Lokmat Sakhi >Celebrity Corner > Panchayat 4 : पंचायतच्या क्रांतीदेवीचा प्रचंड संघर्ष, जगण्यानं छळलेल्या सुनीता राजवारनं काय काय सोसलं..

Panchayat 4 : पंचायतच्या क्रांतीदेवीचा प्रचंड संघर्ष, जगण्यानं छळलेल्या सुनीता राजवारनं काय काय सोसलं..

Panchayat 4: The great struggle of the Panchayat's Kranti Devi, Sunita Rajwar went through alot, bollywood stories

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2025 18:18 IST2025-07-02T18:16:29+5:302025-07-02T18:18:19+5:30

Panchayat 4: The great struggle of the Panchayat's Kranti Devi, Sunita Rajwar went through alot, bollywood stories

Panchayat 4: The great struggle of the Panchayat's Kranti Devi, Sunita Rajwar went through alot, bollywood stories | Panchayat 4 : पंचायतच्या क्रांतीदेवीचा प्रचंड संघर्ष, जगण्यानं छळलेल्या सुनीता राजवारनं काय काय सोसलं..

Panchayat 4 : पंचायतच्या क्रांतीदेवीचा प्रचंड संघर्ष, जगण्यानं छळलेल्या सुनीता राजवारनं काय काय सोसलं..

चित्रपटसृष्टीबद्दल अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. कलेचा सन्मान, कलाकारांना मान वगैरे सगळं जरी खरं असलं तरी गरीब किंवा मध्यम वर्गीय कुटुंबातील लोकांना या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी, काम मिळवण्यासाठी प्रचंड हाल सोसावे लागतात. ओळखपाळख नसताना स्टार होणार्‍यांची म्हणूनच एवढी प्रशंसा केली जाते. सध्या पंचायत या वेब सिरीजमधील क्रांतीदेवी हे नाव प्रचंड लोकप्रिय आहे. ही भूमिका साकारणाऱ्या सुनिता  राजवार एक अत्यंत उत्कृष्ट आणि कौशल्यवान अभिनेत्री आहेत, यात काहीच वाद नाही. स्वप्न साकारण्यासाठी विश्वास आणि मेहनतीच्या जोरावर नक्कीच यश साध्य करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे लहान परिवारातून येऊन मोठ्या स्टेजपर्यंत पोहचणाऱ्या कलाकारांचे आयुष्य.  

सुनीता यांचा जन्म उत्तराखंडमधील हल्द्वानी शहरात झाला. त्यांचे वडील ट्रक ड्रायव्हर होते आणि आई एक गृहिणी. घरात आर्थिक अडचणी असूनही त्यांच्या पालकांनी मुलांना चांगले शिक्षण देण्याचा निर्धार केला होता. परिवाराचा पाठिंबा फार महत्त्वाचा असतो, तो सुनीतांना कायम लाभला. लहानपणापासूनच सुनीता यांना अभिनयाची आवड होती. वडिलांसोबत नाटक पाहायला त्या जात असत. त्या शाळा-कोलेजमध्ये नाट्यस्पर्धांमध्ये भाग घ्यायच्या. नैनितालमधील कॉलेजमध्ये अभिनय करत असताना, एका एनएसडी (National School of Drama)च्या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्याने त्यांचं कौतुक केलं आणि त्यानंतर सुनीतांनी अभिनयाला अधिक गांभीर्याने घेतले.

सुनीता यांनी १९९७ मध्ये एनएसडीमधून पदवी घेतली आणि त्यानंतर त्या केवळ ३०,००० रुपये घेऊन मुंबईत आल्या. सुरुवातीचे दिवस खूपच कठीण होते, त्यांनी अगदी लहान भूमिका केल्या. मात्र कायमच घरकाम करणाऱ्या स्त्रिया किंवा गावातील महिला अशा भूमिका त्यांना देण्यात आल्या. फक्त अशीच कामे करुन हळूहळू निराशा वाढली आणि त्यांनी दोन वर्षांसाठी अभिनय क्षेत्र सोडून दिलं. त्यांनी अनेकदा पॉडकास्टमध्ये सांगितले आहे की त्यांना दहा बरा लोकांसोबत मिळेल त्या जागेत राहावं लागायचं. साधे स्वच्छतागृहही चांगले नसायचे. मोठे कलाकार आणि लहान कलाकार हा भेद प्रचंड असल्याचे त्या बिनधास्त बोल्ल्या. दोन वर्षांनी पुन्हा नाटकात काम करायला सुरवात केली आणि त्यांच्या आयुष्याचे रुपच पालटले. गुल्लक या सिरिजमध्ये बिट्टू की मम्मी ही भूमिका त्यांनी निभावली आणि ती फारच लोकप्रिय झाली. त्यांना फिल्मफेअर ओटीट पुरस्कारही मिळाला. 

२०२४मध्ये सुनीता यांची प्रमुख भूमिका असलेला संतोष हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित झाला. कान्स रेड कार्पेटवर पाव ठेवल्यावर वडिलांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा अभिमान सुनीतांच्या चेहर्‍यावर दिसत होता. पंचायत या सिरीजमुळे सुनीता गाजल्या नसून त्यांच्या अभिनयामुळे सीरिज गाजली आहे एवढे मात्र नक्की. 

Web Title: Panchayat 4: The great struggle of the Panchayat's Kranti Devi, Sunita Rajwar went through alot, bollywood stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.