Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fashion > उन्हाळ्यात कोणते कपडे घालावेत? चुकीचे कापड ठरते त्वचेसाठी वाईट, पाहा काय वापरावे आणि काय नाही

उन्हाळ्यात कोणते कपडे घालावेत? चुकीचे कापड ठरते त्वचेसाठी वाईट, पाहा काय वापरावे आणि काय नाही

What to Wear in Summer? know about fabrics That Harm Your Skin and the Best Breathable Alternatives : उन्हाळ्यात कोणते कपडे वापरावेत जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2026 18:54 IST2026-02-25T18:50:34+5:302026-02-25T18:54:25+5:30

What to Wear in Summer? know about fabrics That Harm Your Skin and the Best Breathable Alternatives : उन्हाळ्यात कोणते कपडे वापरावेत जाणून घ्या.

What to Wear in Summer? know about fabrics That Harm Your Skin and the Best Breathable Alternatives | उन्हाळ्यात कोणते कपडे घालावेत? चुकीचे कापड ठरते त्वचेसाठी वाईट, पाहा काय वापरावे आणि काय नाही

उन्हाळ्यात कोणते कपडे घालावेत? चुकीचे कापड ठरते त्वचेसाठी वाईट, पाहा काय वापरावे आणि काय नाही

उन्हाळा सुरु झाला की कपड्यांची निवड ही केवळ फॅशनपुरती मर्यादित राहत नाही, तर ती थेट आरोग्याशी जोडली जाते. कडक उन्हात चुकीचे कापड वापरले तर अंगाला पुरळ येणे, खाज सुटणे, घाम जास्त येणे किंवा त्वचेवर लाल चट्टे उठणे असे त्रास होऊ शकतात. (What to Wear in Summer? know about fabrics That Harm Your Skin and the Best Breathable Alternatives)त्यामुळे उन्हाळ्यात कोणते कापड वापरावे आणि कोणते टाळावे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

उन्हात सर्वाधिक त्रासदायक ठरणारे कापड म्हणजे सिंथेटिक प्रकार. पॉलिस्टर, नायलॉन, रेयॉन किंवा जाड मिश्रित फॅब्रिक घाम शोषत नाहीत. त्यामुळे घाम त्वचेवर साचतो आणि त्वचा चिकट, ओलसर राहते. अशा परिस्थितीत बुरशीजन्य संसर्ग, उष्माघातासारखे त्रास किंवा घामोळे होण्याची शक्यता वाढते. याशिवाय खूप घट्ट आणि जाड कापड उष्णता साठवून ठेवते, त्यामुळे शरीराला पुरेशी हवा मिळत नाही. गडद रंगांचे कपडेही उन्हात अधिक उष्णता शोषतात, त्यामुळे शरीर अधिक तापते.

त्याउलट उन्हाळ्यात हलके, सैल आणि श्वास घेता येणारे कापड वापरणे योग्य ठरते. सूती कपडे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. सूत घाम पटकन शोषते आणि त्वचेपाशी हवा खेळती राहते. लिननसारखे कापडही उन्हाळ्यासाठी उत्तम असते, कारण ते हलके आणि थंडावा देणारे असते. मलमल, खादी किंवा कॉटन मिश्रित सैल कपडेही आरामदायक ठरतात. हलक्या रंगांचे कपडे उष्णता कमी शोषतात, त्यामुळे पांढरा, फिकट निळा, गुलाबी किंवा पेस्टल शेड्स निवडणे फायदेशीर ठरते.

उन्हाळ्यात कपडे निवडताना केवळ कापडाचा प्रकार नव्हे, तर त्याची फिटिंगही महत्त्वाची असते. खूप घट्ट कपड्यांऐवजी सैलसर आणि हवेशीर कपडे घालावेत. व्यायाम किंवा बाहेर काम करताना घाम पटकन घालवणारे आणि हलके फॅब्रिक वापरणे योग्य ठरते.

एकूणच, उन्हाळ्यात अंगाला होणारा त्रास टाळायचा असेल तर सिंथेटिक आणि जाड, घट्ट कापड टाळून सूती, हलके आणि हवेशीर कापड वापरणे हा उत्तम उपाय आहे. योग्य कपड्यांची निवड केल्यास केवळ आरामच मिळत नाही, तर त्वचेचे आरोग्यही जपले जाते. त्यामुळे फॅशनपेक्षा आरोग्याला प्राधान्य देत उन्हाळ्यात योग्य कापडांची निवड करणे गरजेचे आहे.

Web Title : गर्मी के लिए सही कपड़े: स्वस्थ त्वचा के लिए सही चुनाव करें।

Web Summary : गर्मी में त्वचा की समस्याओं से बचने के लिए सूती और लिनेन जैसे हवादार कपड़े चुनें। सिंथेटिक, टाइट और गहरे रंग के कपड़े जलन और घमौरियों का कारण बन सकते हैं। आराम और त्वचा के स्वास्थ्य के लिए हल्के, ढीले कपड़े चुनें।

Web Title : Best summer fabrics: Choose right clothes for healthy skin.

Web Summary : Choose breathable fabrics like cotton and linen during summer to avoid skin problems. Synthetic, tight, and dark-colored clothes can cause irritation and heat rash. Prioritize light, loose-fitting clothes for comfort and skin health.