आई होणं… ही फक्त एक भावना नसते, तर एका स्त्रीचा पुन्हा नव्याने जन्म असतो. बाळ पहिल्यांदा हातात येतं, त्या क्षणी तिचं सगळं आयुष्य बदलून जाते.(Celebrity Mom Journey) घरात आनंद असतो, कौतुक असतं, शुभेच्छांचा वर्षाव असतो. पण या सगळ्या गोंधळात अडकलेलं असतं त्या आईचं मन. (Rubina Dilaik Latest News)
बाळ जन्माला आल्यानंतर सगळेजण त्या बाळाभोवती गुंतून जातात, पण त्या बाळाला जन्म देणारी आई आतून किती बदलतेय, किती तुटतेय… हे विचारायला मात्र फार कमी जण थांबतात.(Rubina Dilaik Postpartum Depression) तिचं शरीर बदलतं, झोप हरवते, स्वतःसाठी वेळ उरत नाही आणि हळूहळू ती स्वतःलाच कुठेतरी मागे सोडून देते. अचानक आरशात दिसणारी स्त्री आपलीच वाटेनाशी होते. (Mental Health After Childbirth)
“आई झालीस ना… आता आनंदी रहा,” हे वाक्य समाज खूप सहज बोलून जातो. पण प्रत्येक आईचा मातृत्वाचा प्रवास फक्त आनंदाने भरलेला असेलच असं नाही. काही महिलांसाठी तो काळ भावनिकदृष्ट्या प्रचंड कठीण असतो. सतत रडू येणं, चिडचिड होणं, स्वतःवरच राग येणं, कुणाशी बोलावंसं न वाटणं… या भावना अनेक महिलांच्या आयुष्यात येतात; पण त्याला नाव दिलं जात नाही. यावर मात्र रुबीना दिलैकने एका अशा विषयावर भाष्य केलं, ज्याबद्दल अनेक महिला अजूनही उघडपणे बोलायला घाबरतात, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन...
अभिनेत्री रुबीना दिलैक हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याच वेदनेबद्दल मन मोकळं केलं. “मला स्वतःचाच राग यायचा, प्रचंड चिडचिड व्हायची, मी माझी ओळख हरवत चालल्यासारखी वाटत होतं,” असं ती म्हणाली. पडद्यावर कायम आत्मविश्वासाने दिसणारी रुबीना आतून मात्र स्वतःशीच झुंज देत होती.
तिने सांगितलं की, बाळाच्या जन्मानंतरचा काही काळ तिच्यासाठी अत्यंत कठीण होता. सतत उदास वाटायचं. लोकांमध्ये मिसळण्याची इच्छा होत नव्हती. स्वतःकडे पाहताना स्वतःचाच तिरस्कार वाटायचा. आणि ही भावना फक्त रुबीनाची नाही तर ती हजारो आईंची गोष्ट आहे, जी अनेकदा चार भिंतीआडच राहते.
पोस्टपार्टम डिप्रेशन हा “कमजोरी”चा भाग नाही, तर मातृत्वासोबत शरीर आणि मनात होणाऱ्या मोठ्या बदलांचा परिणाम आहे. पण आपल्या समाजात अजूनही आईच्या मानसिक आरोग्याबद्दल फारसं बोललं जात नाही. बाळाची काळजी घेताना त्या आईलाही कुणीतरी शांतपणे विचारावं “तू कशी आहेस?” इतकीच काय तिची अपेक्षा असते.
रुबीनाने तिचा अनुभव शेअर केला, कारण कदाचित अनेक महिलांना त्या शब्दांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसावं. आई होणं सुंदर आहेच पण त्या सुंदरतेमागे कधी कधी एक न बोललेला संघर्षही असतो. आणि तो संघर्ष समजून घेणं, स्वीकारणं आणि त्या आईच्या मनाला आधार देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
Web Summary : Rubina Dilaik shared her postpartum depression experience, highlighting feelings of anger, irritability, and loss of identity. She emphasizes the importance of acknowledging and supporting mothers' mental health during this challenging phase.
Web Summary : रुबीना दिलैक ने अपने प्रसवोत्तर अवसाद के अनुभव को साझा किया, जिसमें क्रोध, चिड़चिड़ापन और पहचान खोने की भावनाओं पर प्रकाश डाला गया। उन्होंने इस चुनौतीपूर्ण दौर में माताओं के मानसिक स्वास्थ्य को स्वीकार करने और समर्थन करने के महत्व पर जोर दिया।