Lokmat Sakhi >Celebrity Corner > नवाजुद्दीन सिद्दीकीच्या १५ वर्षाच्या मुलीने विकत घेतली २.५ लाखांची बॅग, ते पाहून नवाजुद्दीन म्हणाला..

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या १५ वर्षाच्या मुलीने विकत घेतली २.५ लाखांची बॅग, ते पाहून नवाजुद्दीन म्हणाला..

Nawazuddin Siddiqui's 15-year-old daughter bought a bag worth 2.5 lakhs नवाजुद्दीनची मुलगी वापरते २.५ लाखांची बॅग.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2025 15:44 IST2025-02-10T15:42:28+5:302025-02-10T15:44:14+5:30

Nawazuddin Siddiqui's 15-year-old daughter bought a bag worth 2.5 lakhs नवाजुद्दीनची मुलगी वापरते २.५ लाखांची बॅग.

Nawazuddin Siddiqui's 15-year-old daughter bought a bag worth 2.5 lakhs | नवाजुद्दीन सिद्दीकीच्या १५ वर्षाच्या मुलीने विकत घेतली २.५ लाखांची बॅग, ते पाहून नवाजुद्दीन म्हणाला..

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या १५ वर्षाच्या मुलीने विकत घेतली २.५ लाखांची बॅग, ते पाहून नवाजुद्दीन म्हणाला..

नवाजुद्दीन सिद्दीकी हा हिंदी सिनेमा व सिरिज मधील एक नावाजलेला कलाकार आहे. हिंदी वेब सिरीजना प्रसिद्धी मिळवून देण्यात त्याचाही वाटा आहे. (Nawazuddin Siddiqui's 15-year-old daughter bought a bag worth 2.5 lakhs) त्याने अनेक छोटी-मोठी कामे चित्रपटांतून केली. पण गणेश गायतोंडे या त्याच्या पात्राला नेटफ्लिक्सवर प्रचंड प्रेम मिळाले. आता तो 'वन ऑफ द सक्सेसफूल अॅक्टर' म्हणून ओळखला जातो. नवाजुद्दीनचे आयुष्य एकदम खडतर गेले.(Nawazuddin Siddiqui's 15-year-old daughter bought a bag worth 2.5 lakhs) म्हणून आपली मुलगी शोरा एकदम सुखकर आयुष्य जगेल, याची तो सतत काळजी घेत असतो. नवाज आणि त्याच्या बायकोचा घटस्पोट झाला आहे. तरी तो सतत त्याच्या मुलांबरोबर दिसतो. त्यांना फिरायला घेऊन जात असतो. असंच एकदा फिरत असतानाचा किस्सा त्याने अनफिल्टर समधीश याच्या पॉडकास्टवर सांगितला.

नवाजुद्दीन म्हणाला, "मला माझी मुलगी सगळ्यात प्रिय आहे. माझ्याहूनही जास्त. तिला जगातीली सगळी सुखं द्यायची माझी इच्छा आहे. तिने काही मागीतल्यावर मी नाही म्हणत नाही. (Nawazuddin Siddiqui's 15-year-old daughter bought a bag worth 2.5 lakhs)पण तिच्यासाठी एक बॅग विकत घेताना माझ्या नाकी नऊ आले होते." बाबा-मुलगी दुबईला फिरायला गेले असतानाची गोष्ट आहे. मॉलमध्ये फिरताना, शोराने एक बॅग विकत घेऊ का? असं विचारले. त्यावर अर्थातच नवाजुद्दीनने होकार दिला. एक छोटीशी बॅग लुईस व्हिटन मधून तिने विकत घेतली. ती बॅग काही हजारांची असेल, असे नवाजुद्दीनला वाटले होते. नंतर बिल भरताना त्याच्या तोंडचं पाणीच पळालं. त्या बॅगेची किंमत २.५ लाख होती. 'अपूनही भगवान है' म्हणणाऱ्या नवाजला आपली १५ वर्षाची मुलीगी एवढी महाग बॅग विकत घेत आहे, हे ऐकून तर धक्काच बसला.

आपण म्हणतो' "बडे लोग बडी बाते." पण या किस्यानंतर, आपण आपल्या मुलांना सुख देण्याच्या नावाखाली हवं ते करायला देणं योग्य आहे का? असा प्रश्न पडतो. नवाजुद्दीनला तेवढ्या महाग बॅग परवडत असतील. तरी १५ वर्षाच्या मुलीला पैशाचे महत्त्व कळेल का? अशा कमेंट्स सोशल मिडियावर लोकं करत आहेत. परवडतं म्हणून कोणताही हट्ट पूर्ण करणे योग्य आहे का? अशा प्रतिक्रिया लोकांच्या आहेत.

Web Title: Nawazuddin Siddiqui's 15-year-old daughter bought a bag worth 2.5 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.