lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fashion > दिवाळीसाठी कपड्यांची निवड करताना लक्षात ठेवा ७ हटके फॅशन्स; सगळ्यांमध्ये दिसाल उठून, देखण्या...

दिवाळीसाठी कपड्यांची निवड करताना लक्षात ठेवा ७ हटके फॅशन्स; सगळ्यांमध्ये दिसाल उठून, देखण्या...

7 Styles to rock in this Diwali : यंदाच्या दिवाळीला नेमकं काय घालावं ते तुम्हाला समजत नसेल तर पाहूया त्यासाठी काही खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2023 01:08 PM2023-11-09T13:08:29+5:302023-11-09T13:13:22+5:30

7 Styles to rock in this Diwali : यंदाच्या दिवाळीला नेमकं काय घालावं ते तुम्हाला समजत नसेल तर पाहूया त्यासाठी काही खास टिप्स...

7 Styles to rock in this Diwali : 7 Hot Fashions to Remember While Choosing Clothes for Diwali; You will stand out among all, handsome... | दिवाळीसाठी कपड्यांची निवड करताना लक्षात ठेवा ७ हटके फॅशन्स; सगळ्यांमध्ये दिसाल उठून, देखण्या...

दिवाळीसाठी कपड्यांची निवड करताना लक्षात ठेवा ७ हटके फॅशन्स; सगळ्यांमध्ये दिसाल उठून, देखण्या...

वर्षभरातला मोठा सण असल्याने दिवाळीच्या दिवसांत आपण स्वत:कडे, घराकडे विशेष लक्ष देतो. या काळात स्वत:साठी कपड्यांची खरेदी करण्याची परंपरा तर वर्षानुवर्षे चालत आली आहे. वर्षभर तर आपण कपडे घेतोच पण दिवाळीच्या निमित्ताने आपण स्वत:ला, कुटुंबातील सगळ्यांना आवर्जून कपडे घेतो. दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांकडे फराळाला, जेवायला जाण्याचे प्लॅन्स होतात आणि त्यानिमित्ताने आपण नातेवाईक, मित्रमंडळी यांना आवर्जून भेटतो. यावेळी उठून दिसण्यासाठी आपले कपडे, दागिने छान असावेत असं प्रत्येकीला वाटतं. मग साडी, अनारकली पॅटर्न, पंजाबी ड्रेस, घागरा, पलाझो किंवा नव्याने आलेले कॉर्ड सेट असे वेगवेगळे पॅटर्न घालून आपण सगळ्यांमध्ये उठून दिसू शकतो. महिलांना कपड्यांमध्ये बरेच प्रकार उपलब्ध असतात तरी यंदाच्या दिवाळीला नेमकं काय घालावं ते तुम्हाला समजत नसेल तर पाहूया त्यासाठी काही खास टिप्स (7 Styles to rock in this Diwali)...

१. मॅक्सी ड्रेस

घालायला सोपा, कॅरी करायला सुटसुटीत असा लॉंग वन पीस किंवा मॅक्सी ड्रेस तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने नक्की ट्राय करु शकता. यामध्ये थोडे गडद रंग किंवा डिझाईन असलेला ड्रेस घेतला तर दिवाळीसाठी हा चांगला पर्याय ठरु शकतो. 

२. लेहंगा 

गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकारचे लेहंगा चांगलेच फॅशन इन आहेत. अगदी कमी रेंजमध्ये डिझायनर ओढणी असणारा हा लेहंगा मेकअप आणि छान हेअरस्टाईल केली तर दिवाळीत मस्त खुलून दिसतो. 

(Image : Google )
(Image : Google )

३. पारंपरिक स्कर्ट-ब्लाऊज

बाजारात सध्या विविध प्रकारचे पारंपरिक प्रकारचे स्कर्ट मिळतात. त्यावर एखादा छान टॉप पेअर केला आणि थोडी हेवी ज्वेलरी घातली तर हा पॅटर्न छान दिसतो. 

४. सलवार- कुर्ता

खूप हेवी काही नको असेल तर सलवार-कुर्ता किंवा पलाझो, लेगीन्स आणि कुर्ता असेही छान वाटते. हल्ली बाजारात विविध प्रकारचे, वेगवेगळे कट असलेले कुर्ते मिळतात यातले थोडे डिझायनर प्रकारातले कुर्ते दिवाळीसाठी छान दिसतात. 

५. अनारकली 

गेल्या काही वर्षांपासून हा पॅटर्न सगळ्याच वयोगटात आवडीने वापरला जातो. पारंपरिक लूक देणारा घोळदार असा अनारकली छान दागिने घातले तर मस्त खुलून येतो. 

६. हेवी ओढणी 

तुम्हाला खूप हेवी ड्रेस नको असेल आणि तरीही दिवाळीसाठी मस्त लूक करायचा असेल तर तुम्ही सिंपल ड्रेस आणि त्यावर बनारसी, चंदेरी, कलमकारी प्रकारातील ओढणी नक्की पेअर करु शकता. अशाप्रकारच्या हेवी ओढणीने तुमचा लूक खुलून येण्यास मदत होते.

७. साडी 

साडी हा पारंपरिक प्रकार असून विविध प्रकारच्या काठा पदराच्या, डिझायनर किंवा स्टायलिश साड्या तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने नेसू शकता. साडीमध्ये तर कोणत्याही वयातील महिला सुंदरच दिसते. त्यामुळे सणाचा पारंपरिक लूक पूर्ण होण्यास मदत होते. 

Web Title: 7 Styles to rock in this Diwali : 7 Hot Fashions to Remember While Choosing Clothes for Diwali; You will stand out among all, handsome...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.