील बाजूचे सैल झालेले स्नायू घट्ट (Tight) करण्यास यामुळे मदत मिळते.

पोट साफ नाही, तासंतास वॉशरुममध्ये बसता? वाटीभर दही आणि गुळाचा हा उपाय एकदम असरदार...

४. सीटेड इनर थाई पल्सेज (Seated Inner Thigh Pulses) :- बेडवर बसून पाय जमिनीवर लटकवा आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये बॉल अडकवून तो दाबा. दोन्ही मांड्यांच्या मध्ये बॉल अडकवून दाबल्याने पायांवरील नियंत्रण अधिक चांगले होते. वाढत्या वयातील लोकांसाठी पायांमध्ये समन्वय साधण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे.

५. साईड लेग सर्कल (Side Leg Circle) :- बेडवर आरामात झोपा आणि कुशीवर व्हा. आता डोक्याखाली हात ठेवून डोके थोडे वर करा. कुशीवर झोपल्यावर जो पाय वरच्या बाजूला असेल तो हवेत उचला आणि हवेतच कमीत कमी १५ ते २० वेळा गोल फिरवा (सर्कल करा). अशाच प्रकारे दुसऱ्या कुशीवर होऊन दुसऱ्या पायाने व्यायाम करा. हे व्यायाम पायांची मूलभूत ताकद टिकवून ठेवण्यास मदत करतात. सोबतच यामुळे हिप सपोर्ट वाढतो आणि मांड्यांचे स्नायू टोन्ड होतात.

Web Title : जांघों को करें टाइट: टोन्ड पैरों के लिए 5 आसान व्यायाम

Web Summary : उम्र के साथ ढीली होती जांघों के लिए बिस्तर पर ही करें ये आसान व्यायाम। इनसे कोलेजन बढ़ता है, मांसपेशियां मजबूत होती हैं, और त्वचा में कसाव आता है। बिना महंगे क्रीम और उपकरणों के पाएं टोन्ड पैर।

Web Title : Tighten Thighs: 5 Bed Exercises for Toned, Youthful Legs

Web Summary : Combat sagging thighs with age using these simple bed exercises. They boost collagen, tone muscles, and improve skin elasticity, offering a non-invasive solution for firmer, youthful-looking legs without needing special equipment or creams.