Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > जाडजूड थुलथुलीत दंडही दिसतील स्लिम आणि सुडौल, ५ टिप्स-‘या’ बाह्यांमुळे हात दिसतात सुरेख

जाडजूड थुलथुलीत दंडही दिसतील स्लिम आणि सुडौल, ५ टिप्स-‘या’ बाह्यांमुळे हात दिसतात सुरेख

Even thick and chubby hands will look slim and shapely, 5 tips will make your hands look beautiful : हाताजवळची चरबी कमी करण्यासाठी टिप्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2026 19:05 IST2026-02-24T19:02:09+5:302026-02-24T19:05:36+5:30

Even thick and chubby hands will look slim and shapely, 5 tips will make your hands look beautiful : हाताजवळची चरबी कमी करण्यासाठी टिप्स.

Even thick and chubby hands will look slim and shapely, 5 tips will make your hands look beautiful | जाडजूड थुलथुलीत दंडही दिसतील स्लिम आणि सुडौल, ५ टिप्स-‘या’ बाह्यांमुळे हात दिसतात सुरेख

जाडजूड थुलथुलीत दंडही दिसतील स्लिम आणि सुडौल, ५ टिप्स-‘या’ बाह्यांमुळे हात दिसतात सुरेख

महिलांमध्ये वजन वाढणे ही समस्या जास्त प्रमाणात अढळून येते. पोटाजवळ किंवा हातापाशी जास्त फॅट्स जमा होतात. वजन फार वाढलेले नसले तरी दंड जाड दिसू लागतो. (Even thick and chubby hands will look slim and shapely, 5 tips will make your hands look beautiful)स्लिव्हलेस किंवा फिटिंग कपडे घालताना संकोच वाटतो. मात्र योग्य व्यायाम, आहार आणि थोडी स्मार्ट स्टायलिंग केल्यास दंडाचा आकार नियंत्रित ठेवता येतो आणि तो कमीही दिसू शकतो.

दंडाचा आकार कमी करण्यासाठी सर्वप्रथम शरीरातील एकूण चरबी कमी करणे आवश्यक असते. कारण  एकाच भागातील चरबी वेगळी कमी करता येत नाही. रोज किमान ३० मिनिटे जलद चालणे, जॉगिंग किंवा स्कीपिंग यासारखा कार्डिओ व्यायाम केल्याने फॅट बर्न होण्यास मदत होते. त्यासोबत दंडासाठी खास व्यायाम करणेही महत्त्वाचे आहे. वॉल पुश-अप्स, ट्रायसेप डिप्स, प्लँक, डंबेल्ससह आर्म कर्ल्स किंवा पाण्याच्या बाटल्या वापरून केलेले व्यायाम दंड कमी करण्यास मदत करतात. आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस हे व्यायाम केल्यास फरक जाणवू लागतो.

आहाराकडे लक्ष देणेही तितकेच गरजेचे आहे. जास्त साखर, तळलेले पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड टाळावे. प्रथिनयुक्त आहार डाळी, मूग, पनीर यांचा समावेश केल्याने स्नायू मजबूत होतात आणि त्वचा सैल पडत नाही. पुरेसे पाणी पिणेही आवश्यक आहे, कारण शरीरातील सूज कमी होण्यास त्याचा फायदा होतो.

व्यायामासोबतच योग्य कपड्यांची निवड केल्यास दंडाचा आकार कमी दिसू शकतो. फार टाईट आणि लहान स्लिव्ह्ज टाळाव्यात. त्याऐवजी थोड्या सैल, एल्बो लेंग्थ किंवा तीन-चतुर्थांश स्लीव्ह्ज निवडल्यास हात छान दिसतात. फ्लोइंग फॅब्रिक जसे की जॉर्जेट, कॉटन ब्लेंड किंवा सॉफ्ट फॅब्रिक वापरल्यास हातावर घट्ट पकड बसत नाही आणि आकार उठून दिसत नाही. गडद रंगांचे कपडे दंड सडपातळ दाखवतात, तर खूप मोठे प्रिंट्स असतील तर हात जाड दिसू शकतात. स्लीव्हलेस घालताना खूप घट्ट कट असलेले डिझाईन टाळून थोडे लूज कट निवडावेत. कॅप स्लिव्ह्ज अनेकदा दंडाचा सर्वात जाड भाग हायलाइट करतात, त्यामुळे त्या टाळणे योग्य. तसेच दुपट्टा किंवा श्रगसारखी लेयरिंग केल्यासही दंडाचा आकार कमी जाणवतो.
 

Web Title : स्लिम बांहें: प्रभावी ढंग से चर्बीयुक्त बांहों को टोन करने के 5 उपाय

Web Summary : कार्डियो, लक्षित व्यायाम और प्रोटीन युक्त आहार से बांह की चर्बी कम करें। पतला दिखने के लिए बहने वाले कपड़े, कोहनी की लंबाई वाली आस्तीन और गहरे रंग चुनें। तंग आस्तीन से बचें और श्रग के साथ लेयरिंग मदद कर सकती है।

Web Title : Slim Arms: 5 Tips to Tone Chubby Arms Effectively

Web Summary : Reduce arm fat with cardio, targeted exercises, and a protein-rich diet. Choose flowing fabrics, elbow-length sleeves, and darker colors for a slimmer look. Avoid tight sleeves and layering with shrugs can help.