Join us  

दिवसभर बैठं काम करणाऱ्यांसाठी 4 परफेक्ट योगासनं, तासंतास बसून राहत असाल तर ‘एवढं’ तरी कराच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 8:00 AM

Fitness Tips: आजकाल प्रत्येक घरात अशी एक तरी व्यक्ती आहेच, की जिला सतत ८- १० तास एकाच जागी बसून (long hours sitting work) काम करावं लागतं, अशा सगळ्यांसाठीच हे काही व्यायाम अतिशय उपयुक्त ठरणारे आहेत. (fitness exercises)

ठळक मुद्देखूप वेळ एकाच जागी एकाच अवस्थेत बसून राहिल्याने तब्येतीवर जबरदस्त परिणाम होत आहे. मान, पाठ, कंबरदुखी वाढली आहे. असे सगळे त्रास कमी करण्यासाठी हे काही व्यायाम करून बघा.

पुर्वी कष्टाची, अंग मेहनतीची कामं खूप असल्याने अनेकांच्या तब्येती खराब व्हायच्या, त्यातून अनेक आजार मागे लागायचे. पण आता मात्र परिस्थिती अगदी उलट झाली आहे. आता अंगमेहनतीचे काम कमी आणि बैठे काम जास्त असे कामाचे स्वरुप झाले आहे. बहुतांश लोकांचे काम बैठ्या (for those who have sitting work for all day long) स्वरुपाचेच आहे. एवढंच कशाला अगदी शाळा- कॉलेजच्या मुलांचे सिटींग अवर्सही वाढले आहेत. शाळा, ट्यूशन, वेगवेगळे क्लास आणि पुन्हा अभ्यास अशा कारणांनी मुलांचेही एकाच जागी बसण्याचे तास वाढले आहेत. खूप वेळ एकाच जागी एकाच अवस्थेत बसून राहिल्याने तब्येतीवर जबरदस्त परिणाम होत आहे. मान, पाठ, कंबरदुखी वाढली आहे. असे सगळे त्रास कमी करण्यासाठी हे काही व्यायाम करून बघा. (4 Perfect body relief exercises)

 

व्यायाम प्रकार १चेस्ट ओपनर व्यायाम म्हणून हा व्यायाम ओळखला जातो. योग प्रकारात गोमुखासन हा व्यायाम जसा आहे, त्याच पद्धतीचा हा व्यायाम आहे. या व्यायामात छाती आणि पाठीचा कणा या दोघांचाही व्यायाम होतो. हा व्यायाम करण्यासाठी उजवा हात वर उचला आणि कोपऱ्यातून वाकवून त्याचा तळवा तुमच्या पाठीवर ठेवा. आता डावा हातही वर उचला आणि डाव्या हाताची बोटे उजव्या हाताच्या कोपऱ्यावर ठेवा. यामुळे पाठीचा कणा रिलॅक्स होऊन ताठ झाल्याचे जाणवेल. ही आसनस्थिती ३० सेकंद टिकवा आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या हाताने असाच व्यायाम करा. 

 

व्यायाम प्रकार २ lunge stretches म्हणून हा व्यायाम प्रकार ओळखला जातो. हा व्यायाम करण्यासाठी सरळ ताठ उभे रहा. दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर घ्या आणि हात कंबरेवर ठेवा. आता उजवा पाय पुढे घ्या आणि गुडघ्यातून वाकवा. आता डावा पायही मागच्या बाजूने गुडघ्यात वाकवा पण तो गुडघा जमिनीवर टेकणार नाही, याची काळजी घ्या. आता उजव्या पायावर जोर देऊन तुम्हाला जेवढं खाली वाकता येईल तेवढं खाली वाका. पाठीचा कणा ताठ राहील याची काळजी घ्या. ३० सेकंद ही आसनस्थिती टिकवा. त्यानंतर पुन्हा डावा पाय पुढे घेऊन डाव्या पायानेही अशाच पद्धतीने व्यायाम करा. हा व्यायाम केल्यामुळे पायांचे स्नायू मोकळे होण्यास मदत होईल. 

 

व्यायाम ३- अधोमुख श्वानासनहे आसन करण्यासाठी गुडघ्यावर उभे रहा. दोन्ही तळहात जमिनीला टेकवा. हळूहळू जमिनीवर टेकलेले गुडघे उचला. तळहात आणि तळपाय हेच फक्त जमिनीला टेकलेले असतील, अशी शरीराची पोझिशन ठेवा. या अवस्थेत कमीतकमी २५ ते ३० सेकंद राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे संपूर्ण अंग मोकळे होऊन स्ट्रेस कमी झाल्यासारखे वाटेल. 

 

व्यायाम ४- मर्कटासनमर्कटासनमध्ये तुमच्या शरीराला एकप्रकारचा पीळ बसतो. त्यामुळे मग पाठीच्या कण्यासहीत सगळे अंग मोकळे होण्यास मदत होते. मर्कटासन करण्यासाठी जमिनीवर पाठीवर झोपा. दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवून दोन्ही बाजूंना पसरवा. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून घ्या. आता दोन्ही पाय उजव्या बाजूला वळवा आणि जमिनीवर टेकवा. त्याच वेळी तुमचा चेहरा डाव्या बाजूला करा. ही आसनस्थिती ३० सेकंद टिकवा. यानंतर दुसऱ्या बाजूने पुन्हा अशाच पद्धतीने आसन करा. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यव्यायामयोगासने प्रकार व फायदे