Lokmat Sakhi >Fitness > साइड बेली फॅटमुळे बेढब दिसता? दिसणंच नाही तर तब्येतीसाठीही अत्यंत घातक, पाहा चरबी वाढण्याचे कारण

साइड बेली फॅटमुळे बेढब दिसता? दिसणंच नाही तर तब्येतीसाठीही अत्यंत घातक, पाहा चरबी वाढण्याचे कारण

Does side belly fat make you look ugly? it is dangerous for your health, see how : कंबरेच्या बाजूला चरबी वाढली असेल तर जाणून घ्या त्याचे कारण. पाय बारीक आणि पोट बाहेर असे का होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2025 10:05 IST2025-06-03T10:02:22+5:302025-06-03T10:05:05+5:30

Does side belly fat make you look ugly? it is dangerous for your health, see how : कंबरेच्या बाजूला चरबी वाढली असेल तर जाणून घ्या त्याचे कारण. पाय बारीक आणि पोट बाहेर असे का होते.

Does side belly fat make you look ugly? it is dangerous for your health, see how | साइड बेली फॅटमुळे बेढब दिसता? दिसणंच नाही तर तब्येतीसाठीही अत्यंत घातक, पाहा चरबी वाढण्याचे कारण

साइड बेली फॅटमुळे बेढब दिसता? दिसणंच नाही तर तब्येतीसाठीही अत्यंत घातक, पाहा चरबी वाढण्याचे कारण

शरीराची चरबी वाढते म्हणजे नक्की काय होते? जेव्हा चरबीत वाढ होत जाते तेव्हा सगळेच अवयव फुगत नाहीत. काही ठराविक अवयवांवर चरबी जास्त जमा होते. (Does side belly fat make you look ugly? it is dangerous for your health, see how)जसे की काहींच्या मांड्या जास्त जाड असतात तर काहींचे दंड. बरेचदा फॅट्स  काही विशिष्ट अवयवांभोवती जमा होतात. ते कमी करण्यासाठी उपायही वेगळे करावे लागतात. असे बरेच जण असतात ज्यांचे हात पाय बारीक असतात. मात्र त्यांचे पोट फार सुटलेले असते. महिलांमध्ये ओटीपोट सुटायचे प्रमाण जास्त असते. तसेच साईड बेली फॅट्स फार दिसतात. साडी नेसल्यावर किंवा साध्या कुर्त्यातूनही दिसून येतात. त्यामुळे वाकताना, चालतानाही त्रास होतो.  

चरबी साठते कारण शरीराची ती प्रवृत्ती असते. शरीररचना प्रत्येकाची वेगळी आहे. त्यामुळे काहींचे पोट समोर सुटते तर काहींचे कंबरेच्या बाजूने सुटायला लागते. (Does side belly fat make you look ugly? it is dangerous for your health, see how)हे फॅट्स भरपूर साखर प्रक्रिया केलेल्या पदार्थ जास्त प्रमाणात खाल्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरिज वाढायला लागतात. त्या कॅलरिज पचत नाहीत आणि  त्या यामुळे कंबरेच्या भागात चरबीच्या रुपात साठतात. व्यसनांमुळेही पोटाजवळची चरबी वाढते. 

१. सर्वप्रथम साधा उपाय म्हणजे बाहेरचे अन्न खाणे बंद करायला हवे. धान्ये, भाज्या, फळे असे पदार्थ खाण्यावर भर द्यावा. 

२.कंबरेवर ताण पडेल असे व्यायाम करायला हवेत. कार्डिओ करा. सायकल चालवा. धावायला जात जा. योगासने करायला शिका. भरपूर पाणी प्या. म्हणजे अन्न जिरेल आणि चरबीत रुपांतर होणार नाही.      


३. काही व्यसने असतील तर ती टाळा. रोज किमान सात ते आठ तासांची शांत झोप घ्या. वेळेत झोपा तसेच वेळेत उठा. 

४. रात्री उशीरा काहीही खाऊ नका. वेळ ठरवा आणि योग्य वेळेतच जेवण करा. एका ठराविक वेळे नंतर खाल्लेले अन्न पचत नाही असे डॉक्टरही सांगतात.   

साइड बेली फॅट्स दिसायला विचित्र दिसते अशी तक्रार अनेकांची असते. मात्र ते केवळ दिसण्याच्या दृष्टिकोनातूनच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही त्रासदायक ठरु शकतात. कारण या प्रकारची चरबी हृदयविकार तसेच मधुमेह आणि इतर काही आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते. वेळीच उपाय केलेले चांगले. 

Web Title: Does side belly fat make you look ugly? it is dangerous for your health, see how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.