Walking Benefits: पायी चालणं हे एक असं काम आहे जे रोज केलंच जातं. वजन कमी करणं असो, फिट राहणं असो किंवा एकंदर आरोग्य चांगलं ठेवणं असो पायी चालण्याचे अनेक फायदे मिळतात. वय कोणतंही असो पायी चालणं सगळ्यांसाठी फायदेशीर असतं. पायी चालल्यानं ब्लड प्रेशर कमी होतं, पचन सुधारत, ब्लड फ्लो चांगला राहतो आणि मूडही चांगला राहतो.
सामान्यपणे असं मानलं जातं की, रोज 10 हजार पावलं चालून शरीर फिट ठेवता येतं. पण गॅस्ट्रोएंटोरोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी यांचं मत आहे की, जपानी वॉकिंग टेक्निक (Japanese Technique Of Walking) 10 हजार पावलं चालण्यापेक्षाही जास्त फायदेशीर ठरते. अशाच पायी चालण्याची जपानी टेक्निक काय आहे आणि याचे फायदे काय आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पायी चालण्याची जपानी टेक्निक
डॉक्टर सेठी म्हणाले की, निरोगी जीवन जगण्यासाठ जपानी लोकांनी एक नवीन टेक्निक शोधून काढली आहे. ज्याचं नाव इंटरव्हल वॉकिंग (Interval Walking) आहे. या वॉकिंग पद्धतीतत सुरूवातीची 3 मिनिटं हळू वॉ केला जातो आणि नंतरचे 3 मिनिटं वेगानं वॉक केला जातो.
रोज जर 30 मिनिटं अशा पद्धतीनं म्हणजे इंटरव्हल वॉक केला तर कमालीची फायदे दिसून येतात. इंटरव्हल वकिंगनं ब्लड प्रेशर योग्य राहतं, स्ट्रोकचा धोका कमी राहतो, मूड चांगला राहतो, इम्यूनिटी बूस्ट होते आणि झोपेची क्वालिटी सुद्धा सुधारण्यास मदत मिळते. डॉक्टर सांगतात की, काही शोधांमधून समोर आलं आहे की, अशाप्रकारे वॉक केल्यानं कार्डियोवस्कुलर हेल्थ म्हणजे हृदयाचं आरोग्य आणि फिटनेस चांगली राहते.
कसा करावा इंटरव्हल वॉक
इंटरव्हल वॉक करण्यासाठी 3 ते 5 मिनिट आरामात वॉकची सुरूवात करा. त्यानंतर ब्रिस्क वॉक म्हणजे वेगानं चालणं सुरू करा. नंतर 3 ते 5 मिनिटं शांत व्हा. अशाप्रकारे रोज वॉक केल्यास काही दिवसात तुम्हाला फायदे दिसून येतील.
जेव्हाही तुम्ही वॉक कराल तेव्हा ही गोष्ट ध्यानात घ्या की, सोबत पाण्याची बॉटल ठेवा, जेणेकरून शरीरात पाणी कमी होऊ नये. सपाट रस्त्याऐवजी ओबड-खाबड किंवा चढ-उतार असलेल्या रस्त्याची निवड करा. चुकीची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोडून जर वॉक करण्याची ही पद्धत वापरली तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.