Lokmat Sakhi >Fitness > ही चाल तुरुतुरु! मॉर्निंग वॉक करुनही वजन कमी होत नसेल तर ‘असं’ ५ पद्धतींनी चाला..

ही चाल तुरुतुरु! मॉर्निंग वॉक करुनही वजन कमी होत नसेल तर ‘असं’ ५ पद्धतींनी चाला..

5 Types Of Walks For Weight Loss And Fitness: नेहमी एकाच पद्धतीने वॉकिंग करण्यापेक्षा जर तुम्ही थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने वॉकिंग केलं तर त्याचे आरोग्याला निश्चितच भरपूर फायदे होतील.(5 different types of walking for health)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2025 16:06 IST2025-07-10T15:39:31+5:302025-07-10T16:06:02+5:30

5 Types Of Walks For Weight Loss And Fitness: नेहमी एकाच पद्धतीने वॉकिंग करण्यापेक्षा जर तुम्ही थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने वॉकिंग केलं तर त्याचे आरोग्याला निश्चितच भरपूर फायदे होतील.(5 different types of walking for health)

5 different types of walking for healthy body, 5 types of walks for weight loss and fitness  | ही चाल तुरुतुरु! मॉर्निंग वॉक करुनही वजन कमी होत नसेल तर ‘असं’ ५ पद्धतींनी चाला..

ही चाल तुरुतुरु! मॉर्निंग वॉक करुनही वजन कमी होत नसेल तर ‘असं’ ५ पद्धतींनी चाला..

Highlightsचालण्याचा व्यायाम तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता, याविषयी माहिती..

वॉक करणे म्हणजेच चालायला जाणे हा अनेक जणांचा अतिशय आवडीचा व्यायाम. कारण यामुळे थोडा वेळ घराबाहेर मोकळ्या हवेत जायला मिळतं. त्यामुळे आपोआपच मन फ्रेश होतं. बाहेरच्या कित्येक गोष्टी नव्याने दिसतात त्यामुळे चालताना मजा येते. शिवाय चालण्याचा व्यायाम केल्याने पाय मोकळे होतात. पचन चांगलं होऊन जेवण व्यवस्थित जातं आणि शिवाय वजनही नियंत्रित ठेवण्यास मदत होते. चालण्याचा व्यायाम तर चांगला आहेच, पण त्या चालण्यात जर तुम्ही थोडं वेगळेपण आणलं तर नक्कीच त्याचा आणखी जास्त फायदा तुमच्या शरीराला होऊ शकतो (5 Types Of Walks For Weight Loss And Fitness), असं फिटनेस ट्रेनर सांगत आहेत. त्यासाठी नेमकं कसं चालायला हवं ते पाहूया..(5 different types of walking for health)

 

चालण्याचा व्यायाम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती

चालण्याचा व्यायाम तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ sunaina_rekhi and niraamayawellnessretreats या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

पावसाळ्यात टॉवेलला येणारा कुबट वास घालविण्याचा सोपा उपाय! बघा टॉवेल किती दिवसांनी धुणं गरजेचं 

१. त्यामध्ये पहिला प्रकार त्यांनी ताडासनात चालण्याचा सांगितला आहे. यासाठी सगळ्यात आधी ताडासन करा. यानंतर फक्त पायाच्या बोटांवर शरीराचा सगळा भार पेलून ३ ते ४ मिनिटांसाठी चाला. हा व्यायाम केल्याने बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होते. तसेच पाठदुखी, मानदुखीही कमी होते.

२. दुसऱ्या प्रकारात त्यांनी टाचा जमिनीवर टेकवून फक्त टाचांवरच चालण्याचा सल्ला दिला आहे. हा व्यायामही ३ ते ४ मिनिटे करा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते आणि पायाच्या घोट्यासाठीही हा व्यायाम चांगला असतो.

 

३. तिसरा चालण्याचा प्रकार म्हणजे मलासन करणे आणि मग त्याच अवस्थेत चालणे. तुम्हाला शक्य होईल तेवढ्या मिनिटांसाठी हा व्यायाम करा. यामुळे पचन चांगले होते. शिवाय प्रजनन संस्थेशी निगडीत आजारही बरे होतात.

कडिपत्त्याच्या रोपाला पानं कमी- काड्याच जास्त? १ उपाय- कडीपत्ता वाढेल जोमानं-पानंही होतील सुगंधी भरपूर

४. चौथं आहे हिप वॉकिंग. हा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर पाय पसरून बसा आणि यानंतर हिप्सची हालचाल करत पुढे सरका. हा व्यायाम केल्यामुळे कंबरेच्या खालच्या भागात किंवा हिप्समध्ये होणारा त्रास कमी होतो. तसेच हिप्सवरील चरबी कमी होण्यासाठीही मदत होते.

५. पाचवा व्यायाम म्हणजे रिव्हर्स वॉकिंग. यामुळे गुडघ्यांची ताकद वाढते. शिवाय बॉडी पोश्चर सुधारण्यासही मदत होते. 
 


 

Web Title: 5 different types of walking for healthy body, 5 types of walks for weight loss and fitness 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.