Join us

वॉक करण्याआधी आणि नंतर 'या' २ गोष्टी करणं गरजेचं, नाही तर सगळी मेहनत जाईल वाया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 11:38 IST

Walking Tips : वॉक करताना वॉर्मअप आणि वॉक झाल्यानंतर कूलडाउन होणं का गरजेचं असतं हे जाणून घेऊ.

Walking Tips : फिटनेस चांगली ठेवण्यासाठी भरपूर लोक रोज वॉक करतात. वॉक करण्याचे अनेक फायदे शरीराला मिळतात. वजन तर कमी होतंच, सोबतच हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं आणि मसल्सही मजबूत होतात. ज्या लोकांना जिममध्ये जाण्याचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी वॉक करणं परफेक्ट एक्सरसाईज ठरते. जर योग्य पद्धतीनं वॉक केला तर याचे अनेक फायदे मिळतात. बरेच लोक वॉक करतात, पण त्यांना वॉक करण्याची योग्य पद्धत माहीत नसते. तिच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वॉक करताना वॉर्मअप आणि वॉक झाल्यानंतर कूलडाउन होणं का गरजेचं असतं हे जाणून घेऊ.

वॉकआधी वॉर्मअप गरजेचा

वॉक सुरू करण्याआधी काही मिनिटं वॉर्मअप करणं गरजेचं अससतं. वॉर्म करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे हळूहळू चालणं ही आहे. म्हणजे छोट्या छोट्या स्टेप्सनं चालावं. ज्यामुळे मांसपेशींना वॉर्मअपसाठी वेळ मिळतो. सुरूवात हळू करा आणि नंतर स्पीड वाढवा. वॉक करण्याआधी पायांच्या मांसपेशींना हळूहळू स्ट्रेच करा. मांड्यांना स्ट्रेच करा. पाय साधारण २० मिनिटं स्ट्रेच करा. जर जास्त वेदना किंवा ताण पडत असेल तर थोडं थांबावं. वॉर्मअप करताना एकदम झटके देऊ नका आणि जोरात उड्या मारू नका. 

वॉकनंतर बॉडी करा कूलडाउन

ज्याप्रमाणे कोणताही व्यायामाची सुरूवात हळुवार करायची असते, त्याचप्रमाणे कोणत्याही फिजिकल अ‍ॅक्टिविटीला हळुवारपणेच शांत करावं. असं केल्यानं मांसपेशींमध्ये आखडलेपणा आणि इजा होण्याचा धोका कमी असतो. यामुळे वॉक संपल्यावर काही वेळ हलक्या स्पीडनं चला. थोडं स्ट्रेचिंग करा आणि नंतर वॉक करणं बंद करा. यानं मसल्स रिलॅक्स होतील.

या गोष्टींचीही घ्या काळजी

वॉक किंवा कोणतीही फिजिकल अ‍ॅक्टिविटी तुम्ही करता तेव्हा काही गोष्टींची खास काळजी घ्यावी लागते. जर असं केलं नाही तर तुमची मेहनत वाया जाऊ शकते. व्यायाम करताना सैल कपडे घाला. कारण यावेळी घाम जास्त येतो. एक्सरसाईज किंवा वॉक करताना शरीराचं तापमान वाढतं. त्यामुळे जास्त कपडे घालणं टाळा.

वॉक करताना आरामदायक शूज वापरा. शूज वापरल्यास पायांवर जास्त प्रेशर पडणार नाही. चांगले शूज घालून वॉक केल्यास पायांना आराम मिळतो. यामुळे तुम्ही जास्त वेळ वॉक करू शकता.

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम