वाढत्या वजनाच्या टेन्शनमुळे सध्या अनेकजण हैराण आहेत. कारण एकदा वजन वाढलं की ते पुन्हा कमी करणं खूप कठीण असतं. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे एकतर बहुसंख्य लोकांना व्यायाम करण्याचा कंटाळा येतो आणि दुसरं म्हणजे डाएट त्यांच्याकडून होत नाही. व्यायाम आणि डाएट या दोन्ही गोष्टी जर जमल्या नाहीत तर मग वजनाचा काटा पुढेपुढेच जात राहातो. म्हणूनच कोणतंही हेवी डाएटिंग किंवा खूप जास्त व्यायाम न करता अगदी सोप्या पद्धतीने अगदी प्रभावीपणे वजन कमी कसं करायचं ते पाहा (how to loose weight fast?).. हे काही उपाय जर तुम्ही नियमितपणे केले तर अगदी १ ते दिड महिन्यांतच तुम्हाला वजनामध्ये खूप चांगला फरक दिसेल असं तज्ज्ञ सांगतात.(3 easy weight loss tips)
वजन कमी करण्याचे ३ सोपे उपाय
वजन कमी करण्यासाठी नेमकं कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवं याविषयी डाॅक्टरांनी दिलेली माहिती drmalharganla या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
घरी केलेला मंचुरियन मऊ न होता दगड-घट्ट होतात? ६ टिप्स- चायनिज हॉटेलपेक्षाही भारी होतील..
१. यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे वजन कमी करण्यासाठी भूक अजिबात मारू नका. उलट तुमची भूक ओळखायला शिका. उपाशी राहून वजन कमी होत असलं तरी तो काही वेटलॉसचा हेल्दी पर्याय नाही. त्यामुळे उपाशी राहू नका. मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी आणि ओमेगा तसेच व्हिटॅमिन्स शरीराला पुरेशा प्रमाणात मिळतील याची काळजी घ्या. हे पौष्टिक घटक शरीरात पुरेशा प्रमाणात असतील तर भुकेवर खूप नियंत्रण येते.
२. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेरचं खाणं कटाक्षाने टाळा. बाहेर तुम्ही कोणताही पदार्थ खाल्ला तरी त्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स, प्रिझर्व्हेटीव्ह यांचा खूप मारा केलेला असतो.
केस विंचरल्यावर कंगव्यात एकही केस दिसणार नाही, कांदा- चहा पावडरचा सोपा उपाय, केस गळणं बंद
त्यामुळे ते पदार्थ आरोग्यासाठी हानिकारकच असतात. वजन वाढविण्यासाठीही कारणीभूत ठरतात. त्यामुळे बाहेर जायचं असेल तर घरचा डबा सोबत न्या, पण बाहेरचं खाऊ नका.
३. रोज अगदी थोडा व्यायाम करा. जेवण झाल्यानंतर शतपावली आवर्जून करा. सुर्यनमस्कार, स्ट्रेचिंग असे छोटे छोटे व्यायाम करा.
हिरव्यागार मिरच्यांचं झणझणीत लोणचं, तोंडाला चव आणणारा मस्त पदार्थ, घ्या झटपट होणारी सोपी रेसिपी
याशिवाय शक्य झाल्यास गाडीचा वापर न करता थोड्या अंतरासाठी पायी चालत जाणे किंवा लिफ्टचा वापर करण्याच्या ऐवजी पायऱ्या चढणे, उतरणे अशा प्रकारचे साधे- सोपे व्यायाम करून पाहा. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवा. असं झाल्यास महिनाभरात तुम्हाला तुमच्या वजनात चांगलाच बदल दिसून येईल, असं डॉक्टर सांगतात.
Web Summary : Struggling with weight? Experts suggest three easy steps: Don't starve, eat healthy, avoid outside food, and do light exercise daily. Consistency is key for visible results within a month.
Web Summary : वजन बढ़ने से परेशान हैं? विशेषज्ञ तीन आसान उपाय बताते हैं: भूखे न रहें, स्वस्थ खाएं, बाहर का खाना टाले और रोज हल्का व्यायाम करें। एक महीने में दिखने वाले परिणाम के लिए निरंतरता महत्वपूर्ण है।