Lokmat Sakhi >Fitness > आजीबाईंना सलाम! १०० वर्षांच्या असूनही जीममध्ये जाऊन करतात व्यायाम, वाचा त्यांच्या निराेगी दिर्घायुष्याचं सिक्रेट

आजीबाईंना सलाम! १०० वर्षांच्या असूनही जीममध्ये जाऊन करतात व्यायाम, वाचा त्यांच्या निराेगी दिर्घायुष्याचं सिक्रेट

Social Viral: अवघ्या तिशी चाळिशीतच हात पाय गाळून बसला असाल तर १०० वर्षांच्या आजीबाईंचा हा व्हायरल व्हिडिओ एकदा बघाच..(100 year old woman shared her secret of longevity and fitness)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2025 09:20 IST2025-08-20T09:13:01+5:302025-08-20T09:20:01+5:30

Social Viral: अवघ्या तिशी चाळिशीतच हात पाय गाळून बसला असाल तर १०० वर्षांच्या आजीबाईंचा हा व्हायरल व्हिडिओ एकदा बघाच..(100 year old woman shared her secret of longevity and fitness)

100 year old woman shared her secret of longevity and fitness | आजीबाईंना सलाम! १०० वर्षांच्या असूनही जीममध्ये जाऊन करतात व्यायाम, वाचा त्यांच्या निराेगी दिर्घायुष्याचं सिक्रेट

आजीबाईंना सलाम! १०० वर्षांच्या असूनही जीममध्ये जाऊन करतात व्यायाम, वाचा त्यांच्या निराेगी दिर्घायुष्याचं सिक्रेट

Highlightsखूप काही वेगळं न करता साध्या सोप्या गोष्टी नेमाने केल्या तरी त्याचा शरीराला किती फायदा होऊ शकतो, हे त्या आजींच्या उदाहरणातून दिसून येतं. 

वयाची चाळिशी ओलांडली की अनेकजण स्वत:ला प्रौढ, वयस्कर समजू लागतात. मला हे जमणार नाही, एवढी दगदग मला झेपणार नाही अशी वाक्यं मग त्यांच्या तोंडी अगदी सहज येऊन जातात. पण एक आजीबाई मात्र अशा आहेत ज्या १०० वर्षांच्या असूनही स्वत:ला एकदम फिट आणि तरुण समजतात. या आजीबाई चक्क जीममध्ये जाऊन दणादण व्यायाम करतात. त्यांचा उत्साह आणि फिटनेस शब्दश: तरुणांना लाजविणारा आहे. त्यांच्याकडे पाहून कोणीही त्यांनी वयाची शंभरी गाठली आहे, असा अंदाज लावू शकणार नाही. या आजीबाईंचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर गाजतो आहे.(100 year old woman shared her secret of longevity and fitness)

 

वयाची शंभरी गाठूनही प्रचंड फिट असणाऱ्या आजीबाईंची गोष्ट..

१०० वर्षांच्या त्या आजीबाईंचा व्हिडिओ evrydayclub या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आजीबाई जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. एका तरुणाला त्यांचा उत्साह पाहून खरोखरच राहावलं नाही आणि त्याने काही प्रश्न विचारून आजीबाईंना बोलतं केलं.

आई म्हणून ऐश्वर्या रायला वाटते 'या' गोष्टीची प्रचंड चिंता, स्वत:वरचा विश्वास उडवणाऱ्या जगात..

त्यातूनच त्यांच्या निरोगी दिर्घायुष्याचं खरंखुरं सिक्रेट बाहेर आलं. आजींनी जे काही सांगितलं ते निरोगी जगण्यासाठी प्रत्येकालाच खूप उपयोगी ठरणारं आहे. खूप काही वेगळं न करता साध्या सोप्या गोष्टी नेमाने केल्या तरी त्याचा शरीराला किती फायदा होऊ शकतो, हे त्या आजींच्या उदाहरणातून दिसून येतं. 


 

त्या म्हणतात की निरोगी राहण्यासाठी त्या नियमितपणे अगदी रोज ४ किलोमीटर वॉकिंग करतात. याशिवाय रोज ३० मिनिटांचा त्यांचा वेगवेगळा व्यायाम ठरलेला असतो.

जादूची कांडी फिरवल्यासारखं घर क्षणात होईल स्वच्छ - पाहा १ सोपी ट्रिक, गौरीगणपतीच्या स्वागतासाठी व्हा सज्ज

रोज रात्री वेळेत झोपणे हा नियम त्या कटाक्षाने पाळतात आणि रात्री ९: ३० वाजता झोपी जातात. याशिवाय भरपूर भाज्या खाण्यावर त्यांचा भर आहे. तसेच जे काही खाणार ते पौष्टिकच असणार याची त्या खात्री करून घेतात. बघा त्यांनी सांगितलेले हे काही नियम पाळले तर आपणही निरोगी दिर्घायुष्य जगू शकतो. 


 

Web Title: 100 year old woman shared her secret of longevity and fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.