Lokmat Sakhi >Fitness > ८- १० तास सलग बसून काम केल्याने पाठीला बाक आला- खांदे झुकले? ३ उपाय- बॉडीपोश्चर सुधारेल 

८- १० तास सलग बसून काम केल्याने पाठीला बाक आला- खांदे झुकले? ३ उपाय- बॉडीपोश्चर सुधारेल 

3 Effective Exercise To Improve Body Posture: सलग काही तासांच्या बैठ्या कामामुळे अनेकांचं बाॅडी पोश्चर बिघडत आहे. त्यासाठीच हे काही उपाय तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरू शकतील..(how to get rid of hump on back?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2025 20:19 IST2025-05-17T20:18:37+5:302025-05-17T20:19:54+5:30

3 Effective Exercise To Improve Body Posture: सलग काही तासांच्या बैठ्या कामामुळे अनेकांचं बाॅडी पोश्चर बिघडत आहे. त्यासाठीच हे काही उपाय तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरू शकतील..(how to get rid of hump on back?)

3 effective exercise to improve body posture, how to get rid of hump on back | ८- १० तास सलग बसून काम केल्याने पाठीला बाक आला- खांदे झुकले? ३ उपाय- बॉडीपोश्चर सुधारेल 

८- १० तास सलग बसून काम केल्याने पाठीला बाक आला- खांदे झुकले? ३ उपाय- बॉडीपोश्चर सुधारेल 

Highlightsलॅपटॉप, कम्प्युटरवर काम करताना अनेकजण थोडेसे समोर झुकलेले असतात. रोजच सतत याच अवस्थेत बसून काम केल्याने मग हळूहळू बाॅडी पाेश्चर बिघडत जाते.

पाठीचा कणा नेहमी ताठ असावा, खांदे नेहमी ताणलेले असावे असं आपण म्हणतो. पण हल्ली बहुतांश जणांचं याबाबतीत नेमकं उलट झालेलं दिसून येतं. पुर्वी पाठीला बाक आला किंवा खांदे झुकत आले की त्या व्यक्तीचं वय झालं म्हणून समजलं जायचं. पण आता मात्र वयाचा आणि पाठीला बाक येण्याचा किंवा खांदे झुकण्याचा काहीच संबंध उरलेला नाही. कारण हल्ली कमी वयातच अनेकांची अवस्था अशी झालेली दिसून येते. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे बहुतांश जणांना सलग ८ ते १० तास बसून काम करावे लागते. लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करताना अनेकजण थोडेसे समोर झुकलेले असतात.  रोजच सतत याच अवस्थेत बसून काम केल्याने मग हळूहळू बाॅडी पाेश्चर बिघडत जाते. त्यामुळे मग खांदेही झुकतात आणि पाठीलाही बाक येतो (3 Effective Exercise To Improve Body Posture). असं होऊन बॉडी पोश्चर बिघडू नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी, ते पाहूया..(how to get rid of hump on back?)

पाठीला बाक येऊ नये म्हणून योगासनं..

 

१. विपरित नमस्कार

हा व्यायाम करण्यासाठी ताठ बसावे किंवा ताठ उभे राहावे. यानंतर दोन्ही हात गुडघ्यातून वाकवून मागच्या बाजुने पाठीवर टेकवावेत आणि दोन्ही तळहात एकमेकांना जोडून नमस्काराची अवस्था करावी.

काठापदराच्या साड्या-कपाळी कुंकू-केसांत गजरा, ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धक पोहोचल्या थेट ‘या’ मंदिरात! पाहा फोटो

ही आसनस्थिती एखादा मिनिट टिकवून ठेवावी. यामुळे पाठीचा कणा ताठ राहण्यास मदत होते.

 

२. कॅट- काऊ पोज

हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही गुडघे आणि दोन्ही तळहात जमिनीला टेकवून ठेवा. यानंतर पाठीचा कणा आतल्या बाजुने वाकवून मान वर करा आणि छताकडे नजर लावा.

गुलाबी गाल-चेहऱ्यावर चमक आणि परफेक्ट फिगर! आलिया भटच्या सौंंदर्यांचं सिक्रेट- फक्त ५ गोष्ट

यानंतर मान खाली झुकवून पाठीचा कणा वरच्याबाजुने बाहेर काढा. अशी एकानंतर एक कॅट- काऊ पोज करा. पाठीच्या कण्याचा चांगला व्यायाम होतो.

 

३. गोमुखासन

गोमुखासन करण्यासाठी ताठ बसा किंवा ताठ उभे राहा. यानंतर उजवा हात कोपऱ्यात वाकवून वरून खाली घ्या तर डावा हात खालच्या बाजुने कोपऱ्यात वाकवून खालून वर घ्या.

काही केल्या कारल्याचा कडूपणा जात नाही? ३ टिप्स- कडू कारलं खमंग हाेऊन सगळ्यांनाच आवडेल..

दोन्ही तळहात एकमेकांमध्ये गुंफण्याचा प्रयत्न करा. यानंतर डावा हात वर आणि उजवा हात खाली करून याच पद्धतीने व्यायाम करा. यामुळेही खांदे ताठ होऊन पाठीचा कणाही ताठ होण्यास मदत होईल. 

 

Web Title: 3 effective exercise to improve body posture, how to get rid of hump on back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.