प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) वयाच्या सत्तरीतसुद्धा एकदम फिट आणि एनर्जेटीक दिसून येतात. आपला साधेपणा आणि फिटनेस यामुळे ते बरेच चर्चेत असतात. आनंद यांच्या फिटनेसचं नेमकं रहस्य काय असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो. आनंद महिंद्रा यांच्या फिटनेसचं सिक्रेट डेली रूटीन आणि हेल्दी लाईफस्टाईल आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमॅन आनंद महिंद्रा फक्त व्यावसाईक नसून फिटनेस फ्रिक आहेत. यामागे कोणताही जादूई फॉर्म्यूला नाही. फक्त एक संतुलिन रुटीन, शरीराची व्यवस्थित काळजी घेणं हेच त्यांच्या फिटनेसचं गुपित आहे. (Anand Mahindra Fitness Routine At 70 Exercise For Longevity Fitness Tips For Seniors)
आनंद महिंद्रा यांनी स्वत: सांगितले की ते फिटनेस गुरू नाहीत पण शरीर फिट ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग महत्त्वाचा आहे. दिवसाच्या सुरूवातीला ते २० मिनिटं ध्यान करतात. ज्यामुळे मेंदू आणि शरीर दोन्ही शांत राहते शरीराला एनर्जी मिळते. याव्यतिरिक्त आठवड्याभरात कार्डीओ, वेट ट्रेनिंग आणि योगा करतात स्विमिंग आणि इलेप्टिकल मशिनवर कार्डीओ करतात. ज्यामुळे मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.
आनंद महिंद्रा मांसपेशी आणि हाडांना मजबूत बनवण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात. ज्यामुळे वाढत्या वयात मांसपेशी आणि हाडं ताकदवान बनतात. नियमित वेट लिफ्टींग केल्यानं त्यांच्या मांसपेशी लवचीक राहतात. आनंद महिंद्रा आपलं फिटनेस रूटीन नियमित फॉलो करतात. त्यांच्यामते फिटनेससाठी नियमिता आणि शिस्त गरजेची आहे. यामुळे तुम्ही वाढत्या वयातही फिट, एक्टिव्ह सहज राहू शकता.
फिटनेस रुटीनचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दररोज सकाळी २० मिनिटे ध्यान करणे. यामुळे मानसिक ताण कमी होतो, दिवसभर सकारात्मकता टिकून राहते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. ते मानसिक स्पष्टता आणि आंतरिक शांतता टिकवून ठेवतात. कोणत्याही गोष्टीत सातत्य महत्वाचे आहे. विशिष्ट फॅड डाएट किंवा एकाच प्रकारच्या व्यायामाऐवजी, ते एका साध्या आणि नियमित रुटीनवर विश्वास ठेवतात, ज्यामुळे दीर्घकाळ फिटनेस टिकतो. थोडक्यात आनंद महिंद्रा यांच्या फिटनेसचे रहस्य म्हणजे शारीरिक सक्रियता आणि मानसिक शांतता यांचा योग्य समन्वय साधणे हे आहे.
Web Summary : Anand Mahindra, at 70, maintains fitness through routine and healthy lifestyle. His regimen includes daily meditation, cardio, weight training, and yoga. Consistency and discipline are key to his fitness, combining physical activity and mental peace.
Web Summary : 70 वर्ष की उम्र में आनंद महिंद्रा नियमित दिनचर्या और स्वस्थ जीवनशैली से फिटनेस बनाए रखते हैं। उनकी दिनचर्या में ध्यान, कार्डियो, वेट ट्रेनिंग और योग शामिल हैं। शारीरिक गतिविधि और मानसिक शांति का संयोजन उनकी फिटनेस की कुंजी है।