Join us

लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करून मान- पाठ आखडून जाते, ३ प्रकारचे स्ट्रेचिंग करा- अंग मोकळं होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2025 18:02 IST

Stretching Exercise For Working Women: तासनतास एका जागी बसून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त व्यायाम..(stretching exercise for relaxing neck, back and lower back)

ठळक मुद्देखडून गेलेलं अंग मोकळं होईल आणि मान, पाठ, कंबरदुखीही थांबेल.

ज्यांना ८- ९ तास सतत लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करावं लागतं अशा तरुण पिढीला मान- पाठ- कंबर आखडून जाण्याचा त्रास वाढला आहे. दिवसातला जास्तीतास्त वेळ बसून काम करायचं, त्यात पुन्हा दुचाकी, चारचाकी गाडी चालविण्याचं वाढलेलं प्रमाण, त्यातही रस्त्यावरचे खड्डे टाळत केलेला प्रवास, यामुळे अंग जास्त आखडून जातं. मान, पाठ, कंबर गळून जाते. वारंवार दुखते. हा त्रास कमी करण्यासाठी व्यायाम करण्याची गरज असते. पण प्रत्येकाला व्यायामासाठी वेळ काढणं जमत नाही. म्हणूनच हे काही साधे सोपे आणि झटपट होणारे स्ट्रेचिंगचे प्रकार पाहा (3 types of stretching exercise for working women). यामुळे आखडून गेलेलं अंग मोकळं होईल आणि मान, पाठ, कंबरदुखीही थांबेल.(stretching exercise for relaxing neck, back and lower back)

मान, पाठ, कंबर दुखत असेल तर कोणते व्यायाम करावे?

 

१. मानेचे व्यायाम

मानेचे व्यायाम तुम्ही झटपट करू शकता. अगदी ऑफिसच्या खुर्चीमध्ये बसल्याबसल्याही हे व्यायाम करता येतील.

जेवणात रंगत आणणारी कैरी- टोमॅटोची चटकदार चटणी!! कुणाल कपूर स्पेशल रेसिपी- करायला सोपी 

यामध्ये मान उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने मागच्या बाजुने आणि पुढच्या बाजुने फिरवणे, वर पाहाणे- खाली पाहाणे, डावीकडे आणि उजवीकडे पाहाणे, एकदा उजव्या खांद्याकडे तर एकदा डाव्या खांद्याकडे झुकविणे असे व्यायाम तुम्ही करून शकता.

 

२. पाठीच्या कण्याचा व्यायाम

पाठ- कंबर मोकळी होण्यासाठी तुम्ही कॅट- काऊ पोज किंवा मार्जरासन करू शकता. याशिवाय सरळ ताठ उभे राहा.

उन्हाळ्यात केसांना तेल लावणं कितपत योग्य? तुम्हीही या दिवसांत डोक्याला मालिश करत असाल तर....

दोन्ही हात पाठीमागे घेऊन एकमेकांमध्ये बांधा आणि छाती पुढे काढून, खांदे मागे ओढून आता मागच्या बाजुने जास्तीतजास्त स्ट्रेच करा. याशिवाय तुम्ही मच्छिंद्रासन, वृक्षासनही करू शकता. बालासन, भुजंगासन असे मान, पाठ, कंबर मोकळे करणारे आसनही उपयुक्त ठरतात.

 

३. सुर्यनमस्कार

दिवसाच्या सुरुवातीला सुर्यनमस्कार घातल्यानेही खूप फरक पडतो. १२ सुर्यनमस्कार घालावे असं तज्ज्ञ सांगतात.

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी किती आंबे, आमरस खाल्ला तर चालतो? एक्सपर्ट सांगतात योग्य प्रमाण

पण एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर ५ किंवा ७ सुर्यनमस्कारही तुम्ही घालू शकता. यामुळे संपूर्ण शरीराचाच व्यायाम होऊन अंग मोकळं होण्यास मदत होते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामपाठीचे दुखणे उपायलॅपटॉप