Join us  

क्रिती सेनॉनसारखा फिटनेस हवा? घ्या तिची आवडती हेल्दी चविष्ट रेसिपी, असा नाश्ता की दिल खुश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 11:54 AM

Kriti Sanons Favourite Oats Chia Pudding : क्रिती आपल्या रोजच्या ब्रेकफास्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्दी फुड्सचा समावेश करते त्यापैकीच एक म्हणजे ओट्स चिया पुडींग.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तेलुगू चित्रपटसृष्टीत स्वतःचे नाव कमावणाऱ्या क्रिती सेनॉन या बॉलिवूड अभिनेत्रीला आपण सगळेच ओळखतो. क्रिती सेनॉन बॉलिवूडमध्ये आल्यावर बरेली की बर्फी, दिलवाले, लुक्का छुपी, मिमी यांसारख्या यशस्वी चित्रपटांसह बॉलीवूड इंडस्ट्रीत स्वत:चा ठसा उमटवला आहे. क्रिती सेनॉन सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या स्टायलिश लुकमधील फोटोंव्यतिरिक्त क्रिती सेनॉन आपल्या चाहत्यांसोबत वर्कआउट करतानाचेही फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. फिटनेस फ्रीक असणाऱ्या क्रिती सेनॉनच्या सोशल मीडिया अकाउंटवर तुम्हाला अनेक प्रकारचे एक्सरसाइज व्हिडीओ पाहायला मिळतील. एवढेच नव्हे तर शरीर फिट राहण्यासाठी व्यायामासोबत पौष्टिक आहाराचेही सेवन करणं तितकेच आवश्यक आहे. यासाठी क्रिती आपल्या व्यायामासोबतच डाएटकडेपण तितक्याच बारकाईने लक्ष देते. क्रिती आपल्या रोजच्या ब्रेकफास्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्दी फुड्सचा समावेश करते त्यापैकीच एक म्हणजे ओट्स चिया पुडींग. ओट्स चिया पुडींग हा तिचा आवडता ब्रेकफास्ट आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या ब्रेकफास्टमध्ये ओट्स चिया पुडींगचा समावेश करू शकता व क्रितीप्रमाणेच फिट राहू शकता. ओट्स चिया पुडींग बनवायचे कसे हे समजून घेऊयात(Kriti Sanons Favourite Oats Chia Pudding).

साहित्य - 

१. ओट्स - १/२ कप २. दूध - १/२ कप ३. योगर्ट - १/४ कप ४. चिया सीड्स - १ टेबलस्पून ५. मध - २ टेबलस्पून ६. पीनट बटर - १ टेबलस्पून ७. फळांचे लहान तुकडे - तुमच्या आवडीनुसार फळ घ्या. 

कृती - 

१. एका बाऊलमध्ये योगर्ट आणि दूध एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या.  २. त्यानंतर दूध आणि योगर्टच्या मिश्रणांत चिया सीड्स, मध आणि पीनट बटर घालून एकत्रित करून घ्या. ३. त्यानंतर हे सगळं एकजीव झालेलं मिश्रण रात्रभर फ्रिजमध्ये ठेवून रेफ्रिजरेट करून घ्या. फ्रिजमध्ये ठेवल्याने सकाळपर्यंत त्याची कंन्सिस्टंसी परफेक्ट सेट होईल. 

४. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्यावेळी हा बाऊल फ्रिजमधून काढून घ्या. जर तुम्हाला त्याची कंन्सिस्टंसी फार घट्ट वाटत असेल तर त्यात ४ ते ५ चमचे दूध घाला.

५. तुमच्या आवडीनुसार फळांचे लहान तुकडे करून घ्या. हे फळांचे तुकडे त्या ओट्स बाऊल मध्ये टॉपींग म्हणून सजवून घ्या. (स्ट्रॉबेरी. बनाना, ब्लूबेरीज,किवी, सफरचंद यांसारखी फळ तुम्ही टॉपींगसाठी वापरू शकता.)

हे पण करू शकता - 

१. जर तुम्हाला चॉकलेट फ्लेवर्ड पुडींग हवे असेल तर ओट्स आणि चिया सीड्सचे मिश्रण तयार करताना त्यात १ टेबलस्पून कोको पावडर घाला. त्यामुळे तुम्ही चॉकलेट फ्लेवर्ड पुडींगसुद्धा बनवू शकता. 

२. फळांच्या टॉपींगप्रमाणेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचेदेखील टॉपींग करू शकता.

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाआरोग्य