'आ जाने जा...' यासारख्या गाण्यांमधून त्या स्वत: बेधूंद होऊन नाचायच्याच... पण त्यांच्या चाहत्यांनाही ताल धरायला लावयच्या..त्याच हेलन आता तब्बल ८६ वर्षांच्या झाल्या असून थोड्या थकल्या आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांना चालायला खूप त्रास व्हायचा. काठी घेतल्याशिवाय चालता यायचे नाही. पण आता मात्र त्या बिनकाठीच्या चालत असून जीममध्ये जाऊन चांगला व्यायामही करत आहेत. ते पाहून याच का त्या काही दिवसांपुर्वीच्या हेलन असा प्रश्नही त्यांना नेहमीच पाहणाऱ्या अनेकांना पडतो. त्यांच्यामध्ये हा एवढा मोठा बदल कसा झाला, याविषयी त्यांच्या फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला यांनी एका व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे..
यास्मिन कराचीवाला हे बाॅलीवूड इंडस्ट्रीमधलं मोठं नाव. आलिया भट, दीपिका पदुकोन, कतरिना कैफ, जान्हवी कपूर यांच्यासारख्या सेलिब्रिटींना यास्मिन यांनी फिटनेसचे धडे दिले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कित्येकजणींनी परफेक्ट फिगर मिळवली आहे.
त्या यास्मिन यांची मुलाखत एका यु ट्यूब चॅनलतर्फे घेण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी हेलन यांच्यामध्ये व्यायामामुळे झालेला बदल कसा होता याविषयी माहिती सांगितली. यास्मिन म्हणतात की त्या जेव्हा पहिल्यांदा जीममध्ये आल्या होत्या तेव्हा अगदी हळूवारपणे काठी टेकवत आल्या होत्या. पण आता मात्र त्या पिलेट्स, रोप एक्सरसाईज, स्ट्रेन्थ एक्सरसाईज अगदी मस्त करतात. आता ती काठी त्यांच्या घरातल्या कुठल्या कोपऱ्यात पडलेली आहे, हे देखील त्यांना माहिती नाही.
हेलन यांच्या शिस्तबद्ध स्वभावाचे आणि व्यायामातल्या सातत्याचेही त्यांनी कौतूक केले. त्या सातत्यामुळेच त्यांच्यामध्ये आज एवढा मोठा बदल घडू शकला. यास्मिन असंही सांगतात की त्यांच्याप्रमाणेच ज्येष्ठ मंडळींनी फिटनेस ट्रेनरच्या मदतीने व्यायाम करायला हवा.
'या' पद्धतीने आय लायनर लावा- बारीक डोळेही दिसतील टपोरे आणि चेहरा वाटेल रेखीव
बऱ्याचदा ज्येष्ठ मंडळी चालणे, योगा असे व्यायाम करतात. ते याेग्यच आहे. पण त्याने त्यांच्या थकलेल्या शरीरात पुरेशी ताकद येत नाही. त्यासाठी त्यांनी स्ट्रेन्थ एक्सरसाईज करण्यावर भर द्यायला हवा. पण कोणताही व्यायाम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवा.
