Shweta Tiwari Fitness Secrets: बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या फिटनेसमुळे आणि फिट फिगरमुळे नेहमीच चर्चेत असते. 44 वय ओलांडूनही श्वेता ज्या पद्धती फिट आणि अॅक्टिव दिसते, त्याचा अनेक तरूणींना हेवा वाटतो. अशात अनेकांना तिच्या फिटनेसचं रहस्य जाणून घ्यायचं असतं. त्याबाबत तिची मुलगी पलक तिवारीनं खुलासा केला आहे.
पलक तिवारीने अलिकडेच मशाबेल इंडियाला मुलाखत दिली. त्यात तिने खुलासा केला की, तिची आई श्वेता तिवारी कधीच नियमितपणे जिमला जात नाही आणि कोणतंही खास फिटनेस रूटीन फॉलो करत नाही. अशात आपल्यालाही प्रश्न पडला असेल की, श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य काय आहे? ते पाहुयात.
श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य
श्वेताची मुलगी पलक तिवारीने सांगितलं की, 'माझ्या आईच्या फिटनेस लोक भरपूर कौतुक करतात. पण ती स्वत: अवाक् असते की, लोक असं का करतात. कारण ना ती जिमला जाते ना कोणता खास व्यायाम करते. फिगर किंवा फिटनेससाठी माझी आई काहीच वेगळं करत नाही. म्हणूनच ती नेहमीच म्हणते की, लोक काय बोलतात, हे मला कळतंच नाही'.
पलक तिवारीच्या फिटनेसचं रहस्य
पलकने यावेळ तिच्या फिटनेस रूटीनबाबतही सांगितलं. पलक म्हणाली की, 'मी तर जिमला जाते. मी आई इतकी नशीबवान नाही. मी आठवड्यातील पाच दिवस वर्कआउट करते. मी कार्डियो करते. तेही मी अलिकडेच सुरू केलं आहे'.
श्वेता तिवारी काय म्हणाली?
जुलै महिन्यात श्वेता तिवारीने सांगितलं होतं की, तिने अलिकडे पिलेट्स करणं सुरू केलं आहे. ती म्हणाली की, मी अलिकडेच पिलेट्स करणं सुरू केलं. जवळपास दोन महिने झालेत. मी चालायला जाते आणि हलकं वेट ट्रेनिंगही करते. खूप जास्त काही करत नाही. हळूहळू सुरूवात करत आहे.
ती म्हणाली की, योगा करण्याचाही प्रयत्न केला. पण स्वत:ला इतकं शांत ठेवू शकली नाही. ती पुढे म्हणाली की, मी प्रयत्न केला. पण डोळे बंद करताच माझा मेंदू वेगानं काम करू लागतो. मी आता किराणा, कपडे धुणे अशी जी कामं विसरली आहे त्याबाबत विचार करू लागली आहे.
Web Summary : Palak Tiwari reveals her mother, Shweta Tiwari, doesn't follow strict fitness routines. Shweta does Pilates and light weight training. Palak herself workouts five days a week with cardio.
Web Summary : पलक तिवारी ने बताया कि उनकी मां श्वेता तिवारी कोई खास फिटनेस रूटीन नहीं अपनातीं। श्वेता पिलेट्स और हल्का वेट ट्रेनिंग करती हैं। पलक खुद हफ्ते में पांच दिन कार्डियो के साथ वर्कआउट करती हैं।