Lokmat Sakhi >Fitness > तुम्ही थिन फिट आहात का थिन फॅट ? इतरांना बारकुडे,लुकडेसुकडे म्हणून नावं ठेवण्यापूर्वी हे वाचा..

तुम्ही थिन फिट आहात का थिन फॅट ? इतरांना बारकुडे,लुकडेसुकडे म्हणून नावं ठेवण्यापूर्वी हे वाचा..

आपल्या आजूबाजूस काही अतिशय बारीक व्यक्ती असतात परंतु त्या अधिक काटक असतात. त्यांना बरेच वेळा बारक्या, लुकड्या म्हणून हिणवले जाते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:23 PM2021-04-13T16:23:25+5:302021-04-14T13:54:07+5:30

आपल्या आजूबाजूस काही अतिशय बारीक व्यक्ती असतात परंतु त्या अधिक काटक असतात. त्यांना बरेच वेळा बारक्या, लुकड्या म्हणून हिणवले जाते.

Are you thin fit or thin fat? Read this and think about being under weight again | तुम्ही थिन फिट आहात का थिन फॅट ? इतरांना बारकुडे,लुकडेसुकडे म्हणून नावं ठेवण्यापूर्वी हे वाचा..

तुम्ही थिन फिट आहात का थिन फॅट ? इतरांना बारकुडे,लुकडेसुकडे म्हणून नावं ठेवण्यापूर्वी हे वाचा..

Highlightsफक्त दिसण्याचा विचार न करता थिन फॅट न राहता थिन फिट राहण्याचा प्रयत्न करावा.

डॉ. यशपाल गोगटे

आधुनिक तंत्रज्ञानात यंत्राचा आकार जितका छोटा तितकी त्यातली टेकनॉलॉजी भारी! तसेच काहीसे
मानवी शरीरातही घडत असते. आपल्या आजूबाजूस काही अतिशय बारीक व्यक्ती असतात परंतु त्या अधिक काटक
असतात. त्यांना बरेच वेळा बारक्या, लुकड्या म्हणून हिणवले जाते. आई वडिलांच्या मनात तर अश्या मुलांना
जबरदस्तीने खायला घालून त्यांचे वजन वाढवण्याचा एकमेव विचार असतो. अश्या तर्हेचा कमी वजनाचा न्यूनगंड न
बाळगता या मुलांना कायम कसे बारीक ठेवता येईल या कडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अशा मुला-मुलींनी बारिकच का
राहावे या बद्दलची माहिती जाणून घेऊ.

बाळसे की सूज?


गरोदरपणात कुपोषित मातांची अर्भके कमी वजनाची असली तरीही काटक असतात. गरोदरपणात
कुपोषणामुळे बाळाच्या शरीराला कमी कॅलोरीज मध्ये शरीराचे व्यवस्थापन उत्कृष्ट सांभाळता येते. जन्मानंतर मात्र
या कमी वजनाच्या बाळांना बाळसेदार - गुबगुबीत करण्याच्या हव्यासापायी त्यांना अधिक प्रमाणात (आवश्यकता
नसतांना मागे लागून ) खायला दिले जाते. कमी कॅलोरीजवर निभावणाऱ्या त्यांच्या शरीरावर या अतिरिक्त
खाण्याचा भार येतो. ही मुले बाळसेदार तर होतात परंतु हे बाळसे त्यांच्या पुढील वयात लठ्ठपणामुळे होणाऱ्या
आजारांना निमंत्रण देते. खास करून वयात येण्याच्या काळात या मुला-मुलींचे वजन झपाट्याने वाढते. म्हणूनच
जन्मतः कमी वजनाच्या (२.५ किलोच्या आतील ) बाळांचे वजन वाढवण्याचा अट्टाहास टाळावा. या उलट त्यांना
आपण योग्य वजनात हेल्दी राहण्यावर भर द्यावा. शक्यतो या मुलांना बारक्या, किडकिडीत असे म्हणून हिणवू नये.
प्रतिकूल परिस्थितीत, कुपोषित आईच्या पोटात वाढलेल्या अर्भकाच्या शरीराचे कार्य कमी कॅलोरीज मध्ये
देखील उत्तम चालते. त्याला अनुकूल परिस्थिती मिळाल्यास तो लठ्ठपणा कडे वळतो व चयापयाच्या आजारांना बळी
पडतो.

Thin- Fat इंडियन

१८-२० वयानंतर आपली उंची स्थिरावते व हाडांची वाढ थांबते. त्यामुळे या वयात जे वजन असते ते
आपल्या शरिराला सहजपणे पेलवते. सामान्यतः एक समज आहे की वयाबरोबर वाढणारे वजन हे शरीराला
सहजपणे पेलवता येते. तुमच्या १८-२० वर्षाच्या वजनापेक्षा जर तुमचे वजन ५ किलो पेक्षा अधिक असेल, आणि
जरीही ते उंचीला प्रमाणशीर असेल तरीही ही लठ्ठपणाची सुरवात ठरू शकते. ही गोष्ट खास करून भारतीय समाजात
खरी ठरते.
बऱ्याचशा भारतीयांचे वजन जन्मतः कमीच असते व ते १८-२० व्या वर्षापर्यंत कमीच राहते. आपल्या ‘वजन प्रेमी’ मानसिकतेमुळे या लोकांना जाड केले जाते. यामुळे आज भारतामध्ये चयापचयाचे आजार साथीच्या
रोगाप्रमाणे पसरत आहेत. भारतीयांमध्ये आढळणाऱ्या अशा लोकांना थिन फॅट असे म्हटले जाते. ही लोकं दिसायला
जरी बारीक असली तरीही त्यांच्या शरीरातील चरबीचे प्रमाण अधिक असते व ते नुकसानकारक ठरते. त्यामुळे
तुलनात्मक रीतीने ते लठ्ठ केव्हा जाड याच वर्गात मोडतात. अश्या लोकांनी फक्त दिसण्याचा विचार न करता थिन फॅट न राहता थिन फिट राहण्याचा प्रयत्न करावा.

(लेखक एंडोक्रिनॉलॉजिस्ट, हार्मान तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Are you thin fit or thin fat? Read this and think about being under weight again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.