Lokmat Sakhi >Fitness > तासनतास बैठं काम करून मान- पाठ दुखते? ५ मिनिटांत होणारे ३ सोपे व्यायाम- लगेच मिळेल आराम 

तासनतास बैठं काम करून मान- पाठ दुखते? ५ मिनिटांत होणारे ३ सोपे व्यायाम- लगेच मिळेल आराम 

How To Get Relief From Shoulder, Neck and Back Pain: लॅपटॉप, कॉम्प्युटरवर सतत काम करून मान- पाठ- कंबर दुखत असेल तर हे काही व्यायाम करून पाहा..(3 must do exercises for those who are having sitting job)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 16:12 IST2025-01-07T16:09:45+5:302025-01-07T16:12:59+5:30

How To Get Relief From Shoulder, Neck and Back Pain: लॅपटॉप, कॉम्प्युटरवर सतत काम करून मान- पाठ- कंबर दुखत असेल तर हे काही व्यायाम करून पाहा..(3 must do exercises for those who are having sitting job)

3 must do exercises for those who are having sitting job, best exercises to get relief from shoulder pain, neck pain and back pain | तासनतास बैठं काम करून मान- पाठ दुखते? ५ मिनिटांत होणारे ३ सोपे व्यायाम- लगेच मिळेल आराम 

तासनतास बैठं काम करून मान- पाठ दुखते? ५ मिनिटांत होणारे ३ सोपे व्यायाम- लगेच मिळेल आराम 

Highlightsज्यांना तासनतास एकाच जागी बसून लॅपटॉप, कॉम्प्युटरवर काम करावे लागते, त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणारे व्यायाम

ऑफिसच्या कामानिमित्त अनेक जणांना तासनतास एकाच अवस्थेत बसून लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करावं लागतं. दररोज याच पद्धतीने सलग ८- ९ तास बसून काम केल्याने मग काही दिवसांतच मान, पाठ, कंबर आखडून जाते आणि खूप दुखायला लागते. म्हणूनच या दुखण्यातून आराम मिळावा यासाठी हे काही साधे- सोपे व्यायाम करा (How To Get Relief From Shoulder, Neck and Back Pain). हे व्यायाम तुम्ही अवघ्या ४ ते ५ मिनिटांत करू शकता. ऑफिसमधल्या लंच ब्रेक, टी ब्रेकमध्येही ते सहज करता येण्यासारखे आहेत. ते व्यायाम नेमके कोणते आणि कसे करायचे ते पाहूया..(3 must do exercises for those who are having sitting job)

 

मान, पाठ, कंबर आखडून गेल्यास कोणते व्यायाम करावे?

ज्यांना तासनतास एकाच जागी बसून लॅपटॉप, कॉम्प्युटरवर काम करावे लागते, त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणारे व्यायाम कोणते, याविषयीची माहिती फिजिओथेरपीस्टने dt.lavleen या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 

बाथरुमच्या टाईल्स काळपट- पिवळट झाल्या? करा 'हा' सोपा उपाय- कमी मेहनतीत टाईल्स चकाचक.. 

१. वॉल पुशअप्स

खांदे आखडून गेले असतील, मान दुखत असेल, पाठ आखडून गेली असेल तर हा व्यायाम चांगला आहे. हा व्यायाम करण्यासाठी तुमचे दोन्ही तळहात भिंतीवर लावा. तळपाय भिंतीपासून दूर एका जागी स्थिर ठेवा. त्यानंतर हाताने भिंतीवर जोर देऊन शरीर पुढे घ्या आणि मग मागे न्या. साधारण ८ ते १० वेळा या पद्धतीने पुशअप्स करा.

 

२. बॅक किक

हा दुसरा व्यायामही भिंतीच्या मदतीनेच करायचा आहे. हा व्यायाम करण्यासाठी तळहात भिंतीला लावा. त्यानंतर डावा पाय उचला आणि मांडीपासून मागे न्या. असं करत असताना तुमचं सगळं शरीर एका सरळ रेषेतच राहायला हवं. फक्त पायाची हालचाल व्हायला हवी. त्यानंतर मागे नेलेला पाय पुन्हा पुढे आणून जमिनीवर टेकवा. असं दोन्ही पायाने प्रत्येकी ५- ५ वेळा करा. यामुळे पाठीला आणि कंबरेला आराम मिळतो.

तिळाचे लाडू करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी, फक्त १० मिनिटांत करा किलोभर तिळाचे लाडू

३. डोक्याची हालचाल

हा तिसरा व्यायाम तुम्हाला खुर्चीमध्ये बसून करता येण्यासारखा आहे. हा व्यायाम करण्यासाठी सुरुवातीला ताठ बसा. त्यानंतर फक्त डोके पुढे आणि मागे या पद्धतीने हलवा. बाकी शरीर न हलवता ताठ बसा. हा व्यायाम ५ ते ६ वेळा करावा. 

 

Web Title: 3 must do exercises for those who are having sitting job, best exercises to get relief from shoulder pain, neck pain and back pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.