खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि कमी झालेल्या शारिरीक हालचाली यामुळे अनेकांना वजन कमी कसं करावं हे समजत नाही. कंबर आणि पोटाचा पुढचा भाग यावरची चरबी वाढली की तो व्यक्ती खूप लठ्ठ दिसू लागतो. म्हणूनच शरीराला व्यवस्थित आकारात आणायचे असेल तर पोट आणि लव्ह हॅण्डल्स म्हणजेच कंबरेवरची वाढलेली चरबी सगळ्यात आधी कमी करायला हवी (5 Minutes Exercise To Reduce Love Handles). ते कसं करायचं हे आता पाहूया. यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ देण्याची गरज नाही. फक्त दिवसातला ५ ते १० मिनिटांचा वेळ काढा आणि कंबरेवरची वाढलेली चरबी झरझर कमी करा..(simple and quick exercise to reduce belly fat)
कंबरेवरची वाढलेली चरबी कशी कमी करावी?
कंबरेवरची आणि पोटावरची चरबी कशी कमी करता येऊ शकते, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी dr.priyanka.abhinav_7509 या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यासाठी त्यांनी २ साधे- सोपे व्यायाम सांगितले आहेत.
उपवासाचा केक कधी खाल्ला आहे का? ‘ही’ घ्या रेसिपी, उपवासाच्या दिवशी वाढदिवस साजरा करा निवांत
१. पहिला व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे राहा. यानंतर उजवा तळहात मानेच्या थोडं वर डोक्यावर ठेवा. डावा पाय गुडघ्यात वाकवून वर उचला. उजव्या हाताचा कोपरा आणि डावा गुडघा एकमेकांना लावण्याचा प्रयत्न करा. असं साधारण २५ वेळा केल्यानंतर हीच कृती डाव्या हात आणि उजवा पाय वर उचलून करावी. लगेच सुरुवातीला तुम्हाला ते जमणार नाही. पण काही दिवस नेमाने केल्यास तुम्ही ते नक्कीच करू शकाल. हा व्यायाम २ ते ३ मिनिटे करावा.
२. दुसरा व्यायाम करण्यासाठी ताठ उभे राहा. यानंतर उजवा हात कंबरेवर ठेवा. डावा हात वर उचला.
महिन्यातून फक्त एकदा १ बटाटा घ्या, ‘हा’ उपाय करा! बागेतील प्रत्येक रोप फुलांनी डवरेल
शरीर उजव्या बाजुला झुकवा आणि डावा हात उजवीकडून शक्य तेवढा खाली आणण्याचा प्रयत्न करा. असंच नंतर शरीर डाव्या बाजुला झुकवून उजव्या हातानेही करा. यामुळे कंबरेच्या स्नायूंवर ताण येतो आणि तेथील फॅट बर्न होण्यास मदत होते.