फॅशनच्या दुनियेत काही ट्रेंड असे असतात जे पुन्हा पुन्हा परत येतात आणि प्रत्येक वेळी नव्या स्टाइलसह तरुणांना भुरळ घालतात. बॅगी पॅण्ट हा तसाच एक ट्रेंड आहे, जो आजच्या काळात पुन्हा एकदा जोरदार सुरु आहे. आरामदायक फिट, स्टायलिश लुक आणि सहज कॅरी करता येणारी रचना यामुळे बॅगी पॅण्ट तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. (New trending baggy pants are very comfortable , summer perfect cloths , must try )पूर्वी तर ही पॅण्ट आवडीने वापरली जायची मध्यंतरी त्याचे फॅड कमी झाले होते मात्र आता पुन्हा ती स्टाइल वापरली जात आहे.
बॅगी पॅण्टची खासियत म्हणजे तिचा सैलसर आणि रिलॅक्स्ड फिट. शरीराला चिकटणाऱ्या कपड्यांपेक्षा ही पॅण्ट अधिक मोकळेपणाची भावना देते, त्यामुळे दिवसभर आरामात राहता येतं. पूर्वी हा स्टाइल मुख्यतः हिप-हॉप संस्कृतीशी जोडला जात होता, पण आता तो सहज कोणीही वापरतो. मुलं आणि मुली दोघेही हा ट्रेंड आवडीने फॉलो करत आहेत.
या ट्रेंडमध्ये विविध प्रकारही पाहायला मिळतात. कार्गो बॅगी पॅण्ट्स, ज्यामध्ये मोठे पॉकेट्स असतात, त्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि कॅज्युअल लुकसाठी उत्तम मानल्या जातात. डेनिम बॅगी जीन्स हा एक क्लासिक प्रकार आहे, जो कॉलेज गोइंग तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. तसेच हाय-वेस्ट बॅगी पॅण्ट्स मुलींमध्ये खूप आवडत्या ठरत आहेत, कारण त्या स्टाइलसोबतच एक वेगळा फिट देतात. लिनन किंवा कॉटन मटेरियलमधील बॅगी पॅण्ट्स उन्हाळ्यासाठी हलक्या आणि आरामदायक असतात.
तरुणांमध्ये बॅगी पॅण्टची क्रेझ वाढण्यामागे सोशल मीडिया आणि सेलिब्रिटींचा मोठा वाटा आहे. अनेक इन्फ्लुएन्सर्स आणि स्टार्स हा लुक कॅरी करताना दिसतात, त्यामुळे हा ट्रेंड पटकन लोकप्रिय होतो. याशिवाय, आजची पिढी कम्फर्ट फर्स्ट या संकल्पनेवर भर देते, आणि बॅगी पॅण्ट त्यासाठी परफेक्ट पर्याय ठरते. गौरी प्रधान , हर्षवर्धन कपूर, करीना कपूर, दीपिका पदूकोण इतरही अनेक सेलिब्रिटी आजकाल विविध प्रकारच्या बॅगी पॅण्ट वापरतात. बॅगी पॅण्टची किंमत पाहायला गेलं तर अगदी २०० पासून ८ ते ९ हजारापर्यंत जाते. कंपनी आणि प्रकारानुसार त्याची किंमत ठरते. उन्हाळ्यासाठी एकदम मस्त असा प्रकार आहे.
Web Summary : Baggy pants are back in style, offering comfort and a relaxed fit. Celebrities and influencers are popularizing various styles, including cargo and denim, making them a must-have for the younger generation. Prices vary widely.
Web Summary : बैगी पैंट्स फिर से फैशन में हैं, जो आराम और ढीला फिट प्रदान करते हैं। मशहूर हस्तियां और प्रभावशाली लोग कार्गो और डेनिम सहित विभिन्न शैलियों को लोकप्रिय बना रहे हैं, जिससे वे युवा पीढ़ी के लिए जरूरी हो गए हैं। कीमतें व्यापक रूप से भिन्न होती हैं।