Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोटावरची, कंबरेवरची चरबी खूपच वाढली? 'बॉडी ट्विस्ट' करा- काही दिवसांतच व्हाल स्लीम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2025 16:20 IST

Body Twist to Get Rid of Tummy Fat: पोटावरची, कंबरेवरची चरबी वाढली असल्यास ती कमी करण्यासाठी पुढे सांगितलेले काही व्यायाम करून पाहा..(exercise to loose belly fat) 

बऱ्याच जणींच्या बाबतीत असं असतं की बाकी हात, पाय अगदी सुडौल असतात. दंड, मांड्या प्रमाणशीर असतात. पण पोटावर मात्र खूप चरबी जमा झालेली असते. ओटीपोट सुटलेलं असतं. साधारणपणे बाळंतपण झालेल्या बहुतांश महिलांच्या बाबतीत हेच दिसून येतं. शिवाय कंबरेवरची चरबीही खूप वाढलेली असते. यामुळे त्या महिला लठ्ठ आणि बेढब दिसू लागतात. पण काही व्यायाम जर नियमितपणे केले तर कंबर आणि पोटावरची चरबी नक्कीच कमी होऊ शकते. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा..(exercise to loose belly fat)

 

कंबर आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सोपे बॉडी ट्विस्ट

कंबर आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काही विशिष्ट पद्धतीने शरीराची हालचाल केली तर खूप फायदा होऊ शकतो. यालाच आपण बॉडी ट्विस्ट म्हणताे. ते  नेमके कसे करायचे ते पाहूया..

नातवापासून आजीपर्यंत सर्वांनी लावावा ‘असा’ मस्त घरगुती फेसपॅक- दिवाळीत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येईल तेज

१. सगळ्यात पहिला बॉडी ट्विस्ट करण्यासाठी भिंतीकडे पाठ करून भिंतीच्या थोडं जवळ उभे राहा. दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर घ्या. यानंतर उजव्या बाजुला वळून दोन्ही तळहात भिंतीला लावा. त्यानंतर डाव्या बाजुला वळून पुन्हा दोन्ही तळहात भिंतीला लावा. असं साधारण दोन्ही बाजुंनी ५० वेळा तरी करा. यामुळे कंबरेवरची चरबी कमी होईल.

२. यानंतर दोन्ही तळहात भिंंतीला लावा. उजवा पाय उचलून तो शक्य तेवढा डाव्या बाजुला घ्या. यानंतर तो पुन्हा जागेवर ठेवा आणि आता डावा पाय उचलून तो शक्य तेवढा उजव्या बाजुला घ्या. हा व्यायामही कमीतकमी ५० वेळा करा.

 

३. यानंतर दोन्ही तळहात भिंतीला लावा. उजवा पाय गुडघ्यात दुमडून साधारण छातीपर्यंत वर उलचा. त्यानंतर तो पाय खाली ठेेवून डावा पाय उचला. असं एकानंतर एक ४ ते ५ मिनिटे करा.

काही केल्या केस गळणं थांबेना? 'या' काळ्या बिया खा, केस होतील दाट, लांब 

४. दोन्ही तळहात भिंतीला लावून उभे राहा. उजवा पाय गुडघ्यात दुमडून वर उचला आणि तो डाव्या तळहाताच्या खाली ठेवा. अशाच पद्धमीने डाव्या पायाचेही करा. हा व्यायामही एका नंतर एक या पद्धतीने ४ ते ५ मिनिटे करावा. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Reduce belly fat with 'body twist' exercises for a slim figure.

Web Summary : Struggling with belly and waist fat? Body twist exercises can help you get a slim figure. Simple wall exercises involving twists and leg movements can reduce fat with regular practice.
टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामवेट लॉस टिप्स