Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली पितो ते पिकल ज्यूस नेमके काय असते? खेळाडूंना फार आवडते, जो तो सध्या तेच पितोय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:37 IST

Benefits Of Pickle Juice : पिकल ज्यूस काय असतं आणि तो पिऊन काय फायदे मिळतात तो कसा बनवला जातो? तर हा पिकल ज्यूस अनेक खेळाडूंच्या डाएटचा महत्वाचा भाग आहे.

Benefits Of Pickle Juice : क्रिकेटर विराट कोहली आपल्या फिटनेस, स्टॅमिनामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याची डाएटही नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच त्याच्या डाएटमधील एका गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष खेचलं गेलं. ती म्हणजे पिकल ज्यूस म्हणजे लोणच्याचं पाणी. अर्थातच अनेकांना प्रश्न पडला असेल की, हा पिकल ज्यूस काय असतं आणि तो पिऊन काय फायदे मिळतात तो कसा बनवला जातो? तर हा पिकल ज्यूस अनेक खेळाडूंच्या डाएटचा महत्वाचा भाग आहे. यामागचं कारण आणि याचे खेळाडूंना होणारे फायदे आपण जाणून घेणार आहोत.

पिकल ज्यूस काय असतो?

पिकल ज्यूस हा ज्यूस मीठ, पाणी, व्हिनेगर - लिंबू, मसाले आणि कधी कधी तेल यांच्यामुळे तयार होतो. काकडीचं लोणचं असेल तर त्यातला द्रव म्हणजेच पिकल ज्यूस. म्हणजेच काय तर एखाद्या लोणच्याचं पाणी म्हणजे पिकल ज्यूस. या ज्यूसमध्ये सोडिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम यांसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. जे घामाच्या माध्यमातून शरीरातून बाहेर पडतात. जेव्हा खेळाडू अनेक तास खेळतात, व्यायाम करतात तेव्हा घामातून हे इलेक्ट्रोलाइ्ट्स बाहेर पडतात. अशात पिकल ज्यूसने हे इलेक्ट्रोलाइट्सचं असंतुलन लगेच रिकव्हर होण्यास मदत मिळते. विराट कोहलीसारख्या हाय-इंटेंसिटी खेळाडूसाठी हे फार फायदेशीर ठरतं. कारण याने डिहायड्रेशन दूर होतं आणि थकवाही दूर होतो.

पिकल ज्यूसचा सगळ्यात मोठा फायदा मसल क्रॅम्प्समध्ये मिळतो. अनेक शोधातून हे स्पष्ट झालं आहे की, पिकल ज्यूस प्यायल्याने नर्व सिग्नलवर प्रभाव पडतो, ज्यामुळे स्नायूंवर अचानक पडणारा तणाव आणि वेदना दूर होतात. याच कारणाने अनेक खेळाडू मॅच किंवा वर्कआउट दरम्यान हे पितात. कारण याने शरीर हायड्रेट राहतं.

लक्षात ठेवण्यासारखं

इतके फायदे आहेत म्हणून पिकल ज्यूस खूप जास्त प्यावा असंही नाही. पिकल ज्यूस कमी प्रमाणात पिऊनही शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात. याने ब्लड प्रेशरला सपोर्ट मिळतो, थकवा दूर होतो आणि एनर्जीही मिळते. अनेक खेळाडू पिकल ज्यूस एक्सपर्टच्या सल्ल्यानेच घेतात. कारण पिकल ज्यूसमध्ये मीठ जास्त असतं, त्यामुळे प्रमाणातच घ्यावं. बीपी किंवा किडनीचे त्रास असतील तर टाळलेलं बरं. जास्त घेतल्यास अॅसिडिटी, उलटी, पोटात जळजळ होऊ शकते. तसेच हा पिकल ज्यूस रोज पिणंही योग्य नसतं.

कसा बनवाल पिकल ज्यूस?

घरच्या घरी साधा पिकल ज्यूस बनवायचा असेल तर त्यासाठी १ कप पाणी, १ चमचा मीठ, १ ते २ चमचे व्हिनेगर किंवा लिंबाचा रसा, थोडे मसाले जसे की, मोहरी, मिरे, जिरे तेही हवे असल्यासच. आधी पाण्यात मीठ पूर्ण विरघळवा. त्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घाला. मसाले टाकून नीट ढवळा. हे मिश्रण काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. २–३ दिवसांनी पिकल ज्यूस वापरायला तयार असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Virat Kohli's pickle juice: Benefits, recipe, and why athletes love it.

Web Summary : Pickle juice, favored by athletes like Virat Kohli, replenishes electrolytes lost during intense activity. It combats muscle cramps and dehydration due to sodium, potassium, and magnesium content. Consume in moderation and consult experts, especially if you have health issues.
टॅग्स :अन्नविराट कोहलीफिटनेस टिप्स