Corona effect makes women leaving thier jobs. But Why? | कोरोना बायकांच्या नोक-यांच्या मूळावर का उठलाय? का सोडताहेत बायका नोक-या?

कोरोना बायकांच्या नोक-यांच्या मूळावर का उठलाय? का सोडताहेत बायका नोक-या?

-प्रतिनिधी

कोरोनाने जीव नको केला, असं आपण किती सहज म्हणतो. पण जगभरात बायकांच्या वाटेत कोरोनाने नवे प्रश्न आणून उभे केले आहेत. कॅनडातल्या बायका सध्या जगण्याच्या विचित्र तिढ्यावर अशाच उभ्या आहेत. कॅनडात प्रोस्परिटी प्रोजेक्ट म्हणून पोलारा स्ट्रॅटेजिक इनसाइट्स नावाच्या एका संस्थेने एक सर्वेक्षण केलं. 
त्यात त्यांनी स्त्री-पुरुष दोघांशीही रोजगार, वेतनकपात याविषयावर संवाद साधला. दर तीन पैकी एका बाईने सांगितलं की, कोरोनाकाळात मी नोकरी सोडून दिली कारण नोकरी करणंच आता शक्य नाही.
त्याचं कारण काय? तर एकीकडे नोकरीच्या ठिकाणी वाढलेले ताण, कामाची अपेक्षा, दुसरीकडे मुलं याकाळात पूर्णवेळ घरी, त्यांना पाळणाघरात ठेवायची सोय बंद, मुलांचा सांभाळ करायला कुणी नाही. घरकाम आहेच. यासा-यात नोकरी करणंच अशक्य झालं कारण मुलांना कोण सांभाळणार? असं अनेक बायकांनी सांगितलं.
पुरुषांच्या वाटेलाही हे ताण आले, हे प्रश्न होतेच, पण मात्र मुलांसाठी नोकरी सोडू किंवा सोडली असं म्हणणारे पुरुष कमीच होते.
बायकांना मात्र मूल की नोकरी यात अर्थातच मूल हाच पर्याय निवडणं भाग होतं. त्यांनी तो निवडलाही.
मात्र कोरोनाने अनेकींना पुन्हा चार पाऊलं मागे नेत, जगण्यात हे की ते, असे दोनच पर्याय ठेवलेले दिसतात. आणि ते निवडताना जगण्याची भयंकर कसरत बायकांच्याच वाट्याला येते आहे..

 

 

Web Title: Corona effect makes women leaving thier jobs. But Why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.