सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. रंग, रुप, उंची, शरीरयष्टी आदीची नैसर्गिक ठेवण असते. प्रत्येक जण स्वत:चं नाविन्य जपून असते. मात्र रंग-रुपावरुन खिल्ली उडवणारेही अनेक असतात. (Mrunal Thakur commented on Bipasha Basu's skin , why is the old video going viral? social viral)बॉलिवूड मध्ये असे प्रकार तर फार चालतात. एखाद्याच्या रंगामुळे त्याला काम मिळत नाही. व्यक्ती कितीही कौशल्यवान असली तरी रंग-रुप जास्त महत्त्वाचं मानलं जातं. अनेकदा हा प्रकार घडतो. काही वेळा अभिनेते - अभिनेत्री स्वतःच असं काही बोलून जातात ज्यामुळे त्यांना लोकांचा राग, द्वेष सहन करावा लागतो. असंच काहीसं सध्या मृणाल ठाकुर सोबत घडत आहे.
सिता-रामन या चित्रपटानंतर मृणाल एक फार सुंदर अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली. तिच्या अनेक मुलाखतींमध्येही ती सगळ्याच महिला सुंदर असतात आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय केले पाहिजे या विषयांवर बोलताना दिसली. त्यामुळे मृणालला 'girl's girl' म्हणजेच मुलींच्या बाजूने असणारी सगळ्यांना समान वागणूक देणारी म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र काही दिवसांपूर्वी मृणालचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आणि मृणालबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली.
कुमकुम भाग्य या हिट हिंदी मालिकेत मृणालने भूमिका केली होती. त्यानंतर तिला बॉलिवूडमध्येही काम मिळाले. या मालिकेमुळे मृणाल फार प्रसिद्ध झाली. अर्जित तनेजा आणि मृणालची जोडी हिट होती. त्या मालिकेदरम्यान झालेल्या मृणाल आणि अर्जितच्या एका मुलाखतीची चर्चा सुरु आहे. त्यात अर्जितने त्याला सावळ्या मुलीशी लग्न करायला आवडेल असे म्हटले. त्यावर मृणालने वैतागून म्हटले, "मग बिपाशाशीच लग्न कर" बिपाशाच्या रंगाची खिल्ली उडवत तिने पुढे असेही म्हटले की मी बिपाशापेक्षा खुप जास्त सुंदर आणि चांगली आहे. या व्हिडिओनंतर मृणालचे अनेक मिम्स तर व्हायरल होत आहेतच मात्र तिच्याबद्दलचे मतही अनेकांचे बदलले.
बिपाशाने त्यावर काहीही प्रतिसाद तेव्हाही दिला नव्हता आणि आत्ताही दिला नाही. बिपाशाने रंग बदलण्यासाठी कोणतीही सर्जरी न करता त्वचा जशी आहे तशीच राहू दिली. या गोष्टीसाठी अनेकांना तिचं कौतुक वाढतं. बिपाशाने सांगितल्या प्रमाणे तिला अनेकदा रंगामुळे नाकारले गेले आहे. फक्त बॉलिवूडच नाही तर सगळीकडेच अगदी रोजच्या जीवनातही या अशा टोमण्यांचा सामना अनेक महिला करत असतात.