Lokmat Sakhi >Celebrity Corner > १३ व्या वर्षी केलं ४३ वर्षीय गुरुंशी लग्न, मरेपर्यंत जगण्यानं ‘त्यांना’ आपल्या तालावर नाचवलं- रडवलंही

१३ व्या वर्षी केलं ४३ वर्षीय गुरुंशी लग्न, मरेपर्यंत जगण्यानं ‘त्यांना’ आपल्या तालावर नाचवलं- रडवलंही

Saroj Khan The Dancing Diva : नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांना यश भरपूर मिळालं, पण नशिबानं आयुष्यभर त्यांची परीक्षाच पाहिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2025 19:24 IST2025-01-17T19:21:10+5:302025-01-17T19:24:41+5:30

Saroj Khan The Dancing Diva : नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांना यश भरपूर मिळालं, पण नशिबानं आयुष्यभर त्यांची परीक्षाच पाहिली.

Saroj Khan The Dancing Diva | १३ व्या वर्षी केलं ४३ वर्षीय गुरुंशी लग्न, मरेपर्यंत जगण्यानं ‘त्यांना’ आपल्या तालावर नाचवलं- रडवलंही

१३ व्या वर्षी केलं ४३ वर्षीय गुरुंशी लग्न, मरेपर्यंत जगण्यानं ‘त्यांना’ आपल्या तालावर नाचवलं- रडवलंही

भारतात उत्कृष्ट नर्तक-नृत्यप्रशिक्षकांची कमी नाही अनेकांनी नृत्यक्षेत्रात आपले नाव उंचावले आहे. बॉलिवूडमधील कलाकारदेखील नृत्य कलेत मागे नाहीत.(Saroj Khan The Dancing Diva) या कलाकारांचे नृत्य दिग्दर्शन करून मनमोहक नृत्याविष्कार बसवणाऱ्यांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे सरोज खान. माधुरी दीक्षित पासून श्रीदेवी पर्यंतच्या गाजलेल्या गाण्यांचे दिग्दर्शन सरोज खान यांनी केले आहे.(Saroj Khan The Dancing Diva) एक सो एक बघतच राहावे, असे हावभाव त्यांनी अभिनेंत्रींना शिकवले. माधुरी दिक्षीतची बरीच गाणी सरोज खान यांच्या भन्नाट नृत्य दिग्दर्शनामुळे हिट झाली. सर्वांना स्वत:च्या अनुसार नाचवणाऱ्या सरोज खानना मात्र आयुष्याने त्याच्या तालावर फार नाचवले. कायम हसतमुख दिसणार्‍या सरोज यांनी अनेक संकटांवर मात करत क्षेत्रात नाव कमवले.              

 'नजराना' या चित्रपटात बालकलाकार म्हणून त्यांनी वयाच्या ३ऱ्या वर्षी पहिली भूमिका साकारली.(Saroj Khan The Dancing Diva) नृत्याची आवड असलेल्या सरोज यांनी त्यातच काम करायचे ठरवले. त्यांचे खरे नाव 'निर्मला' होते. मुलगी नृत्यक्षेत्रात जाणार म्हणून तिच्या वडि‍लांनी तिचे नाव सरोज करून घेतले. जेणेकरून कुटुंबियांपासून त्यांचे क्षेत्र लपून राहील. बी. सोहनलालकडे नृत्य शिकायला त्या जात असत. सरोज ४३ वर्षीय गुरूच्या प्रेमात पडल्या. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी लग्न केले. एक वर्ष फार सुखात गेले. पण सोहनलालची त्या दुसरी पत्नी असल्याचे त्यांना कळले. सोहनलालला पहिली पत्नी आणि ४ मुलं सुद्धा  होती. सरोज फार लहान होत्या. काहीही निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम नव्हत्या. म्हणून त्या गप्प राहिल्या. त्यांना नंतर अजून दोन मुले झाली. सोहनलालने मुलांना त्याचे नाव देण्यास नकार दिला. एक दिवस अचानक तो निघून गेला. सरोजजींनी मुलांना सांभाळायची  जबाबदारी घेतली. 

१० वर्षांच्या संघर्षानंतर श्रीदेवीच्या 'नागिन' गाण्याने सरोज यांना यश मिळवून दिले. मग मात्र त्यांचे यश थांबलेच नाही. त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. नृत्य दिग्दर्शन क्षेत्रातील सर्वांत जास्त पुरस्कार सरोजजींच्याच नावावर आहेत. २००० पेक्षा जास्त नृत्यांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. वयाच्या १३व्या वर्षी सुरू झालेला संघर्ष वयाच्या ७१ व्या वर्षी संपला. नृत्य क्षेत्रातील सरोज खान यांचे योगदान फार मोठे आहे. 

Web Title: Saroj Khan The Dancing Diva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.