Lokmat Sakhi >Fitness > उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक नको ऊसाचा रस रोज पिताय? त्वचेच्या समस्यांसह ४ आजार जीव नको करतील...

उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक नको ऊसाचा रस रोज पिताय? त्वचेच्या समस्यांसह ४ आजार जीव नको करतील...

Is sugarcane juice good for diabetes: Is sugarcane harmful to health: Sugarcane juice side effects: How sugarcane impacts diabetes: Sugarcane juice for liver detoxification: Sugarcane as a low-calorie alternative: Sugarcane juice benefits for skin: Is sugarcane juice good for children: Sugarcane for hydration and energy: Sugarcane juice and oral health: ऊसाचा अधिक प्रमाणात रस प्यायल्याने शरीराला नुकसानही होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 15:14 IST2025-03-05T15:13:12+5:302025-03-05T15:14:35+5:30

Is sugarcane juice good for diabetes: Is sugarcane harmful to health: Sugarcane juice side effects: How sugarcane impacts diabetes: Sugarcane juice for liver detoxification: Sugarcane as a low-calorie alternative: Sugarcane juice benefits for skin: Is sugarcane juice good for children: Sugarcane for hydration and energy: Sugarcane juice and oral health: ऊसाचा अधिक प्रमाणात रस प्यायल्याने शरीराला नुकसानही होते.

drinking sugarcane juice in daily during summer season skin issue diabetes and obesity disease harm your health | उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक नको ऊसाचा रस रोज पिताय? त्वचेच्या समस्यांसह ४ आजार जीव नको करतील...

उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक नको ऊसाचा रस रोज पिताय? त्वचेच्या समस्यांसह ४ आजार जीव नको करतील...

उन्हाळा सुरु झाला की, आपल्या थंडगार पेय पिण्याची इच्छा होते. शरीराला थंडावा देण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक किंवा ऊसाचा रस आपण पितो. (Is sugarcane juice good for diabetes) ऊसाच्या रसाचे आरोग्याला जितके फायदे आहेत तितकेच तोटे आहेत.(sugarcane juice side effects) ऊसाच्या रसात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, पोटॅशिअम, मिनरल्सारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. हे सगळे शरीराला पोषक तत्व देतात. परंतु, ऊसाचा अधिक प्रमाणात रस प्यायल्याने शरीराला नुकसानही होते. (Is sugarcane juice good for children)


तज्ज्ञांच्या मते ऊसाचा रस एका दिवसात दोन ग्लासापेक्षा जास्त प्रमाणात पिऊ नये. एका ऊसाच्या रसाच्या ग्लासात २५० कॅलरी  आणि १०० ग्रॅम शुगर असते. तसेच यामुळे वजनही वाढते. ऊसामध्ये हिट अधिक प्रमाणात असल्याने आपल्याला आरोग्याच्या इतर समस्यांना देखील सामोरं जावं लागतं. (Sugarcane juice and oral health) ऊसाचा रस अतिप्रमाणात प्यायल्याने काय होऊ शकतं, जाणून घेऊया. 

स्वयंपाक करताना भाजीत इन्स्टंट नूडल्स मसाला घालता? आहारातज्ज्ञ सांगतात, वाढतो हायपरटेन्शनचा धोका वाढतोय कारण..

1. मधुमेह 


ऊसाच्या रसात ग्लायसेमिक इंडेक्स कमी ग्लायसेमिक लोड जास्त प्रमाणात असते. यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. तसेच हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि नसांवर परिणाम होऊन विविध आजार उद्भवू शकतात. यामध्ये साखरचे नैसर्गिक प्रमाण जास्त असते. 

2. दाताच्या समस्या 

ज्या लोकांना दाताच्या समस्या आहेत त्यांनी ऊसाचा रस पिणे टाळावे. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने तोंडात बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करते. जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने ती दातांमध्ये पोकळी निर्माण होते, ज्यामुळे दात किडणे, दात दुखी सारख्या समस्या उद्भवतात. 

3. लठ्ठपणा 

ऊसाच्या रसात कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे वजन झपाट्याने वाढते. शरीराला प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीज मिळाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे गोडाचे प्रमाण कमी करायला हवे.जर आपण दिवसभरात ५ ते ६ ग्लास ऊसाचा रस प्यायलो तर शरीराला नुकसान होऊ शकते. पोट खराब होऊन उलटी, मळमळ किंवा चक्कर येण्याचा धोका वाढू शकतो. 

4. त्वचेचे विकार 

ऊसाच्या  रसात साखरेचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वृद्धत्वाची प्रक्रिया जलद होते. जेव्हा साखरेचे प्रमाण अधिक वाढते तेव्हा रक्तप्रवाहातील संयुगे वाढून त्वचेतील लवचिकपणा कमी होऊन कोलेजनला नुकसान होते. 

 

Web Title: drinking sugarcane juice in daily during summer season skin issue diabetes and obesity disease harm your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.