Join us

नर्गिस फाकरी वर्षातून २ वेळा करते 'हा' उपाय, स्वतःला 'असं' ठेवते मेंटेन - पाहा तिचा फिटनेस फंडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2025 12:16 IST

Actress Nargis Fakhri Swears By A Day Water Fast To Looks Silm Is It Safe What Expert Says : Bollywood Actress Nargis Fakhri Does 9 Day Water Fasting Is It Really Safe Dietitian Explains : Water Fasting Trendy Diet : फक्त पाणी पिऊन नर्गिस फाकरी स्वतःला कसं ठेवते फिट अँड फाईन ते पाहा...

बॉलीवूड अभिनेत्री आपल्या फिटनेस व सौंदर्याची अधिक काळजी घेतात. फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारचे फिटनेस व डाएट फॉलो करतात. यानंतर अभिनेत्रींनी फॉलो (Nargis Fakhri) केलेल्या या फिटनेस रुटीन किंवा डाएटचा ट्रेंड बनतो, आणि मग आपल्यासारखे अनेकजण हे वेगवेगळ्या प्रकारचे फिटनेस ट्रेंड फॉलो करुन पाहतात. नुकताच असाच नर्गिस फाकरीचा एक खास फिटनेस ट्रेंड फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे(Bollywood Actress Nargis Fakhri Does 9 Day Water Fasting Is It Really Safe Dietitian Explains.)

बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाकरी हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, ती ९ दिवस फक्त पाणी पिऊन ‘वॉटर फास्टिंग’ करत असल्याचे शेअर केले आहे. वेटलॉस, शरीर आतून डिटॉक्स करणे यांसारख्या गोष्टींसाठी हे डाएट अतिशय फायदेशीर ठरते असे तिने स्पष्ट केले आहे. यामुळेच सध्या वॉटर फास्टिंग सारख्या ट्रेंडिंग (Actress Nargis Fakhri Swears By A Day Water Fast To Looks Silm Is It Safe What Expert Says) डाएटबद्दल बऱ्याच चर्चा रंगत आहेत. पण नेमकं हे वॉटर फास्टिंग (Water Fasting Trendy Diet) काय असतं? आणि ९ दिवस फक्त पाणी पिऊन राहणं शरीरासाठी कितपत योग्य आहे? असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात यावर तज्ज्ञ नेमक काय सांगतात ते पाहूयात. 

'वॉटर फास्टिंग' म्हणजे नेमकं काय ? 

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाकरी सौंदर्य आणि फिटनेस नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सोहा अली खानसोबतच्या एका कार्यक्रमात तिने तिच्या फिटनेसबद्दल अनेक सिक्रेट्स सगळ्यांसमोर शेअर केली आहेत. तिने सांगितलं, "मी वर्षातून दोन वेळा ९ दिवसांचं 'वॉटर फास्टिंग' करते. या काळात मी काहीही खात नाही, फक्त पाणी पीते. हे खूपच कठीण असतं. पण जेव्हा हे संपतं, तेव्हा शरीरात खूप फरक जाणवतो. चेहरा तेजस्वी दिसतो, जॉलाईन स्पष्टपणे उठून दिसते आणि शरीर टोन्ड दिसू लागत. 'वॉटर फास्टिंग' म्हणजे असा उपवास ज्यामध्ये तुम्ही फक्त पाणी पीता आणि कोणतेही अन्न किंवा दुसरे पेय घेत नाही.

शेवग्याला म्हणतात सुपरफूड-शेंगा खा नाहीतर खा चमचाभर शेवगा पावडर! शरीर होईल पोलादी स्ट्रॉँग...

चाळिशीत तब्येत सुटली-नितंब आणि मांड्याही जाडजूड? ७ सोप्या सवयी, परत येईल सुडौल तारुण्य...

नोएडा येथील डाएट मंत्रा क्लिनिकच्या आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की,  'वॉटर फास्टिंग' हा एक उपवासाचाच प्रकार आहे, उपवास म्हणजे ठराविक काळासाठी फक्त पाणी पिऊन उपवास करणं. या प्रक्रियेमध्ये २४ तासांपासून काही दिवसांपर्यंत काहीही न खाता - पिता फक्त पाणीच प्यायचे असते. या उपवासाचा मुख्य उद्देश शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करणं असतो. यामुळे पचनसंस्था सुधारते आणि चेहऱ्यावर चमक देखील येते.

जेव्हा आपण काहीही खात नाही, तेव्हा शरीराला पचनक्रियेसाठी ऊर्जा खर्च करावी लागत नाही, ज्यामुळे ते आपल्या शुद्धीकरण प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करू शकते. या प्रक्रियेमुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते, तसेच लिव्हर आणि मूत्रपिंड यांसारख्या अवयवांचे डिटॉक्स होऊन स्वतःला पुन्हा कार्यक्षम बनवण्याची संधी मिळते. वॉटर फास्टिंग केल्याने शरीरातील कॅलरीजचा वापर थांबतो, त्यामुळे शरीर उर्जेसाठी साठवलेली चरबी जाळू लागते. या प्रक्रियेला 'केटोसिस' म्हणतात आणि ती वजन कमी करण्यात उपयोगी ठरते.

मलायका अरोरासारखी फिगर हवी? करा तिचा 'हा' एक सिक्रेट व्यायाम - मिळेल तिच्यासारखी फिगर...

आहारतज्ज्ञांच्या मते, याचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक प्रकृती आणि जीवनशैलीवर अवलंबून असतो. त्यामुळे असा उपवास नियमितपणे करणं आरोग्यासाठी योग्य नाही, असंही तज्ज्ञ सांगतात. आहारतज्ज्ञ कामिनी यांच्या म्हणण्यानुसार, फक्त २४ तासांचा उपवास हा सामान्यतः बहुतेक लोकांसाठी सुरक्षित मानला जातो. मात्र, एका दिवसापेक्षा अधिक काळ उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. 

अनेक दिवस काहीही न खाल्ल्याने शरीरात अशक्तपणा, पोटदुखी, चक्कर येणे अशी लक्षण दिसू शकतात. जर एखाद्या व्यक्तीला कोणताही आजार असेल, तर त्याने असा उपवास टाळावा. 'वॉटर फास्टिंग' प्रत्येकासाठी फायदेशीर असतेच असे नाही आणि ते करताना तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच करणे योग्य ठरते.

वॉटर फास्टिंगमुळे वजन कमी होऊ शकतं, पण त्यासोबतच स्नायूंना इजा होणे आणि शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता होणे. जसं तुम्ही पुन्हा खाणं सुरू करता, तसं वजन परत वाढण्याची शक्यता असते.

टॅग्स :फिटनेस टिप्सनर्गिसनर्गिस फाकरीवेट लॉस टिप्स