Join us  

घाईघाईत बकाबका ५ मिनिटांत जेवता? संशोधन सांगते, वजन वाढण्यापासून पित्ताच्या त्रासाचं महत्त्वाचं कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 4:56 PM

Does eating fast, chewing fast make you gain more weight : जे भरभर जेवतात, त्यांचं वजनही वाढतं-पोटही बिघडतं, असं तुमच्यासोबतही होतं का?

अन्न सावकाश आणि चघळत खायला हवे, असे आपण आपल्या वडिलधाऱ्यांकडून ऐकलेच असेल. पण धावपळीच्या या जीवनात भरभर खाल्ल्याशिवाय पर्याय उरत नाही. कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे बरेच जण जेवण स्किप करतात, किंवा भरभर खातात. पण भरभर खाल्ल्याने वजन वाढते, असे आपण अनेकांकडून ऐकले असेल. खरंच भरभर खाल्ल्याने वजन वाढते का? पदार्थ नीट चावून खाण्याचे फायदे किती?(Does eating fast, chewing fast make you gain more weight).

प्रत्येक घास नीट चावून खा

जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, प्रत्येक घास नीट चावून खा. अन्न सावकाश आणि आरामात खाल्ल्याने अन्न व्यवस्थित पचते, शिवाय पचनक्रियेत कोणतीही बाधा येत नाही. यासह शरीर पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेते.

वजन कमी करताना खाणं सोडत असाल तर थांबा! वाढतील पोटाचे विकार-दवाखान्यात वाढतील चकरा

स्टडीमध्ये झाला खुलासा..

अमेरिकन हेल्थ वेबसाईट, हेल्थलाइन. कॉमनुसार 'जे लोकं हळू-हळू प्रत्येक घास चघळून खातात, त्यांच्या तुलनेत भरभर पदार्थ खाण्याऱ्यांना लठ्ठपणाचा धोका अधिक असतो. काही पुरुषांसोबत एक स्टडी करण्यात आली होती. या स्टडीमध्ये असे आढळून आले की, जे लोकं भरभर खातात, त्यांचे वजन सावकाश खाण्याऱ्यांच्या तुलनेत लवकर वाढते.'

मेंदूला मिळतो सिग्नल

आपली भूक आणि आपण किती कॅलरीचे सेवन करत आहोत, याचा थेट संबंध हार्मोन्सशी जोडला जातो. अन्न खाल्ल्यानंतर आतडे घेरलिन नावाचे हार्मोन दाबते. जे भूक नियंत्रित करते, व पोट भरणारे हार्मोन रिलीज करते. या प्रक्रियेला साधारण २० मिनिटे लागतात. या २० मिनिटात मेंदू आपल्याला खाणे बंद केले पाहिजे असे सिग्नल देते.

तेलकट खाल्लं तरी वजन वाढणार नाही, लक्षात ठेवा ३ मुख्य गोष्टी, वाढलेलं वजनही उतरेल चटकन

अन्न नीट चावून खा मगच..

अन्न गिळण्यापूर्वी जर आपण नीट चघळून खात असाल तर, त्यातील कॅलरीजचे प्रमाण कमी होऊ शकते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले, की ज्यांना वजन वाढीची समस्या आहे, ते लोकं इतरांच्या तुलनेत भरभर खातात. जर आपण अन्न नेहमीपेक्षा दीडपट अधिक वेळ चघळून खात असाल तर, त्या घासातील कॅलरीजचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स