Lokmat Sakhi >Fitness > दुपारचं जेवणानंतर '५' गोष्टी न चुकता कराच; व्यायाम न करताही पोट होईल सपाट- वजनही घटेल

दुपारचं जेवणानंतर '५' गोष्टी न चुकता कराच; व्यायाम न करताही पोट होईल सपाट- वजनही घटेल

5 things you must do after having a heavy meal in Lunch : दुपारच्या जेवणानंतर ५ गोष्टी केल्याने वजन घटणारच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2024 02:03 PM2024-05-21T14:03:37+5:302024-05-22T10:10:03+5:30

5 things you must do after having a heavy meal in Lunch : दुपारच्या जेवणानंतर ५ गोष्टी केल्याने वजन घटणारच..

5 things you must do after having a heavy meal in Lunch | दुपारचं जेवणानंतर '५' गोष्टी न चुकता कराच; व्यायाम न करताही पोट होईल सपाट- वजनही घटेल

दुपारचं जेवणानंतर '५' गोष्टी न चुकता कराच; व्यायाम न करताही पोट होईल सपाट- वजनही घटेल

वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन्हीकडे लक्ष देणे आवश्यक आहे (Weight Loss). या काळात तळलेले आणि अधिक कॅलरीजयुक्त पदार्थ खाणे टाळावे. या गोष्टी पचायला जास्त वेळ घेतात आणि यामुळे वजनही वाढते (Lunch). तर दुसरीकडे व्यायाम केला नाही तर, वजन कमी होत नाही. म्हणून, वजन कमी करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्याचा सल्ला दिला जातो. पण दुपारच्या जेवणानंतर आपल्या अंगात आळस भरतो.

अशा स्थितीत दिवसभर बसून राहिल्याने वजन वाढू शकते. जर आपले वजन वाढू नये असे वाटत असेल तर, दुपारच्या जेवणानंतर ५ गोष्टी न चुकता करा. वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. शिवाय आरोग्य देखील सुदृढ राहू शकते(5 things you must do after having a heavy meal in Lunch).

वजन कमी करण्यासाठी दुपारच्या या आरोग्यदायी सवयींचा अवलंब करा

वेळेवर जेवण करा

वजन कमी करण्यासाठी वेळेवर जेवण करणं गरजेचं आहे. नाश्ता आणि दुपारचे जेवण यामध्ये सुमारे ३ ते ४ तासांचे अंतर असावे. जर याहून जास्त अंतर वाढले तर आपण अधिक कॅलरीजचे सेवन करू शकता. दुपारच्या जेवणात कोशिंबीर आणि दही किंवा ताकाचे अवश्य सेवन करा. यामुळे अन्न लवकर पचते.

स्मोकी पान खाऊन रिल करताय? आतड्याला पडतील छिद्र, पाहा चिमुकलीच्या पोटाचं काय झालं..

स्वतःला हायड्रेटेड ठेवा

वेट लॉस जर्नीमध्ये स्वतःला हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे. पाणी पीत राहिल्याने क्रेविंग्स कण्ट्रोलमध्ये राहते. यामुळे आपण अनहेल्दी पदार्थांपासून लांब पाहतो. आपण दररोज नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक किंवा इतर लिक्विड पिऊ शकता. वजन कमी करण्यासाठी ३ लिटर पाणी प्यावे. ज्यामुळे भुकेवर नियंत्रणात राहील, आणि वेट लॉससाठी मदत होईल.

जेवणानंतर वॉक करा

दुपारी जेवल्यानंतर आपण संपूर्ण दिवस बसून असतो. त्यामुळे आपले अन्न नीट पचत नाही आणि वजन वाढू लागते. त्यामुळे जेवणानंतर लगेच बसू नये. काही वेळ चाला. यामुळे दुपारच्या जेवणानंतर झोप लागण्याची समस्या दूर होईल.

हेल्दी स्नॅक्स खा

दुपारच्या जेवणानंतर फारशी भूक लागत नाही. पण सायंकाळ हमखास काहींना भूक लागते. जर आपल्याला सायंकाळी भूक लागली असेल तर, हेल्दी स्नॅक्स खा. यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळतील.

ना डाळ- तांदूळ, ना इनो अगदी इडली पात्रही नको! करा १० मिनिटात इडली पात्राशिवाय इडली

दुपारच्या जेवणानंतर ग्रीन टी प्या

ग्रीन टी वजन कमी करण्यात मदत करू शकते. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक खनिजे असतात. हे पोषक घटक जलद वजन कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर सुमारे एक तासाने ग्रीन टी प्या. 

Web Title: 5 things you must do after having a heavy meal in Lunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.