Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fashion > जान्हवी कपूरची 70 हजार रुपयांची फ्लोरल प्रिंटेड साडी, हिरवीगार समरकुल फॅशन

जान्हवी कपूरची 70 हजार रुपयांची फ्लोरल प्रिंटेड साडी, हिरवीगार समरकुल फॅशन

Summer Fashion of Janhavi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरची खास समर स्पेशल कुल साडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे... बघा या साडीची नजाकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 18:48 IST2022-05-09T18:00:45+5:302022-05-09T18:48:42+5:30

Summer Fashion of Janhavi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरची खास समर स्पेशल कुल साडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे... बघा या साडीची नजाकत

Fashion Trend In Summer: Actress Janhavi Kapoor's summer cool floral print saree worth Rs.70k  | जान्हवी कपूरची 70 हजार रुपयांची फ्लोरल प्रिंटेड साडी, हिरवीगार समरकुल फॅशन

जान्हवी कपूरची 70 हजार रुपयांची फ्लोरल प्रिंटेड साडी, हिरवीगार समरकुल फॅशन

Highlightsसाडीवर एवढे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे वर्क असूनही ते उत्तमप्रकारे एकमेकांत गुंफणे आणि कुठेही अति न होऊ देणे, हीच तर तिच्या साडीची नजाकत आहे. 

वेस्टर्न कपडे असो किंवा ट्रॅडिशनल लूक.. जान्हवी दोन्ही पद्धतीचे कपडे अतिशय उत्तम पद्धतीने कॅरी करू शकते. शिवाय तिचा ड्रेसिंग सेन्सही अतिशय जबरदस्त आहे. त्यामुळेच तर तिच्या कपड्यांची, तिच्या ॲक्सेसरीजची आणि तिच्या स्टाईलची नेहमीच सोशल मिडियावर चर्चा असते. सध्या जान्हवीने तिचे हिरव्या रंगातल्या फ्लोरल प्रिंटेड (floral print saree of Janhavi Kapoor) साडीतले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून या फोटोंमध्ये ती कमालीची आकर्षक दिसते आहे.

 

उन्हाळ्यासाठी खास साडी कलेक्शन करण्याच्या विचारात असाल तर जान्हवीचा हा फ्लोरल प्रिंटेड साडीतला लूक एकदा बघाच.. अर्थात तिची ही साडी ७० हजार रुपयांची आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ती अजिबातच आवाक्यातली नाही. पण तशीच रंगछटा किंवा प्रिंट असणारी एखादी साडी आपल्याला आपल्या बजेटमध्येही मिळू शकतेच. उन्हाळ्यात अशा फ्रेश रंगाच्या, वजनाने हलक्याफुलक्या असणाऱ्या आणि फ्लोरल प्रिंट साड्यांना विशेष मागणी असतेच. त्यामुळे लोकल मार्केट किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरदेखील अशा साड्या मिळू शकतात. 

 

जान्हवीच्या साडीची नजाकत
जान्हवीने नेसलेली ही ७० हजारांची साडी सेलिब्रिटी डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाईन केली असून Magic Magpies Saree Set असं खास नाव या साडीला देण्यात आलं आहे. जान्हवीच्या या साडीवर अनेक प्रकारचं वर्क केलेलं आहे. त्यामुळेच तर साडीची किंमत एवढी जास्त आहे. हिरव्या रंगाच्या या फुलाफुलांच्या साडीवर एम्ब्रॉयडरी तर आहेच पण पिवळ्या रंगाने पाईपिंग वर्कही केलं आहे. शिवाय पदरावर आणि साडीच्या काही भागावर सिक्विन वर्कही आहे. साडीवर एवढे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे वर्क असूनही ते उत्तमप्रकारे एकमेकांत गुंफणे आणि कुठेही अति न होऊ देणे, हीच तर तिच्या साडीची नजाकत आहे. 

 

साडीच्याच प्रिंटचं हिरव्या रंगाचं ब्लाऊज, त्यावर गुलाबी कानातले, मोकळे सोडलेले केस, हातात एकच अंगठी आणि हलका मेकअप यामुळे जान्हवी खरोखरंच सुंदर दिसते आहे. इन्स्टाग्रामवर तिने शेअर (instagram share) केलेले फोटो बोनी कपूर (Boni Kapoor) यांनाही खूपच आवडले असून त्यांनी 'अति सुंदर' असं म्हणत लेकीला दिलखुलास दाद दिली आहे. 
 

Web Title: Fashion Trend In Summer: Actress Janhavi Kapoor's summer cool floral print saree worth Rs.70k