Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेवणात केक, नो ब्रेकफास्ट.., फिटनेसच्या जगात अक्षय खन्नाचं 'उलटं' गणित; वजन कमी करण्यासाठी हटके रुटीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2026 21:36 IST

Akshaye Khanna fitness routine: Akshaye Khanna weight loss: celebrity fitness habits: नेक बॉलिवूड सेलिब्रेटी तासन्तास जिम आणि डाएट करतात. पण अक्षय खन्नाचे आयुष्य मात्र अगदी उलट आहे.

बॉलिवूडमधील शो ऑफपासून कायम दूर राहिलेला अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. अक्षयने कधीही स्टारकिड म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही.(Akshaye Khanna fitness routine) त्याची ओळख झाली ती अभिनयाच्या ताकदीवर आणि अलीकडच्या काळात ‘धुरंधर’सारख्या भूमिकांमुळे त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांवर आपली छाप सोडली आहे.(Akshaye Khanna weight loss)अक्षय खन्ना हा त्याच्या अभिनयासोबतच खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. मात्र, यावेळी तो चर्चेत आला आहे ते त्याच्या काहीशा विचित्र आणि 'आउट-ऑफ-द-बॉक्स' रुटीनमुळे.(celebrity fitness habits) अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी तासन्तास जिम आणि डाएट करतात. पण अक्षय खन्नाचे आयुष्य मात्र अगदी उलट आहे.(unconventional fitness routine)

नाश्त्याला करा सातूच्या पिठाची टिक्की, मराठी घरातलं पारंपरिक सातूचं पीठ-डाएटप्रेमींसाठी परफेक्ट पदार्थ

फिटनेस म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो ते कडक डाएट, तासनतास जिम आणि प्रोटिन शेक. पण या सगळ्यासाठी अक्षय खन्ना अपवाद ठरला. त्याने नुकताच आपल्या दैनंदिन जीवनाचा असा काही खुलासा केला की, जो फिटनेसच्या पूर्ण विरोधात आहे. 

बॉलिवूड हंगामासोबत झालेल्या मुलाखतीत अक्षय खन्नाने सांगितलं की त्याला सकाळी उठल्यानंतर नाश्ता करण्याची सवय नाही. नाश्ता हा आपल्याला आहाराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असला तरी तो खात नाही. तसेच १० तासांची पुरेशी झोप घेतो ज्यामुळे त्याला फ्रेश राहता येते. त्याने म्हटलं की मी मागच्या कित्येक काळापासून नाश्ता करत नाही. अनेकजण प्रोटीन शेक किंवा ओट्स खातात पण मी दुपारपर्यंत उपवास करतो. दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणाच्या मध्येही मी चिप्स, बिस्किट किंवा सॅण्डविचसारखे इतर पदार्थ खात नाही. यादरम्यान मी जास्तीत जास्त चहा पिऊ शकतो. त्याने असंही म्हटलं की मला डाउनटाइम आणि संतुलनाची किंमत आहे. मी फिट राहण्याचे कारण म्हणजे १० तासांची झोप घेणं. 

दुपारच्या जेवणात वरण- भात, भाजी, चिकन किंवा मासे असं प्रथिने असणारे पदार्थ खातो. त्यांन असंही म्हटलं की मी गोड काहीही खाऊ शकतो. माझ्या जेवणात लिची, भेंडी आणि केकसारखे पदार्थ नेहमी असतात. वयाच्या पन्नाशीतही अक्षय खन्ना फिट असण्यामागे त्यांने प्रेक्षकांसमोर डाएट प्लान सांगितला. तसेच प्रत्येकाने हे रूटीन फॉलो करण्यापूर्वी आपल्या शरीराचा विचार करणे आवश्यक आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Akshaye Khanna's unique fitness: No breakfast, cake for dinner, long sleep.

Web Summary : Akshaye Khanna defies fitness norms with a 10-hour sleep schedule and skips breakfast. He indulges in cake and non-restrictive meals, focusing on balance over strict dieting, proving a unique path to staying fit.
टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यअक्षय खन्ना