lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > कोण म्हणतं फक्त डाएट- वर्कआउट केल्यानेच वजन घटतं? ५ सोपे बदल, सहज घटेल वजन

कोण म्हणतं फक्त डाएट- वर्कआउट केल्यानेच वजन घटतं? ५ सोपे बदल, सहज घटेल वजन

5 Proven Ways to Lose Weight Without Diet or Exercise : व्यायाम-डाएट फॉलो करायला वेळ मिळत नसेल तर, लाईफस्टाईलमध्ये करून पाहा ५ सोपे बदल-दिसेल फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2024 06:20 PM2024-01-10T18:20:21+5:302024-01-10T18:27:51+5:30

5 Proven Ways to Lose Weight Without Diet or Exercise : व्यायाम-डाएट फॉलो करायला वेळ मिळत नसेल तर, लाईफस्टाईलमध्ये करून पाहा ५ सोपे बदल-दिसेल फरक

5 Proven Ways to Lose Weight Without Diet or Exercise | कोण म्हणतं फक्त डाएट- वर्कआउट केल्यानेच वजन घटतं? ५ सोपे बदल, सहज घटेल वजन

कोण म्हणतं फक्त डाएट- वर्कआउट केल्यानेच वजन घटतं? ५ सोपे बदल, सहज घटेल वजन

बदलत्या लाईफस्टाईलचा मुख्य फटका आरोग्य आणि वजनावर (Weight Gain) होतो. व्यायाम-डाएटकडे योग्यप्रकारे लक्ष न देणं, अपुरी झोप यामुळे वजन तर वाढत जातेच, शिवाय याचा दुष्परिणाम केस, त्वचा आणि आरोग्यावरही दिसून येते. वजन वाढले की फक्त शरीर बेढप दिसत नसून, हृदयरोग, मधुमेह, यासह इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे आरोग्याकडे वेळीच लक्ष देऊन वजन कमी करा.

८ तासांच्या नौकरीमुळे काहींना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. मुख्य म्हणजे वर्कआउट करायला वेळ मिळत नाही (Weight Loss Tips). काहींचा असा समज आहे की, वर्कआउट केल्यानेच वजन कमी होऊ शकते. पण असे नाही. डाएटमध्ये काही बदल केल्यानेही वजन कमी होते. जर आपल्याला वर्कआउटला न जाता वजन कमी करायचं असेल तर, लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून पाहा(5 Proven Ways to Lose Weight Without Diet or Exercise).

लाईफस्टाईलमध्ये करा ५ बदल

मैदा टाळा

हेल्थ या वेबसाईटनुसार, 'मैदा, पास्ता, ब्रेड किंवा रिफाईंड फ्लोअरयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते. रिफाईंड फ्लोअरमधून पौष्टीक फायबर काढले जाते. ज्यामुळे आरोग्यास हानी पोहचते. यासह पचनक्रियेतही अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मैद्याऐवजी आपण इतर धान्यांच्या पोळी किंवा भाकरी करून खाऊ शकता.

दुधासोबत अजिबात खाऊ नये असे ५ पदार्थ, पोटात तयार होईल विष, बिघडेल आरोग्य..

कोमट पाणी प्या

वजन कमी करताना तज्ज्ञ जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. नियमित कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. शिवाय शरीरातील टॉक्सिक पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. आपण दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करू शकता. सकाळी उपाशी पोटी कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होते.

गोड खाणं टाळा किंवा कमी करा

वजन वाढण्याचं मुख्य कारण साखर आहे. वजन कमी करण्यासाठी साखर कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते. ज्यामुळे वजन तर वाढतेच, शिवाय ब्लड शुगरची पातळी देखील वाढते. जर आपल्याला गोड खाण्याची इच्छा वारंवार होत असेल तर, साखरेऐवजी गुळ, खजूर खा.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात. नियमित ग्रीन टी प्यायल्याने चयापचय क्रिया वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. ग्रीन टी पिण्याचा फायदा आपल्या त्वचेला देखील होतो. शिवाय ज्यांना वजन नसून, पोटाची चरबी कमी करायची असेल त्यांनी नियमित ग्रीन टी प्यावे.

नियमित ३ गोष्टी खा, दात चमकतील मोत्यासारखे! पिवळ्या पडलेल्या दातांसाठी सोपा उपाय

रिफाइंड तेलाचा वापर कमी करा

अतिप्रमाणात फ्राईड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतेच. बहुतांश जण पदार्थ तण्यासाठी रिफाइंड तेलाचा वापर करतात. हे तेल मधुमेह, हृदयाच्या निगडीत समस्या वाढण्यास कारणीभूत ठरतात. स्वयंपाक करताना रिफाइंड तेलाचा वापर शक्यतो कमी करा. आपण याव्यतिरिक्त शेंगदाणा तेल किंवा राईसब्रेन तेलाचा वापर करू शकता. 

Web Title: 5 Proven Ways to Lose Weight Without Diet or Exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.