Lokmat Sakhi >Fashion > बनारसी साडी, सिंदूर अन गळ्यात माणिक मोत्यांचा हार! कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय आली अन्.....

बनारसी साडी, सिंदूर अन गळ्यात माणिक मोत्यांचा हार! कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय आली अन्.....

Cannes 2025: कान्स महोत्सवात आजवर बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. पण सगळ्यात वेगळा लूक ठरला ऐश्वर्या रायचा..(Aishwarya Rai stuns in regal ivory-gold look and flaunts sindoor)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2025 13:56 IST2025-05-22T13:55:26+5:302025-05-22T13:56:20+5:30

Cannes 2025: कान्स महोत्सवात आजवर बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. पण सगळ्यात वेगळा लूक ठरला ऐश्वर्या रायचा..(Aishwarya Rai stuns in regal ivory-gold look and flaunts sindoor)

Cannes 2025: Aishwarya Rai stuns in regal ivory-gold look, flaunts sindoor | बनारसी साडी, सिंदूर अन गळ्यात माणिक मोत्यांचा हार! कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय आली अन्.....

बनारसी साडी, सिंदूर अन गळ्यात माणिक मोत्यांचा हार! कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय आली अन्.....

Highlightsएरवी टिकली, सिंदूर या गोष्टींसकट कान्सला हजेरी लावणे टाळले जाते. पण यंदा मात्र ऐश्वर्याने अगदी ठसठशीत सिंदूर भरला आणि त्याचीच चर्चा जगभर होत आहे.

कान्स महोत्सव म्हणजे फॅशन जगतातला सगळ्यात मोठा सोहळा. जगभरातून कित्येक सेलिब्रिटी या सोहळ्याला हजेरी लावतात. या सोहळ्यात सेलिब्रिटींनी घातलेल्या कपड्यांची, दागिन्यांची चर्चा अख्ख्या जगभरात होते. सध्या सुरू असलेल्या या सोहळ्यात शाहरुख खान, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर यांनी ज्या लूकमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली होती, त्याची भरपूर चर्चा झाली. पण सध्या या सगळ्यांपेक्षा जास्त चर्चा होत आहे ती अभिनेत्री तसेच माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिच्या लूकची.. कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याची एन्ट्री कशी होईल, तिचा लूक कसा असेल याविषयी अनेकांच्या मनात प्रचंड कुतूहल असते. तेच कुतूहल यावेळीही दिसून आले.. ऐश्वर्याची एन्ट्री एकदम दणक्यात आणि वेगळ्या थाटात झाली.(Aishwarya Rai stuns in regal ivory-gold look and flaunts sindoor)

 

आजवर ऐश्वर्याने जेव्हा केव्हा कान्समध्ये उपस्थिती लावली तेव्हा ती वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसून आली. पण यावेळी मात्र तिने साडी या टिपिकल भारतीय पेहरावाची निवड केली होती. संस्कृतीशी असणारी पाळंमुळं तिने या पेहरावातून दिसून आली.

कोरोना वाढतोय! संसर्ग टाळण्यासाठी स्वयंपाक घरातल्या स्वच्छतेविषयी FSSAI ने सांगितले ३ नियम

ऐश्वर्याने नेसलेली चंदेरी रंगाची साडी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केली होती. त्या चमचमत्या साडीचे काठ अतिशय नाजूक होते आणि ते सोन्याच्या जरीने मढवलेले होते. तशाच पद्धतीचा शेला तिने उजव्या खांद्यावरूनही घेतला होता. तिची साडी तर देखणी होतीच पण त्यासोबतच तिचे दागिनेही खूप आकर्षक होते.


 

चंदेरी रंगाच्या साडीवर ऐश्वर्याने लालबुंद माणकाच्या अतिशय भरजरी नेकलेसची निवड केली होती. गळ्याला चिकटून एक चोकर आणि खाली ७ ते ८ पदरी मोठा लांबलचक हार असे दागिने ऐश्वर्याला एकदम शाही लूक देऊन गेले. तिच्या हातातल्या अंगठ्याही खूप लक्षवेधी होत्या.

फ्रिजमधल्या काचा, दरवाज्याचं रबर खूप कळकट झालं? १ सोपा उपाय- १० मिनिटांत फ्रिज चकाचक

पण या सगळ्यात शोज स्टॉपर ठरला तो ऐश्वर्याने भांगेत भरलेला सिंदूर. एरवी टिकली, सिंदूर या गोष्टींसकट कान्सला हजेरी लावणे टाळले जाते. पण यंदा मात्र ऐश्वर्याने अगदी ठसठशीत सिंदूर भरला आणि त्याचीच चर्चा जगभर होत आहे. काही जण तिच्या या लूकचं तोंडभरून कौतूक करत आहेत तर काही जणांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 

 

Web Title: Cannes 2025: Aishwarya Rai stuns in regal ivory-gold look, flaunts sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.