>फिटनेस > काहींचं वजन सरसर वाढतं? काहींचं कितीही खा वाढतच नाही, असं का होतं?

काहींचं वजन सरसर वाढतं? काहींचं कितीही खा वाढतच नाही, असं का होतं?

आपण आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खातो की कमी? पहा गणित करुन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 03:31 PM2021-04-12T15:31:34+5:302021-04-12T15:33:52+5:30

आपण आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खातो की कमी? पहा गणित करुन..

BMR & Total Daily Energy Expenditure- weight loss & gain problem and fitness. | काहींचं वजन सरसर वाढतं? काहींचं कितीही खा वाढतच नाही, असं का होतं?

काहींचं वजन सरसर वाढतं? काहींचं कितीही खा वाढतच नाही, असं का होतं?

Next
Highlightsऑनलाईन तुम्हाला सहज BMR calculators मिळतील, बघा शोधून..

स्वप्नाली बनसोडे

सर्व सामान्यपणे जनरली आपल्याला असं वाटतं असतं की फिटनेस म्हणजे काही तरी वेगळं आणि विशेष. खरं पाहता आपण रोज जे खातो आणि आपला दिवस कसा प्लॅन करतो त्यासोबत फिटनेस अगदी सहज साध्य आहे. आज आपण बोलणार आहोत सर्वसामान्य समस्या आणि कुठे सुरवात करायची या विषयी थोडंसं! आपण आजूबाजूला पहिल तर शक्यतो बहुतांश लोक एकतर स्थूलता म्हणजे वजन घटवणे किंवा वजन वाढवणे या दोन गोष्टींचा प्रयत्न करत असतात. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया आपल्या मानसिकतेविषयी. आज काल सगळ्या गोष्टी एक क्लिक लांब आहेत, सगळं कसं इंस्टंटली उपलब्ध आहे. तर असंच आपल्याला लगेच बदल हवा असतो. पण तसं शक्य आहे का?


आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया, आपलं शरीर सगळ्या परिस्थिती मध्ये टिकून राहण्यासाठी बनलेलं आहे. ज्यागोष्टी आपण वर्षानुवर्षे लक्ष न दिल्यामुळे बिघडल्या आहेत त्या एकदम काही दिवसात किंवा काही आठवडयात पूर्णपणे नाहीत बदलणार. आणि तुम्हाला जे गुगल वरती त्वरित उपाय मिळतात ते करून तुम्ही लांब काळ टिकणारे बदल नाहीत घडवून आणू शकतं . जसे  शॉर्टकट्स आयुष्यात लागू पडत नाहीत तसेच फिटनेस मध्येही लागू पडत नाहीत. पटकन फरक हवा म्हणून काहीतरी करायला जाल तर शक्यता आहे की तुम्ही तुमच्या आरोग्याला काही धोका निर्माण करू शकता. फिटनेस मध्ये इतके वेगवेगळे फॅड्स आहेत त्यामुळे हे आवर्जून सांगावंसं वाटतं, योग्य मार्गाने तुम्हाला हवं तसं आणि हवं तिथे आपण पोहचू शकतो.
आता पहिल्यांदा आपण बोलूया आपलं वजन का वाढतं. सगळ्यात सोपं उत्तर आहे जेंव्हा आपण जितकी ऊर्जा वापरतोय किंवा खर्च करतोय त्यापेक्षा जास्त खातोय , याव्यतिरिक्त काही विकार अथवा वंशपरंपरागत प्रवृत्तीमुळे पण असू शकतात. पण सर्वसामान्यपणे जास्त खातो यामुळेच आपलं वजन वाढतं. आजकाल आपली जीवनशैली बघता शारीरिक हालचाल अगदी नाहीच्या बरोबर आहे, त्यामुळे शारीरिक हालचालींमध्ये जी ऊर्जा खर्च व्हायला हवी ती ही अगदी कमी प्रमाणात आहे. 
शेवटचं केंव्हा आठवतंय मोबाइल ठेऊन आवर्जून बाहेर खेळायला गेलो ते?
आता आपण सोप्या शब्दात समजून घेऊया आपलं शरीर कसं ऊर्जा वापरत ते..
पहिली संकल्पना समजून घेऊया ती म्हणजे BMR (बेसिक मेटाबोलिक रेट ) म्हणजे समजा आपण एक दिवस काही न करता फक्त झोपून आहोत तरी काही प्रमाणात ऊर्जा खर्च होत असते. शरीरांतर्गत काही प्रक्रिया सतत चालू असतात, जसं  की डायजेशन (पचन), श्वासोच्छवास, सर्व अंतर्गत अवयव कार्यरत असतात इत्यादी. तर ह्या सगळ्या प्रक्रियांमध्ये काही ऊर्जा खर्च होते. याव्यतिरिक्त आपण दिवसभरात ज्याही हालचाली करतो, बोलतो, वस्तू उचलतो , गप्पा मारतो, ह्या सगळ्यामध्येही काही ऊर्जा खर्च होते. 


आता आपला BMR,  दिवसभरातल्या सगळ्या हालचाली आणि अन्नपचन होण्यासाठी काही ऊर्जा खर्च होते त्याला TDEE ( Total Daily Energy Expenditure ) असं म्हणतात.
आता जेंव्हा आपण या TDEE पेक्षा जास्त खातोय तेंव्हा आपल वजन वाढतं. आणि ज्यांना वजन सहजासहजी वाढत नाही असा प्रॉब्लेम असतो त्या लोकांमध्ये थायरॉईड नावाची ग्रंथी खूप सक्रिय असते. त्यामुळे त्यांचं शरीर सगळया खाण्यातून येणाऱ्या ऊर्जेचं पूर्णपणे वापर केला जातो. तर कुणालाही वजन कमी करायचं? असेल तर TDEE पेक्षा कमी कॅलरी खाण्याची गरज असते आणि ज्यांना वजन वाढवायच आहे त्यांना TDEE पेक्षा जास्त खाण्याची गरज असते. आता हे सगळं कसं कॅलक्युलेट करायचं?
तर सोपं आहे, ऑनलाईन तुम्हाला सहज BMR calculators मिळतील, तिथे तुम्हाला ह्या व्हॅल्यूज किती आहेत ते पाहू शकता. 
बघा शोधून..

(लेखिका अमेरिकािस्थित डाएट आणि फिटनेस एक्सपर्ट आहेत.)

Instagram- the_curly_fit
https://www.facebook.com/fittrwithswapnali
 

Web Title: BMR & Total Daily Energy Expenditure- weight loss & gain problem and fitness.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

आपलं वजन वाढतं आहे हे वेळीच कसं ओळखाल? वजन वाढूच नये म्हणून काय उपाय? - Marathi News | How do you know that you are gaining weight? check these symptoms. What is the solution to not gain weight? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपलं वजन वाढतं आहे हे वेळीच कसं ओळखाल? वजन वाढूच नये म्हणून काय उपाय?

वजन काट्यावर जरी वजन फार दिसत नसले किंवा कुणी म्हणत नसले की तुझे वजन वाढले आहे तरी काही लक्षणं जर आपल्याला जाणवत असतील तर समजावे की आपले वजन वाढते आहे. ...

आहारात प्रोटीन हवं हे मान्य, पण नेमकं आपल्या शरीराला किती प्रोटीन हवं हे कसं ठरवणार? - Marathi News | need protein in diet, for good health, but how to calculate protein intake? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आहारात प्रोटीन हवं हे मान्य, पण नेमकं आपल्या शरीराला किती प्रोटीन हवं हे कसं ठरवणार?

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपल्याला प्रोटीन अर्थातच प्रथिनांची आवश्यकता असते. आपल्या शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी, स्नायूंच्या निर्मितीसाठी, रोगप्रतिकारक क्षमता तयार करण्यासाठी, उत्तम त्वचा आणि केसांसाठी, दातांच्या बळकटीसाठी, मुख्य म्ह ...

पोषण वाडगा : एका वाडग्यात संपूर्ण जेवणही आणि डाएटही ! - Marathi News | Nutrition Bowl: budha Bowl, The whole meal diet, fun in one bowl! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोषण वाडगा : एका वाडग्यात संपूर्ण जेवणही आणि डाएटही !

हल्ली सगळ्यांना सुटसुटीत हवं असते, विशेषकरून खाणेपिणे. ते तर झटपट हवे मात्र पौष्टिकही हवेच. ...

सायंकाळी ५ नंतर होणाऱ्या खाण्यापिण्याच्या ५ चुका, त्या वजन कमी होऊ देत नाहीत. - Marathi News | Dietitians say that the five mistakes that happen after five in the evening do not allow you to lose weight. Those mistakes must be avoided! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सायंकाळी ५ नंतर होणाऱ्या खाण्यापिण्याच्या ५ चुका, त्या वजन कमी होऊ देत नाहीत.

आहार तज्ज्ञांच्या मते संध्याकाळी पाच नंतर केल्या जाणाऱ्या छोट्या मोठ्या चुकांमुळे वजन कमी होत नाही. वजन कमी करायचं असेल तर संध्याकाळी पाच नंतर आपण काय खातो, कसं आणि किती खातो तसेच कधी झोपतो या सवयींवर बारकाईनं काम करायला हवं. ...

वाट्टेल ते वाट्टेल तेव्हा खाणं मध्यमवयाच्या वाटेवर महागात पडतंय ! -हा तपासा तुमचा आहार - Marathi News | neglecting diet, no time for food, and lifestyle disease will trouble you more & early | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाट्टेल ते वाट्टेल तेव्हा खाणं मध्यमवयाच्या वाटेवर महागात पडतंय ! -हा तपासा तुमचा आहार

मध्यमवयातला आहार अधिक जागरुकतेनं घ्यायला हवा, त्याकाळात संतुलीत आहार ठेवला नाही तर चुकीच्या जीवनशैलीने घेरणारे आजार मागे लागतात. ...

थंड गारेगार रसरशीत गझपाचो सूप ! हा स्पॅनिश थंड सूप प्रकार खाऊन प्या, किंवा पिऊन खा! - Marathi News | gazpacho cold soup. try this Spanish dish | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंड गारेगार रसरशीत गझपाचो सूप ! हा स्पॅनिश थंड सूप प्रकार खाऊन प्या, किंवा पिऊन खा!

कोरोना रुग्ण किंवा त्यातून बरे झाले आहेत त्यांनी सूप प्यावे असेही तज्ज्ञ सांगतात. मात्र उन्हाळ्यात गरम सूप कसं पिणार? त्यावर उत्तर हे खास सूप. ...