Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > कतरीना, दीपिकाची फिटनेस ट्रेनर सांगते, १० मिनिटे करा सोपे एक्सरसाइज - जिमला न जाताच मिळेल परफेक्ट फिगर...

कतरीना, दीपिकाची फिटनेस ट्रेनर सांगते, १० मिनिटे करा सोपे एक्सरसाइज - जिमला न जाताच मिळेल परफेक्ट फिगर...

easy pilates workout without gym : home fitness routine by yasmin karachiwala : katrina kaif fitness secrets pilates workout : deepika padukone pilates exercises at home : simple pilates workout for beginners at home : जिमला न जाता, रोज फक्त १० मिनिटे हे वर्कआऊट करून आपण बॉलिवूड अभिनेत्रींसारखी फिगर करु शकता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2025 17:34 IST2025-09-24T17:20:45+5:302025-09-24T17:34:54+5:30

easy pilates workout without gym : home fitness routine by yasmin karachiwala : katrina kaif fitness secrets pilates workout : deepika padukone pilates exercises at home : simple pilates workout for beginners at home : जिमला न जाता, रोज फक्त १० मिनिटे हे वर्कआऊट करून आपण बॉलिवूड अभिनेत्रींसारखी फिगर करु शकता...

easy pilates workout without gym home fitness routine by yasmin karachiwala katrina kaif fitness secrets pilates workout imple pilates workout for beginners at home | कतरीना, दीपिकाची फिटनेस ट्रेनर सांगते, १० मिनिटे करा सोपे एक्सरसाइज - जिमला न जाताच मिळेल परफेक्ट फिगर...

कतरीना, दीपिकाची फिटनेस ट्रेनर सांगते, १० मिनिटे करा सोपे एक्सरसाइज - जिमला न जाताच मिळेल परफेक्ट फिगर...

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांच्यासारख्या फिटनेस आयकॉनची फिगर पाहून, अनेकींना प्रश्न पडतो की त्या इतक्या फिट कशा राहतात. बहुतेकजणींना त्यांच्या सारखी सुंदर व टोन्ड फिगर हवी असते परंतु, नेमकं तशी फिगर मिळवण्यासाठी करायचं काय हे बऱ्याचजणींना माहीत नसते. सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये, एक्सरसाइज ( home fitness routine by yasmin karachiwala) करण्यासाठी पुरेसा वेळ फारसा कुणालाच नसतो. अशा परिस्थितीत, सेलिब्रिटीजप्रमाणे स्वतःला फिट अँड फाईन ठेवण्यासाठी आपण दिवसभरातील फक्त १० मिनिटे वेळ काढून काही साधेसोपे एक्सरसाइज करु शकतो(imple pilates workout for beginners at home).

वाढलेलं वजन कमी करून स्वतःला फिट अँड फाईन ठेवण्यासाठी तसेच सेलिब्रिटीजसारखी फिगर हवी असल्यास आपण एक्सरसाईजचे काही खास प्रकार नक्की करु शकतो. दीपिका, आलिया आणि कतरीना यांची सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला यांनी नुकतेच त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करून, स्वतःला कसे फिट ठेवू शकतो याबद्दल माहिती दिली आहे. रोज फक्त १० मिनिटे हे वर्कआऊट करून आपण बॉलिवूड अभिनेत्रींसारखी फिगर करु शकता. 

रोज १० मिनिटे करा या साध्यासोप्या एक्सरसाइज...  

१. रोल डाउन टू प्लँक (Roll Down to Plank) :- रोल डाउन टू प्लँक करण्यासाठी सरळ उभे रहा. हळू हळू कंबरेतून वाकत आपले हात जमिनीच्या दिशेने न्या. नंतर हातांना जमिनीला टेकवत पुढे - पुढे सरकवून प्लँक स्थितीत या (यामध्ये तुमचे डोके ते टाचांपर्यंत शरीर सरळ रेषेत असावे). थोडा वेळ थांबा आणि मग हात हळू हळू मागे खेचत पुन्हा सरळ उभे रहा.

फायदा :-  यामुळे पोट, पाठ आणि खांदे मजबूत होतात आणि शरीराचा तोल (balance) सुधारतो.

२. लेग पुल फ्रंट (Leg Pull Front) :-  प्लँक स्थितीत या. आता एक-एक करून आपले पाय वर उचला. हे करताना तुमची कंबर स्थिर राहील याची काळजी घ्या.

फायदा :- यामुळे पोट, मांड्या आणि पायांचे स्नायू टोन होतात आणि शरीराचा तोल सुधारतो. 

३. सीटिंग स्पाइन ट्विस्ट (Seating Spine Twist) :- पाय समोर पसरून सरळ बसा आणि पाय हलकेच दुमडून थोडे वर घ्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत समोर पसरवा. आता कंबरेपासून शरीराला एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे वळवा. दुसऱ्या बाजूलाही हीच क्रिया पुन्हा करा.

फायदा :- यामुळे मणक्याची (spine) लवचिकता वाढते आणि पोटाच्या बाजूचे (side) स्नायू मजबूत होतात.

४. स्विमिंग ऑफ हंड्रेड्स (Swimming of Hundreds) :- पोटावर झोपून, पाय आणि हात जमिनीपासून थोडे वर उचला. (जसे आपण स्विमिंग करताना करतो तसे)  दोन्ही हात वर-खाली वेगाने हलवा. पाच वेळा श्वास आत घ्या आणि पाच वेळा बाहेर सोडा. अशा प्रकारे १०० वेळा पूर्ण करा. त्यानंतर हीच क्रिया पाठीवर झोपून देखील करावी. 

फायदा :- पोटाचे स्नायू अ‍ॅक्टिव्ह होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि श्वास चांगल्या प्रकारे घेता येतो.

५. बॉलसारखे गोलाकार फिरणे (Rolling like a Ball) :- जमिनीवर बसून मग दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून छातीजवळ आणावेत. दोन्ही पाय हाताने  दाब देत छातीजवळ आणावेत. त्यानंतर पाठ जमिनीला टेकवून  पुन्हा वर उठा. एखादी पंचिंग बॅग जशी हालते तशा स्थितीत एखाद्या चेंडू प्रमाणे शरीराची हालचाल करा.  

फायदा :- यामुळे मणक्याची लवचिकता वाढते, पाठ मजबूत होते आणि शरीराचा समतोल सुधारतो.


Web Title: easy pilates workout without gym home fitness routine by yasmin karachiwala katrina kaif fitness secrets pilates workout imple pilates workout for beginners at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.