lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fashion > आलिया- अनुष्कासारखं परफेक्ट फिटिंगचं ब्लाऊज शिवायचं? १ सोपा उपाय- छान फिनिशिंग मिळेल

आलिया- अनुष्कासारखं परफेक्ट फिटिंगचं ब्लाऊज शिवायचं? १ सोपा उपाय- छान फिनिशिंग मिळेल

How To Get Perfect Finishing And Fitting Blouse: सेलिब्रिटींचे ब्लाऊज एवढे परफेक्ट फिटिंगचे आणि फिनिशिंगचे कसे असतात, असा प्रश्न पडला असेल तर हे बघा त्याचं उत्तर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 04:03 PM2024-02-20T16:03:35+5:302024-02-20T16:04:21+5:30

How To Get Perfect Finishing And Fitting Blouse: सेलिब्रिटींचे ब्लाऊज एवढे परफेक्ट फिटिंगचे आणि फिनिशिंगचे कसे असतात, असा प्रश्न पडला असेल तर हे बघा त्याचं उत्तर....

How to get perfect finishing and fitting blouse, lycra fusing for blouse stitching, How to get celebrity style fitting & finishing in your blouses  | आलिया- अनुष्कासारखं परफेक्ट फिटिंगचं ब्लाऊज शिवायचं? १ सोपा उपाय- छान फिनिशिंग मिळेल

आलिया- अनुष्कासारखं परफेक्ट फिटिंगचं ब्लाऊज शिवायचं? १ सोपा उपाय- छान फिनिशिंग मिळेल

Highlightsबऱ्याचदा ब्लाऊज अंगाला टोचतं त्यामुळे आपण अस्वस्थ होऊन जातो. हा त्रास कमी करण्यासाठीही लायक्रा फ्युजिंग उपयुक्त ठरतं. 

कोणत्याही साडीचं, लेहेंग्याचं किंवा घागऱ्याचं सौंदर्य तेव्हाच खुलून दिसतं, जेव्हा त्याचं ब्लाऊज  एकदम  परफेक्ट मापाचं जमून आलेलं असतं. बऱ्याचदा ब्लाऊज आपल्या मापाला अगदी व्यवस्थित आलेलं असतं. तरीही त्याची फिनिशिंग आपल्याला जशी पाहिजे, तशी नसते. त्यात काहीतरी कमीच वाटतं (How to get perfect finishing and fitting blouse). त्याउलट सेलिब्रिटींनी घातलेलं कोणतंही ब्लाऊज बघा. ते आपल्याला दिसायला अगदी छान वाटतं. तुम्हालाही सेलिब्रिटींसारखं परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग असणारं ब्लाऊज शिवायचं असेल तर मग ब्लाऊज शिवण्यासाठी सेलिब्रिटी वापरतात, ती ट्रिक वापरा (How to get celebrity style fitting & finishing in your blouses ). तुमचंही ब्लाऊज अगदी तुम्हाला पाहिजे, तसंच होईल. (lycra fusing for blouse stitching)

 

ब्लाऊजचं फिनिशिंग परफेक्ट येण्यासाठी उपाय

शिवून घेतलेल्या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग दोन्ही परफेक्ट असावं, यासाठी नेमका कोणता उपाय करायचा, याची माहिती fashion_fitness_by_dimpy या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आली आहे.

कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी करणारे २ सोपे आयुर्वेदिक उपाय- बद्धकोष्ठतेचा त्रास कायमचा जाईल

यामध्ये त्यांनी लायक्रा फ्यूजिंग वापरण्याचा सल्ला दिला आहे. आता हे लायक्रा फ्युजिंग म्हणजे नेमकं काय ते पाहूया.. हा एक कपड्याचा प्रकार असतो, जो मोठमोठाले सेलिब्रिटी फॅशन डिझायनर वापरतात. तुमच्या शहरातल्या मार्केटमध्येही हा कपडा मिळू शकतो. किंवा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तो कपडा मागवू शकता. 

 

लायक्रा फ्युजिंग हा एक अतिशय मऊ आणि जाळीदार कपडा असतो. साधारण ब्लाऊज पीस जेवढं लागतं, तेवढ्याच मापाचा हा कपडा विकत घ्या.

बघा मोत्याच्या चिंचपेटीचे वेगवेगळे प्रकार, लग्नकार्यात असा एक तरी दागिना आपल्याकडे पाहिजेच...

ब्लाऊज शिवताना टेलरला तो कपडा ब्लाऊजच्या खाली लावायला सांगा. अस्तरचं ब्लाऊज असेल तर आधी ब्लाऊज पीस, त्याखाली लायक्रा फ्युजिंग आणि त्याखाली अस्तर अशा पद्धतीने शिवायला सांगा.

अशा पद्धतीने शिवलेलं ब्लाऊज जर तुम्ही घातलं तर ते दिसायला आकर्षक तर दिसेलच, पण तुम्हाला स्वत:ला देखील ते खूपच जास्त आरामदायी वाटेल. बऱ्याचदा ब्लाऊज अंगाला टोचतं त्यामुळे आपण अस्वस्थ होऊन जातो. हा त्रास कमी करण्यासाठीही लायक्रा फ्युजिंग उपयुक्त ठरतं. 

 

Web Title: How to get perfect finishing and fitting blouse, lycra fusing for blouse stitching, How to get celebrity style fitting & finishing in your blouses 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.