Join us

दीपिका पादुकोणने लेकीच्या पहिल्या वाढदिवसासाठी ‘असा’ स्वत: केला केक, पाहा त्याची झलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2025 13:35 IST

Social Viral, Deepika Padukone made a cake for her daughter's first birthday, see a glimpse of it : दीपिकाने मुलीसाठी केलेला केक झाला चांगलाच व्हायरल.

दीपिका पादुकोण तिच्या अभिनयासाठी आणि तिच्या नृत्यासाठी कायमच चर्चेत असते. भारतातील लोकप्रिय आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या कलाकारांच्या यादीत दीपिकाचे नाव फार वर आहे. दीपिका आणि रणवीरची जोडी तशी फार फेमस आहे. गेल्याच वर्षी त्यांच्या परिवारात एका चिमुकलीचा प्रवेश झाला. (Social Viral,  Deepika Padukone made a cake for her daughter's first birthday, see a glimpse of it)दीपिका-रणवीरच्या मुलीचे नाव त्यांनी दुआ असे ठेवले. दुआचा वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो दीपिकाने शेअर केले आणि ते फारच व्हायरल झाले. दीपिका फिट आहेच शिवाय डाएट करते. पौष्टिक आहार तसेच घरचेच जेवण खावे असे ती कायम सांगते. दुआच्या वाढदिवसालाही दीपिकाने हा नियम पाळला आणि वाढदिवस साजरा करताना अगदी घरगुती पद्धतीने केला.  

दीपिका पादुकोणने तिच्या आणि रणवीर सिंहची मुलगी दुआ हिचा पहिला वाढदिवस अत्यंत खास आणि साधेपणाने साजरा केला. बॉलिवूडमध्ये नेहमीच मोठ्या पार्ट्या, आलिशान सजावट आणि मोठा गाजावाजा दिसतो. पण दीपिकाने मात्र हा दिवस घरगुती वातावरणात आणि अधिक भावनिक पद्धतीने साजरा केल्याचे दिसते. ८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या दुआच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिने स्वतः हाताने केक तयार केला. आपल्या मुलीला खास भेट दिली. दीपिकाने इंस्टाग्रामवरुन हा क्षण शेअर केला आणि लिहिले की तिच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतींपैकी एक म्हणजे स्वयंपाक आणि बेकिंग असून हा केक तिच्या लव्ह लँग्वेजचा भाग आहे.

साध्या पण आकर्षक पद्धतीने तिने चॉकलेट केक तयार केला होता. ज्यावर एक सुंदर मेणबत्ती लावली होती. दीपिकाने शेअर केलेले फोटो पाहून लहान मुलांसाठी आपलेसे वातावरण आणि पालकांनी मुलीसाठी तयार केलेला छोटासा  सोहळा जास्त आनंददायी असतो अशा प्रकारच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या. दीपिकाच्या या कृतीतून तिच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, आपलेपणा आणि मातृत्वाचे भाव स्पष्ट दिसतो असेही अनेकांनी लिहिले. अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिच्या या पोस्टचे कौतुक केले आणि या खास क्षणासाठी दुआला शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडमध्ये मोठ्या कार्यक्रमांची परंपरा असूनही दीपिकाने हा दिवस घरात साजरा केला. याचे नेटकऱ्यांना कौतुक वाटले. 

टॅग्स :दीपिका पादुकोणअन्नरणवीर सिंगसोशल व्हायरल