lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > लॅपटॉप- कम्प्यूटरवर सतत काम करून खांदे, मान- पाठ आखडली? फक्त ३० सेकंदाचा व्यायाम, लगेच वाटेल रिलॅक्स

लॅपटॉप- कम्प्यूटरवर सतत काम करून खांदे, मान- पाठ आखडली? फक्त ३० सेकंदाचा व्यायाम, लगेच वाटेल रिलॅक्स

How To Reduce Back Pain, Shoulder Pain: लॅपटॉप- डेस्कटॉपवर (laptop or computer) सलग काही तास काम केलं की मान- पाठ दुखायला लागते.. म्हणूनच श्री श्री रविशंकर यांनी सांगितलेला हा उपाय करून पाहा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 05:04 PM2023-09-18T17:04:49+5:302023-09-18T17:08:30+5:30

How To Reduce Back Pain, Shoulder Pain: लॅपटॉप- डेस्कटॉपवर (laptop or computer) सलग काही तास काम केलं की मान- पाठ दुखायला लागते.. म्हणूनच श्री श्री रविशंकर यांनी सांगितलेला हा उपाय करून पाहा....

Back pain, shoulder pain due to continuous work on laptop or computer, Simple remedy to get rid of back pain | लॅपटॉप- कम्प्यूटरवर सतत काम करून खांदे, मान- पाठ आखडली? फक्त ३० सेकंदाचा व्यायाम, लगेच वाटेल रिलॅक्स

लॅपटॉप- कम्प्यूटरवर सतत काम करून खांदे, मान- पाठ आखडली? फक्त ३० सेकंदाचा व्यायाम, लगेच वाटेल रिलॅक्स

Highlightsफक्त ३० सेकंदाचा हा उपाय असून तुम्ही तो ऑफिसमध्ये बसूनही अगदी सहज करू शकता.

हल्ली ८ ते ९ तास सलगपणे लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर काम करत बसणाऱ्यांची संख्या खूप आहे. १० ते १२ मिनिटांचे २- ३ ब्रेक सोडले तर अनेक जण सातत्याने काम करत असतात. अनेकदा वर्क फ्रॉम होम करणारे चुकीच्या पोझिशनमध्ये बसतात. त्यामुळेही मान- पाठ आखडून जाते. शिवाय प्रत्येक ऑफिसमधली सिटिंग अरेंजमेंटही आरामदायी असेलच असे नाही. त्यामुळेही मान- पाठ दुखायला लागते. म्हणूनच असा त्रास कमी करण्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी सुचवलेला हा उपाय करून बघा (Back pain, shoulder pain due to continuous work on laptop or computer). फक्त ३० सेकंदाचा हा उपाय असून तुम्ही तो ऑफिसमध्ये बसूनही अगदी सहज करू शकता. (Simple remedy to get rid of back pain)

 

लॅपटॉपवर काम करून मान- पाठ दुखत असल्यास उपाय

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ बसा. अगदी ऑफिसच्या खुर्चीवर बसूनही तुम्ही हा उपाय करून पाहू शकता.

यानंतर दोन्ही हात वर करा आणि हाताची बोटे मोकळी करा.

गणपती- गौरीसाठी हौशीने साडी नेसली, पण साडी नेसून काम उमजत नाही? ३ टिप्स, भरभर करा कामं

त्यानंतर हात खाली घ्या आणि दोन्ही हातांचे अंगठे तुमच्या गालांवर आणि इतर बोटे डोक्याच्या मागच्या बाजूने ठेवा. बोटांनी डोक्यावर हलकासा दाब द्या आणि थोडे मागच्या बाजूने रेलून बसा.

 

आता याच अवस्थेमध्ये सुरुवातीचे ५ ते ७ सेकंद एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे बघा.

त्यानंतर पुढचे ५ ते ७ सेकंद मान हलू न देता फक्त वर आणि खाली बघा.

गणपतीच्या नैवैद्यात हवीच २१ भाज्यांची भाजी, मिक्स भाजीचा पारंपरिक टेस्टी प्रकार- करायलाही सोपी

यानंतर क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने प्रत्येकी ५- ५ वेळा डोळे फिरवा. यानंतर रिलॅक्स व्हा.

३० सेकंद एवढीच जरी हालचाल केली तरी मान- पाठीचं दुखणं थोडं कमी होऊन रिलॅक्स झाल्यासारखं वाटेल असं श्री श्री रविशंकर सांगत आहेत. 

 

Web Title: Back pain, shoulder pain due to continuous work on laptop or computer, Simple remedy to get rid of back pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.