हल्ली काही अपवाद सोडले तर प्रत्येकाचीच जीवनशैली खूप बदलली आहे. यामुळे मग अनेक आजारही आपसूकच आपल्याकडे चालून येत आहेत. काही दुखायला लागलं की चटकन औषधं- गोळ्या घेऊन टाकणे हे अगदी कॉमन झालं आहे. पण यामुळे शरीरावर वेगळेच परिणाम होतात आणि त्यातून अनेक आजार ओढवले जातात. म्हणूनच योग अभ्यासक नेहमी हेच सांगतात की तुम्ही काही व्यायाम नियमितपणे करा. यामुळे अनेक आजार आपोआप बरे होतील आणि विनाकारण वारंवार औषधं- गोळ्या घेण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. असाच एक व्यायाम म्हणजे मानेला मसाज करणे. त्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात आणि कोणते आजार कमी करण्यासाठी ते अतिशय उपयुक्त ठरतं ते पाहूया...(amazing benefits of regular neck massage)
मानेला मसाज करण्याचे फायदे
मानेला दररोज ३ मिनिटे नियमितपणे मसाज केल्यास काय फायदा होऊ शकतो याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ yogicsoul_ranj या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सांगण्यात आलेले काही महत्त्वाचे मुद्दे..
उन्हाळ्यात नाश्त्याला करून खायलाच हवेत दह्यातले पाेहे! पोटाला थंडावा देणारी पौष्टिक रेसिपी
१. मानेचे स्नायू अतिरिक्त ताणामुळे आखडून जातात. यामुळे मग डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे असा त्रास होतो. जर तुम्ही मानेला दररोज मसाज केला तर त्यामुळे त्या भागात साचून राहिलेला वात मोकळा होतो. यामुळे त्या भागातला रक्तप्रवाह सुरळीत होऊन डोकेदुखी, ताण, थकवा हा त्रास कमी होऊन फ्रेश वाटते.
२. आयुर्वेदानुसार मानेवर काही मर्मबिंदू असतात. जेव्हा तुम्ही मालिश करत त्यांच्यावर दाब देता तेव्हा आपोआपच शरीरात उर्जा निर्माण होण्यास मदत होते.
ठुशी मंगळसूत्राचे १० अतिशय देखणे डिझाईन्स, ठुशी नेहमीच घालता आता ठुशीचे मंगळसूत्र ट्राय करा..
३. थायरॉईड आणि हार्मोन्सचे असंतुलन असा त्रास कमी करण्यासाठीही मानेला मसाज करणे उपयुक्त ठरते. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होणारा पीसीओडीचा त्रासही यामुळे कमी होऊ शकतो.