सारा अर्जुन ही आजच्या तरुण कलाकरांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारी, लहान वयातच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री आहे. मुंबईत जन्मलेल्या साऱ्याला अभिनयाचं वातावरण घरातूनच मिळालं. तिचे वडील राज अर्जुन स्वतः अभिनेता असल्याने कॅमेऱ्याची, सेटची आणि शूटिंगची ओळख तिला फार लवकर झाली. (Sara Arjun, who is in the news for her hot-bold look in Dhurandhar... Do you remember her cute childhood look? You will be amazed to see the amazing transformation)केवळ दोन वर्षांची असताना तिने जाहिरातीत काम करायला सुरवात केली. अनेक जाहिराती केल्या. क्लिनिक प्लसच्या जाहिरातीमुळे तिचा चेहरा सगळ्यांच्या लक्षात राहिला.
जाहिरातींनंतर तिच्या करिअरला वळण मिळालं ते साऊथ सिनेमातून. देईवा थिरुमागल या तमिळ चित्रपटात तिने अभिनेता विक्रम यांच्या मुलीची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांना तिचा सहज, नैसर्गिक अभिनय भुरळ घालून गेला. या भूमिकेमुळे सारा संपूर्ण दक्षिण भारतात ओळखली जाऊ लागली. त्यानंतर काही हिंदी आणि तमिळ चित्रपटांत तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. सारा राज अर्जुनची मुलगी आहे हे लोकांना कळण्याआधीच प्रसिद्ध झाली होती.
बालकलाकार म्हणून साराी लोकप्रियता इतकी वाढली की काही काळ ती भारतातील सर्वाधिक पैसे मिळवणाऱ्या बाल कलाकारांमध्ये गणली जात होती. मीडिया रिपोर्टनुसार तिला मिळणारे मानधन आणि तिची इंडस्ट्रीतील मागणी खूप जास्त होती. लहान वयातही तिचा परफॉर्मन्समधला परिपक्वपणा यामुळे ती इतर मुलांपेक्षा वेगळी ठरली. म्हणूनच अनेक दिग्दर्शकांनी तिला त्यांच्या चित्रपटात भूमिका देण्याची इच्छा व्यक्त केली.
या सर्व प्रसिद्धीनंतर तिच्या करिअरला एक नवीन दिशा मिळाली ती धुरंधर या स्पाय-थ्रिलर चित्रपटातून. रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी तिला येथे मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटात सारा अर्जुन ही केवळ एक सहाय्यक कलाकार नसून मुख्य महिला भूमिकेत दिसते. या भूमिकेसाठी तिला १३०० हून अधिक मुलींमधून निवडले गेले होते. तिच्या स्क्रीन उपस्थितीवर, संवाद कौशल्यावर आणि आत्मविश्वासावर दिग्दर्शकांनी ठेवलेला विश्वास पाहता तिचा प्रवास आता आणखी मोठा होणार हे स्पष्ट आहे. सारा वयाच्या २०व्या वर्षी जगभर प्रसिद्ध असलेल्या ४० वर्षीय रणवीरसोबत या चित्रपटात दिसते. त्यामुळे त्यांची जोडी तसा चर्चेचा विषय झाली. मात्र साराच्या अभिनयासाठी तिची वाहवाह नक्कीच होत आहे.
